मुंग्यांच्या जगात. 5 वी स्वाध्याय | Mungyanchya jagat 5th std exercise

Admin

 

.मुंग्यांच्या जगात.


मुंग्यांच्या जगात. 5 वी स्वाध्याय | Mungyanchya jagat 5th std exercise

मुंग्यांच्या जगात. 5 वी स्वाध्याय | Mungyanchya jagat 



स्वाध्याय

 


प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ)         कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते?

उत्तर: कीटक वर्गात सर्वात जास्त कष्टाळू, उद्योगी आणि शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते.

 

(आ)      मुंग्या गंधकण केव्हा सोडतात?

उत्तर: एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला, की मुंग्या वसाहतीकडे येताना मार्गात गंधकण सोडतात.

 

(इ)           मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात?

उत्तर: स्वतःचे आणि वसाहतींचे संरक्षण करण्यासाठी मुंग्य नेहमी तत्पर असतात.

 

 

प्र.२. मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात?

उत्तर:स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात. काही मुंग्या विषारी दंश करतात , तर काही विशिष्ट आम्लाचा फवारा शत्रूवर सोडतात. वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतला, की त्याला तेथून पळ काढावाच लागतो. काही जातींच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते. दंश करताच प्राण्याच्या शरीरात विष सोडले जाते. अशा प्रकारे मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करतात.

 

प्र.३. वाक्यात उपयोग करा.


[माग काढणे, सावध करणे, फवारा सोडणे, तत्पर असणे, पळ काढणे, दाह होणे, हाणून पाडणे.]


१)माग काढणे: चोराचा मग काढत पोलिस चोरांच्या तोलीपर्यंत पोहोचले.


२)सावध करणे: समोर साप दिसताच बाबांनी राजूला सावध केले.


३)फवारा सोडणे: गाडी धुण्यासाठी बाबांनी गाडीवर पाण्याचा फवारा सोडला.


४)तत्पर असणे: मुंग्या नेहमी स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करण्यास तत्पर असतात.


५) पळ काढणे: पोलिसांना बघतच चोरांनी गाडी घेऊन पळ काढला.


६)दाह होणे: इंगळी चावल्याने राजूच्या अंगाचा दाह होत होता.


७)हाणून पडणे: पोलिसांनी चोरांचा चोरीचा डाव हाणून पाडला.  

 


प्र.४. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.


(अ)      माणसांना दंश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते? त्यांच्या दंशाचा माणसांवर काय परिणाम होतो?

उत्तर:  दंश करणारे कीटक: डास, खेकडा, विंचू.

दंशाचा परिणाम: खाज सुटणे, फोड येणे, जखम होते, वेदना होतात, सूज येते.

 

(आ)       'अन्नसाखळी' म्हणजे काय? शिक्षकांकडून माहिती मिळवा व तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: परिसंस्थेत एका साजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्नउर्जेचे वाहन (संक्रमण) निम्नस्तरापासून ते उच्चस्तरापर्यंत होते. यालाच अन्नसाखळी असे म्हटले जाते.

उदा: माशीला बेडूक खातो- बेडकाला साप खातो- सापाला गरुड खातो- ही अन्नसाखळी आहे.

 

(इ)            मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नसाठा न करणारे कीटक व प्राणी यांची नावे लिहा. ग्रंथालयात जाऊन पुस्तकांतून माहिती मिळवा.

उत्तर: अन्नसाठा करणारे कीटक: मुंगी , मधमाशी


अन्नसाठा न करणारे कीटक: माशी, सुरळ.


अन्नसाठा करणारे प्राणी: माणूस, उंट.


अन्नसाठा न करणारे प्राणी: हत्ती , वाघ, सिंह.

 


प्र.५. या पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले ते सांगा.

उत्तर: मुंग्या एकजुटीने काम करतात, मुंग्या उद्योगी असतात, कष्टाळू असतात, त्याचप्रमाणे त्या शिस्तप्रिय व हुशार असतात. हे मुंग्यांचे गुण मला आवडले.

 

प्र.६. मुंग्यांवरील कविता शोधा व वर्गात म्हणून दाखवा.


प्र.७. ' मुंगी ' या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत. ती शोधा व लिहा. याप्रमाणे एखादया शब्दाची वेगवेगळी रूपे लिहा.

 

खालील वाक्यांतील नामे ओळखा व सांगा .


(अ) बंडूची इजार चार बोटे लांब झाली .


(आ) आईने इजार एका कोनाड्यात फेकली .


(इ) माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत .


(ई) आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे .

 


खालील वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य नामे घाला .


(अ) सायली माधवला म्हणाली.


(आ) आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या.


(इ) घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो.


(ई) मराठी विषय मला खूप आवडतो.


(उ) राष्ट्रपतींचे भाषण ऐकून राजू मंत्रमुग्ध झाला.


(ऊ) महागाई वाढल्याने छत्र्या ही महागल्या.



 [हा स्वाध्याय आपल्याल्या मित्रांना देखील शेअर करा.]

स्वाध्याय आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.



मित्रांनो हा स्वाध्याय तुम्ही खालील प्रकारे देखील शोधू शकता.


मुंग्यांच्या जगात ५ वी स्वाध्याय  

Mungyanchya jagat 5th standard exercise

५वी मराठी प्रश्न उत्तरे 

पाठ क्रमांक ४ मुंग्यांच्या जगात

मराठी इयत्ता पाचवी 

5th std marathi exercise 

marathi swadhyay


धन्यवाद 


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.