१.आपली पृथ्वी – आपली सूर्यमाला
१.आपली पृथ्वी – आपली सूर्यमाला | Aapali pruthvi - aapali suryamala swadyay |
स्वाध्याय
प्र.१. काय करावे बरे?
लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक
खगोलीय वस्तू निखळली आहे. ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे. आपली पृथ्वी नेमकी
तिच्या मार्गात येणार आहे. या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे.
ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल?
उत्तर:
लघुग्रहांच्या पट्ट्यातील
एक खगोलीय वस्तू निखळली आणि जर पृथ्वीशी तिची टक्कर होणार असेल तर ती टक्कर
रोखण्यासाठी आज अनेक मार्ग उपलब्ध आहेत.
१)त्या खगोलीय वस्तूवर एखाद्या अस्त्राचा
मारा करून त्याचे रुपांतर छोट्या छोट्या तुकड्यांत करता येईल. त्यामुळे त्याच्या
धक्याने होणारे नुकसान कमी करता येईल.
२) पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या
त्या खगोलीय वस्तूचा मार्ग बदलता येईल आणि ज्या ठिकाणी हानी होणार नाही त्या
ठिकाणी ती पडता येईल.
प्र.२. जरा डोके चालवा .
(१)
सूर्य अचानक गडप झाला, तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल?
उत्तर:
सूर्य हा सूर्यमालेच्या
मध्यभागी असून सारे ग्रह सूर्याभोवती फिरतात. अचानक सूर्य गडप झाला तर..
१) साऱ्या
ग्रहांची परिभ्रमण कक्षा बदलू शकते.
२) सूर्यापासून
मिळणारा प्रकाश नाहीस होऊन सर्व ग्रहांवर अंधाराचे साम्राज्य निर्माण होईल.
३) ज्या
ग्रहांवर सजीवसृष्टी अस्तित्वात आहे ती नष्ट होईल.
४) सगळी
सूर्यमाला धोक्यात येईल.
(२)
असे समजा, की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे. तुम्ही
नेमके कोठे राहता हे त्याला / तिला नीट कळले पाहिजे. तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल?
उत्तर:
नाव:
............. .............. ..........
पत्ता:
मु.पो. भोके, ता. जि. रत्नागिरी
राज्य
: महाराष्ट्र , देश: भारत, खंड: आशिया, ग्रह: पृथ्वी ग्रह. ग्रह क्रमांक ३
प्र. ३. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा
क्रम चुकला आहे, ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा.
प्र. ४. मी कोण ?
(अ)
पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता. तुम्हाला
दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो.
उत्तर: चंद्र
(आ)
मी स्वयंप्रकाशी आहे. माझ्यापासून
निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो.
उत्तर: सूर्य
(इ)
स्वत: भोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो.
उत्तर: उपग्रह
(ई) मी स्वतःभोवतीही फिरतो आणि
ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो.
उत्तर: ग्रह
(उ) माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर
कोणत्याच ग्रहावर नाही .
उत्तर: पृथ्वी
(ऊ) मी पृथ्वीपासून सर्वांत
जवळचा तारा आहे .
उत्तर: शुक्र
प्र. ५. खालील प्रश्नाची उत्तरे
लिहा.
(अ)
अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का
वापरतात ?
उत्तर:
अवकाशयान पृथ्वीच्या
गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर सोडणे गरजेचे असते. यासाठी अवकाश प्रक्षेपण
तंत्राचा उपयोग केला जातो.
यामध्ये रॉकेटचा उपयोग करतात, यात रॉकेट मध्ये मोह्त्या प्रमाणवर इंधन जाळले जात जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. रॉकेट हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध कार्य करते आणि यानाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर घेऊन जाते. म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात.
उत्तर:
शेती, पर्यावरणाचे निरीक्षण , हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करणे इत्यादी माहिती कृत्रिम उपग्रह देतात.
मुलांनो हा स्वाध्याय तुमच्या
मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
या पाठावरची ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
आपली पृथ्वी – आपली सूर्यमाला ऑनलाईन टेस्ट
स्वाध्याय ची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
मुलांनो हा स्वाध्याय तुम्ही खालील
प्रामाणे देखील शोधू शकता.
THANK YOU…!