७. आपणच सोडवू आपले प्रश्न | Aapanach sodavu aapale prashn 5th

५वी स्वाध्याय ५वी परिसर अभ्यास भाग 1 स्वाध्याय पाचवी परिसर अभ्यास भाग 1 आपणच सोडवू आपले प्रश्न स्वाध्याय आपणच सोडवू आपले प्रश्न प्रश्न आणि उत्तरे इयत
Admin

 

७. आपणच सोडवू आपले प्रश्न


५वी स्वाध्याय ५वी परिसर अभ्यास भाग 1 स्वाध्याय पाचवी परिसर अभ्यास भाग 1 आपणच सोडवू आपले प्रश्न स्वाध्याय आपणच सोडवू आपले प्रश्न  प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी 5th swadhyay Parisar abhyas bhag 1 swadhya Aapanach sodavu aapale prashn  questions and answers Aapanach sodavu aapale prashn  5vi swadhyay

आपणच सोडवू आपले प्रश्न | Aapanach sodavu aapale prashn 5th 


स्वाध्याय 

 

प्र.१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.


(अ)       समस्यांकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक............... बनतात.

उत्तर: तीव्र

 

(आ) परिसरातील ...............ओळखणे , हीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे .

उत्तर: समस्या

 

प्र.२. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ)        सार्वजनिक समस्या म्हणजे काय ?

उत्तर: आपल्या गावातील किंवा शहरातील लोकान्न ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणतात.

 

(आ)     सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात?

उत्तर: सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात.


(इ)          स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले?

उत्तर: स्वच्छतेचे महत्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांनी यांनी पटवून दिले.

 

 प्र.३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा .


(अ)       ‘ श्रमदानातून ग्रामसफाई’ ही संकल्पना स्पष्ट करा.

उत्तर: कोणतीही व्यक्ती एकट्याने सारे गाव साफ करू शकत नाही. त्यासाठी गावातील लोकांनी एकत्र येऊन परस्परांच्या विचाराने आणि सहकार्याने गावाच्या स्वच्छतेबाबत पावले उचलणे गरजेचे आहे. गावातील प्रत्येकाने गावाच्या स्वच्छतेला हातभार लावला तर कमी वेळात गाव स्वच्छ होण्यास मदत होईल. यामध्ये गावातील सांडपाण्याचे नियोजन, उकीरड्यावरील कचऱ्याची योग्य ती व्यवस्था करणे इत्यादी बाबी केल्या जातात.


(आ)    शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल ?

उत्तर: शांततेला पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी

१)    समजतील सर्व घटकांच्या मुलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे.

२)   प्रत्येकाला आवश्यक ती सुरक्षा मिळाली पाहिजे.

३)   समाजातील शोषण थांबवले पाहिजे.

४) समाजातील विषमता कमी केली पाहिजे.

५)  सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळवून दिली पाहिजे.

६)   सर्वांनी शांततेचे महत्व समजावून घेतले पाहिजे.

 


प्र. ४. पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल ?

 

(अ)      वर्गप्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे.

उत्तर:

१) वर्गातील सर्व मुलांना त्यांचा अपूर्ण अभ्यास पूर्ण करण्यास सांगता येईल.

२)सर्व मुलांना त्यांच्या आवडत्या कृतीमध्ये गुंतवून ठेवता येईल.

३)वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या मताचा आदर केला जाईल याची खबरदारी घ्यावी.

 

(आ)   गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाहीत .

उत्तर:

१)    मागील तासाला शिकवलेल्या गणितांची उजळणी करेन.

२)   वर्गप्रमुखाने दिलेल्या सूचनांचे पालन करेन.

३)   ज्या पद्धतीची गणिते सोडवायला कठीण जातात त्यांचा अधिक सराव करीन.


(इ)          क्रीडांगणावर खेळाच्या सामन्याच्या वेळी दोन संघांमध्ये वाद निर्माण झाला आहे .

उत्तर:

१)    झालेल्या वादाचे योग्य ते विश्लेषण करून चूक कोणाची आहे ते निपक्षपातीपणे सांगेन.

२)   दोन्ही संघाची समजूत काढून त्यांच्यात पुन्हा सलोख्याचे संबंध घडवून आणण्याचा प्रयत्न करेन.

 


मुलांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.

स्वध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.

 

THANK YOU…!


मुलांनो हा स्वाध्याय तुम्ही खालील प्रामाणे देखील शोधू शकता.

५वी स्वाध्याय
५वी परिसर अभ्यास भाग 1 स्वाध्याय
पाचवी परिसर अभ्यास भाग 1 आपणच सोडवू आपले प्रश्न स्वाध्याय
आपणच सोडवू आपले प्रश्न  प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
5th swadhyay
Parisar abhyas bhag 1 swadhya
Aapanach sodavu aapale prashn  questions and answers
Aapanach sodavu aapale prashn  5vi swadhyay
 


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.