६. अश्मयुग : दगडाची हत्यारे स्वाध्याय | Ashmayug : dagadachi htayare exercise

 ६. अश्मयुग : दगडाची हत्यारे

 

६. अश्मयुग : दगडाची हत्यारे स्वाध्याय | Ashmayug : dagadachi htayare exercise

 ६. अश्मयुग : दगडाची हत्यारे स्वाध्याय | Ashmayug : dagadachi htayare exercise 



 स्वाध्याय 



प्र.१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा .

 

(अ) ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात, त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो .

( ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग )

 

(आ) महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकजवळचे गंगापूर हे स्थळ प्रसिद्ध आहे .

(गंगापूर, सिन्नर, चांदवड)

 


प्र.२. खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा .

 

(अ) राजस्थान - बागोर

(आ) मध्य प्रदेश - भीमबेटका

(इ) गुजरात - लाधणज

(ई) महाराष्ट्र - विजापूर


उत्तर: (ई) महाराष्ट्र - विजापूर

 



प्र.३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा.

 

(अ)    आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला ?

उत्तर: 

१) एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे यला ‘आघात तंत्र’ असे म्हणतात.

२)आघात तंत्राचा वापर करून मानवाने तोडहत्यारे तयार केली.

३) दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबरशिंगासारख्या वस्तूंचा घन वापरला.

अशा प्रकारे अघात तंत्राचा वापर मानवाने केला.

 

आ) बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती          केली?

उत्तर

१) दगडांपासून लांब, पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले.

२)या लांब पात्यांपासून सुरी, तासणी, टोच्या, छिन्नी यांसारखी विविध प्रकारची हत्यारे आणि वस्तू तयार केल्या

ही क्रांती बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात केली.

 

 

प्र.५. पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या तीन कालखंडांतील हत्यारांची तुलना करा.


उत्तर: पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या तीनही कालखंडात मानवाने त्यांच्या गरजेनुसार हत्यारे तयार केली. प्रत्येक युगातील हत्यारांचा तुलनात्मक तक्ता पुढीलप्रमाणे:


 {हा तक्ता ( table ) पाहण्यासाठी मोबाईल आडवा (tilt)  करा.}


पुराश्मयुग

मध्याश्मयुग

नवाश्मयुग

पुराश्म युगातील सुरुवातीच्या मानवाने ‘आघात तंत्र ‘ पद्धतीने दगडी हत्यारे बनविली. या हत्यारांचा एकाच बाजूला धार असे. कुशल मानवाने अशा तासाण्या , तोड हत्यारे बनवली. ही हत्यारे ओबडधोबड होती. परतू नंतरच्या ताठ कण्याच्या मानवाने पसरट पात्याची कुऱ्हाड, फारशी अशी प्रमाणबद्ध हत्यारे तयार केली. शक्तिमान मानवाने लहान आकाराची हत्यारे तयार केली, तर बुद्धिमान मानवाने हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली. त्याने लांब दगडी पात्यांपासून सुरी, तासांनी, टोच्या, छिन्नी अशी हत्यारे तयार केली.

मध्याश्मयुगातील मानवाने शिकार करण्यासाठी बाणाच्या तोकांसारखी दगडी सूक्ष्म शस्त्रे बनविली. मासेमारीसाठी हाडांपासून गळ तयार केले. दातेरी सुरी, विला यांसारखी अवजारे बनविली.

या युगामध्ये मानव प्रगत तंत्रज्ञान अवगत असणारा होता. त्याने घासून गुळगुळीत केल्लेली दगडाची हत्यारे तयार केली.

 

 

 

प्र. ५. पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो ?

 

(अ) मिक्सर

(आ) पिठाची चक्की

(इ)मसाला कांडप यंत्र


उत्तर: पिठाची चक्की.

 



प्र.६ . भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील स्थळे दाखवा .

(अ) पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ.

(आ) नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळणान्या नदीचे खोरे .

(इ) मध्याश्मयुगीन अवशेष आढळलेले मध्य प्रदेशातील एक स्थळ.



मुलांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.

स्वध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.

 


मुलांनो हा स्वाध्याय तुम्ही खालील प्रामाणे देखील शोधू शकता.

५वी स्वाध्याय

५वी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय
पाचवी परिसर अभ्यास भाग २ अश्मयुग : दगडाची हत्यारे
अश्मयुग : दगडाची हत्यारे प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
5th swadhyay
Parisar abhyas bhag 2 swadhya
Ashmyug : dagadachi hatyare questions and answers
Ashmayug : dagadacdhi hatyare 5vi swadhyay


 

THANK YOU…!



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.