६.माहेर
माहेर कविता स्वाध्याय इयत्ता ५वी | Maher kavita swadhyay 5th std
स्वाध्याय
प्र.१.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे?
उत्तर:
कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे.
(आ) या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता?
उत्तर:
चिकणमाती हा नदीकाठच्या मातीचा प्रकार आहे.
(इ)
कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे?
उत्तर:
कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे.
(ई)
कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे?
उत्तर:
कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन भावाला भेटायला माहेर ला जाणार आहे.
प्र.२.
काय ते लिहा.
(अ)
ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती चिकणमाती
(आ)
लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ सोजीचे पीठ
(इ)
बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन रथ
प्र.३.
चिकणमाती बघून कवितेतील माहेरवाशिणीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या. त्या कल्पना
तुमच्या शब्दांत क्रमाने सांगा.
उत्तर:
चिकणमातीचा ओटा ततयार करणे – ओट्यावर जातं मांडणे – जात्यावर सोजी दळणे – सोजीच्या
पिठापासून लाडू बनवणे – भाऊ रथ घेऊन येईल – रथातून माहेर ला जाणे – माहेरी
धिंगामस्ती करणे.