६. नियम सर्वांसाठी
६. नियम सर्वांसाठी | Niyam sarvansathi
स्वाध्याय
प्र.१. रिकाम्या जागी योग्य
शब्द लिहा.
(अ) आपले सामाजिक जीवन ............... आधारे चालते.
उत्तर: नियमांच्या
(आ) स्वतंत्र भारताच्या संविधानाने ............... प्रथा नष्ट केली.
उत्तर: अस्पृशतेची
(इ) चुकीच्या रूढी-परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला ............... येते.
उत्तर: उपेक्षा.
प्र.२. पुढील प्रश्नांची एका
वाक्यात उत्तरे लिहा.
1)नियम का तयार करावे लागतात?
उत्तर: समाजातील प्रत्येकाची
जबाबदारी व कर्तव्ये कोणती आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय येऊ नये. यासाठी
नियम तयार करावे लागतात.
२) आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत.?
उत्तर: आपल्या सामाजिक जीवनात ‘अहिंसा’
आणि ‘शांतता’ ही मुल्ये प्राचीन काळापासून आहेत.
३) आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या?
उत्तर: ‘गरिबी’ आणि ‘शिक्षणाचा
अभ्यास’ या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत.
प्र.३. पुढील प्रश्नांची
थोडक्यात उत्तरे लिहा .
(अ) कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या?
उत्तर:
१) जातीभेद व अस्पृश्यता कायद्याने बंद केली.
२) सती, बालविवाह यांसारख्या चालीरीतींवर कायद्याने बंदी घातिली.
३) जादूटोणा, हुंडा पद्धती यांसारख्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या.
४) बालविवाह, बालकामगार अशा अनिष्ट प्रथांवरही बंदी घातली आहे.
(आ) पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात?
उत्तर:
१) आपण सर्वच बाबतींत निसर्गावर अवलंबून असतो.
२) आपल्या अनेक प्रकारच्या गरजांची पूर्तता ही निसर्गामुळेच होते.
३) आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपभोग घेता यावा यासाठी साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची आवश्यकता असते.
मुलांनो हा स्वाध्याय तुमच्या
मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
स्वध्यायाची माहिती आवडल्यास
आम्हाला कमेंट करून सांगा.
मुलांनो हा स्वाध्याय तुम्ही
खालील प्रामाणे देखील शोधू शकता.