४. पर्यावरणाचे संतुलन | Paryavarnache santulan 5th

५वी स्वाध्याय ५वी परिसर अभ्यास भाग 1 स्वाध्याय पाचवी परिसर अभ्यास भाग 1 पर्यावरणाचे संतुलन पर्यावरणाचे संतुलन प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी 5th swadhya
Admin

 

४. पर्यावरणाचे संतुलन



५वी स्वाध्याय ५वी परिसर अभ्यास भाग 1 स्वाध्याय पाचवी परिसर अभ्यास भाग 1 पर्यावरणाचे संतुलन पर्यावरणाचे संतुलन प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी 5th swadhyay Parisar abhyas bhag 1 swadhya Paryavarnache santulan questions and answers Paryavarnache santulan 5vi swadhyay

४. पर्यावरणाचे संतुलन | Paryavarnache santulan 5th


स्वाध्याय 



प्र.१ काय करावे बरे ?


कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत .

उत्तर:

१) धान्याला उन्हात वाळवावे. सूर्याच्या तीव्र उन्हामुळे धान्यातील अळ्या, कीटक नाहीसे होतात.

२)ज्या हवाबंद डब्यात आपल्याला धान्य साठवून ठेवायचे आहे. त्यामध्ये कडूलिंबाचा पाला ठेवावा. कडूनिंब हे किटकाचा नयनाट करते.

३) चणे, पावटा यांसाख्या धान्याला मातीचा लेप लावून सूर्यप्रकाशात सुकवल्याने धान्य खराब होण्याचा धोका टळतो.

४) ज्या ठिकाणी धान्याची साठवणूक करायची आहे ती जागा स्वच्छ आणि कोरडी असावी त्या ठिकाणी हवा खेळती असावी .

 

 

प्र.२. जरा डोके चालवा .

अन्नसाखळी तयार करा ;

बेडूक , घार , अळी , साप , गवत .

उत्तर: गवत – अळी – बेडूक – साप – घार

 

प्र.३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .

 

(अ)  अन्नसाखळी म्हणजे काय ? उदाहरण लिहा.

उत्तर: पर्यावरणातील प्रत्येक सजीव हा अन्नासाठी दुसऱ्या साजीवावर अवलंबून असतो. असे पर्यावरणातील वेगवेगळे घटक अन्नामुळे परस्परांशी जोडले गेले आहेत. म्हणून ते एका साखळीचे घटक आहेत. अशा साखळीला अन्नसाखळी असे म्हणतात.

अन्नसाखळीचे उदाहरण : गवताला अळी खाते, अळीला बेडूक खातो, बेडकाला साप खातो आणि सापाला घार खाते ही एक अन्नसाखळी आहे.

गवत – अळी – बेडूक – साप – घार

 

आ) पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते ?

उत्तर:

1.       पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या असतात.

2.       पर्यावरणातील अन्नसाखळ्या मुले प्रत्येक सजीवाची अन्नाची गरज भागते. आणि तो जगत राहतो.

3.       पर्यावरणात अशी इतरही अनेक चक्रे असतात. सजीव-सजीव व सजीव-निर्जीव यांमध्ये परस्पर देवाणघेवाण होत राहते यांमुळेच पर्यावरणातील अन्नसाखळ्या अबाधित राहतात.

4.       पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिले, की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते.

 

४. वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थांचा वापर आवश्यक आहे ?

उत्तर: वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील पोषक पदार्थांची आवश्यकता असते.

पालापाचोळा, प्राण्यांची मृत शरीरे, मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचे काम मातीतील सूक्ष्मजीव करतात. यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात. त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात,.

 

५. चूक की बरोबर ते लिहा.


(अ)       पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो.

उत्तर: बरोबर


(आ)    जैवविविधता जपणे आवश्यक आहे .

उत्तर: बरोबर


(इ)    नाकतोडा पक्ष्याला खातो .

उत्तर: चूक

 

उपक्रम:

1)_ आपल्या अवतीभोवती आढळणाऱ्या पक्षांची माहिती मिळावा.

उत्तर: या उपक्रमाचे उत्तर पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.) आणि त्या पानावरील पक्षांची माहिती लिहा.



मुलांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
स्वध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.

 

हे सुद्धा पहा

पाचवी मराठी

येथे क्लिक करा.

पाचवी परिसर अभ्यास भाग -१

येथे क्लिक करा.

पाचवी परिसर अभ्यास भाग -

येथे क्लिक करा.

पाचवी गणित

लवकरच

पाचवी  इंग्रजी

लवकरच

खालील तुमच्या वर्गावर क्लिक करा

स्वाध्याय आणि ऑनलाईन टेस्ट पहा.

४थी

५वी

६वी

७वी

THANK YOU…!


मुलांनो हा स्वाध्याय तुम्ही खालील प्रामाणे देखील शोधू शकता.

५वी स्वाध्याय
५वी परिसर अभ्यास भाग 1 स्वाध्याय
पाचवी परिसर अभ्यास भाग 1 पर्यावरणाचे संतुलन
पर्यावरणाचे संतुलन प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
5th swadhyay
Parisar abhyas bhag 1 swadhya
Paryavarnache santulan questions and answers
Paryavarnache santulan 5vi swadhyay

 


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.