३. पृथ्वी आणि जीवसृष्टी | Pruthvi aani jivsrushti 5th

५वी स्वाध्याय ५वी परिसर अभ्यास भाग 1 स्वाध्याय पाचवी परिसर अभ्यास भाग 1 पृथ्वी आणि जीवसृष्टी स्वाध्याय पृथ्वी आणि जीवसृष्टी प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५
Admin

 

३. पृथ्वी आणि जीवसृष्टी


५वी स्वाध्याय ५वी परिसर अभ्यास भाग 1 स्वाध्याय पाचवी परिसर अभ्यास भाग 1 पृथ्वी आणि जीवसृष्टी स्वाध्याय पृथ्वी आणि जीवसृष्टी प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी 5th swadhyay Parisar abhyas bhag 1 swadhya Pruthvi aani jivsrushti questions and answers Pruthvi aani jivsrushti 5vi swadhyay

३. पृथ्वी आणि जीवसृष्टी | Pruthvi aani jivsrushti 5th 


स्वाध्याय



प्र.१. काय करावे बरे ?


उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात .

उत्तर:  उन्हात फिरल्याने आपल्या त्वचेवर चट्टे पडतात हे होऊ नये म्हणून पुढील उपाय करता येतील

१)                कडक उन्हात जाणे टाळावे

२)               बाहेर जायचे असल्यास छत्री , टोपी , पूर्ण अंग झाकेल असे कपडे , सनग्लास, तोंडाला रुमाल बांधावा.

३)               उन्हातून घरी येताच थंड पाण्याने हात पाय स्वच्छ धुवावेत.

 

प्र.२. जरा डोके चालवा .


(अ)        सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत ?

उत्तर: १) पृथ्वीतलावरच्या शिलावरण आणि जलावरण या आवरणात सूक्ष्म जीव आढळतात.

२) जैविक कचऱ्याचे विघटन करणे हे सुक्ष्मजीवांचे मुख्य कार्य आहे.

३) सूक्ष्मजीव अन्नसाखळीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात.

४) सुक्ष्मजीव नसते तर जमिनीवरील सारा कचरा विघटन न होता तसाच साचून राहिला असता. त्यामुळे सूक्ष्मजीव महत्वाचे आहेत.


(आ)     समुद्रातून मिळणारे अन्न, यावर विचार करा, माहिती मिळवा आणि दहा ओळी लिहा.

उत्तर: १) समुद्रामध्ये जलचर राहतात. त्यापैकी काही जलचर हे माणसाचे अन्न आहेत.

२) समुद्रामध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या माश्यांचा माणूस खाद्य म्हणून उपयोग करतो.

३) खेकडा, कालाव असे कवचधारी जलचर माणूस आवडीने खातो.

४) समुद्रात आढळणारे विविध प्रकारच्या  शैवाल चा  प्रदेशात खाद्य म्हणून वापर केला जातो.

५) समुद्री शैवालांपासून अगार हा पदार्थ मिळवितात आणि त्याचा उपयोग जेली सारख्या पदार्थांमध्ये घट्टपणा आण्यासाठी करतात.

६) आपण जेवणाला चव येण्यासाठी वापरत असलेले मीठ सुद्धा समुद्राच्याच पाण्यापासून तयार केले जाते.

७) समुद्रातून मिळणाऱ्या माश्यांचा उपयोग मत्स्यशेती करण्यासाठी केला जातो.

८) भारतीय समृद्रातून मिळणाऱ्या माशांची व इतर खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात केली जाते.

९) समुद्रातून मिळणारे खाद्यपदार्थ हे समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांचे उपजीविकेचे साधन आहे.

१०)  भारतीय समुद्र किनारपट्टीवर राहणारे लोक मोठ्या प्रमाणावर समुद्री खाद्यपदार्थ खातात.  

 

 

प्र.३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .


(अ)        ढग कशाचे बनलेले असतात?

उत्तर: ढग बाष्पाचे बनलेले असतात.

 

(आ)     जीवावरण कशाला म्हणतात?

उत्तर: शिलावरण , जलावरण व वातावरण  यांच्याध्ये सजीवांचे अस्तित्व असते. या आवरणातील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात.


(इ)    तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी करा.

त्यांतील कोणत्याही दोन भूरूपांचे वर्णन करा .

उत्तर: माझ्या घराजवळील भूरूपे

१)    मैदान

२)   खिंड

३)   टेकडी

वर्णन

१)    टेकडी:  डोंगराच्या लहान भागाला टेकडी असे म्हणतात.

२)   मैदान: जमिनीवरच्या सपाट भागाला मैदान असे म्हणतात.

 

प्र.४. पुढील दोन वाक्यांतील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा .

 

(अ)       अमीनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे.


(आ)    रिया पठारी भागात राहते .

 

 

प्र.५. माहिती लिहा.


(अ)       बाष्पीभवन

उत्तर: उष्णतेमुळे जमिनीवर असलेल्या पाण्याचे वाफेमध्ये रुपांतर होते या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात.

सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते.

जमिनीत जीरलेले पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते.

हे बाष्प जेव्हा उंचावर जाते तेव्हा त्याचे संघनन होऊन पुन्हा ते पावसाच्या रुपात पृथ्वीवर येते.


(आ)    संघनन

उत्तर: सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. हे बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते. उंचावर जात अस्तात्ना ते थंड होत जाऊन त्याचे पुन्हा पाण्याच्या थेंबात रुपांतर होते. या क्रियेला संघनन असे म्हणतात.



(इ)  जलचक्र

उत्तर: बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संघननामुळे पावसाच्या रुपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला मिळते. पाण्याचे बाष्पीभवन व संघनन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात, यालाच जलचक्र असे म्हणतात.

 

प्र. ६. कोणतीही दोन उदाहरणे लिहा.


(अ)       हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी.

उत्तर:  चक्रीवादळ येणे, जोराचा वारा सुटणे, धुके येणे, ढग तयार होणे.


(आ)      पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे .

उत्तर: नदी, ओढा, समुद्र, सरोवर, हिमनग .

 

प्र.७. जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा .

 उत्तर: 

५वी स्वाध्याय ५वी परिसर अभ्यास भाग 1 स्वाध्याय पाचवी परिसर अभ्यास भाग 1 पृथ्वी आणि जीवसृष्टी स्वाध्याय पृथ्वी आणि जीवसृष्टी प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी 5th swadhyay Parisar abhyas bhag 1 swadhya Pruthvi aani jivsrushti questions and answers Pruthvi aani jivsrushti 5vi swadhyay

जलचक्र आकृती.




मुलांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.

स्वध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.



 THANK YOU…!



मुलांनो हा स्वाध्याय तुम्ही खालील प्रामाणे देखील शोधू शकता.

५वी स्वाध्याय
५वी परिसर अभ्यास भाग 1 स्वाध्याय
पाचवी परिसर अभ्यास भाग 1 पृथ्वी आणि जीवसृष्टी स्वाध्याय
पृथ्वी आणि जीवसृष्टी प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
5th swadhyay
Parisar abhyas bhag 1 swadhya
Pruthvi aani jivsrushti questions and answers
Pruthvi aani jivsrushti 5vi swadhyay

 


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.