२. पृथ्वीचे फिरणे
२. पृथ्वीचे फिरणे | Pruthviche firane swadhyay |
स्वाध्याय
प्र.१. काय करावे बरे ?
अमितला त्याच्या आजीला घेऊन
ऑस्ट्रेलियाला जायचे आहे . आजीला थंडीचा त्रास होतो , तर
त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे?
उत्तर:
प्र. २. जरा डोके चालवा .
(अ) पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात ?
उत्तर: पृथ्वीचे एक परिभ्रमण
३६५ दिवसांत पूर्ण होते. पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी १ दिवस म्हणजे २४
तास लागतात. म्हणजेच पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची ३६५ परीवलने होतात.
(आ) अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे.
पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा. मुंबई (महाराष्ट्र) , कोलकता (पश्चिम बंगाल) , भोपाळ (मध्यप्रदेश) , नागपूर (महाराष्ट्र).
उत्तर: कोलकता (पश्चिम बंगाल) , भोपाळ (मध्यप्रदेश) , नागपूर (महाराष्ट्र). मुंबई (महाराष्ट्र)
प्र.३. रिकाम्या जागी योग्य
शब्द भरा .
(अ)
पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास ..............
म्हणतात .
उतर: परिवलन
(आ)
पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास .................म्हणतात
.
उत्तर: परिभ्रमण
(इ)
पृथ्वीच्या परिवलनामुळे ........... व
........... होते.
उत्तर: दिवस व रात्र
प्र.४ . कशाला म्हणतात ?
(अ)
पौर्णिमा
उत्तर: सूर्याचा प्रकाश
चंद्रावर पडल्याने तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा
पूर्ण भाग आपल्याला दिसतो त्याला पोर्णिमा असे म्हणतात.
(आ)
अमावास्या
उत्तर: ज्या रात्री पृथ्वीवरून
चंद्राचा कोणताच भाग दिसत नाही तला अमावस्या असे म्हणतात.
(इ)
चांद्रमास
उत्तर: एका अमावस्येपासून
दुसऱ्या अमावस्ये पर्यंतच्या काळ सुमारे २८ ते ३० दिवसांचा असतो या काळाला ‘चांद्रमास’
म्हणतात.
(ई)
तिथी
उत्तर: चांद्रमासातील प्रत्येक
दिवसाला तिथी असे म्हणतात.
प्र.५. प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) विषुववृत्त म्हणजे काय ?
उत्तर: उत्तर आणि दक्षिण
धृवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान
भाग होतात. पृथ्वीवर काढलेल्या या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात.
(आ) विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते?
उत्तर: विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हे आहेत.
(इ) उपक्रम मराठी दिनदर्शिकेतील कोणत्याही एका महिन्याच्या अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या तसेच पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतच्या तिथींची नावे नोंद करून त्याविषयी अधिक माहिती घ्या .
मुलांनो हा स्वाध्याय तुमच्या
मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
स्वध्यायाची माहिती आवडल्यास
आम्हाला कमेंट करून सांगा.
मुलांनो हा स्वाध्याय तुम्ही
खालील प्रामाणे देखील शोधू शकता.