१०.रंग जादूचे पेटीमधले
रंग जादूचे पेटीमधले पाठ इयत्ता पाचवी स्वाध्याय | Rang jaduche petimadhale 5th std swadhyay questions answers
स्वाध्याय
प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा .
(अ) हिरवे राघू
कोठे उडत आहेत ?
उत्तर:
हिरवे राघू आभाळात उडत आहेत.
(आ) निर्झर
कोठून व कसे वाहतात ?
उत्तर:
निर्झर डोंगरातून खळखळ वाहतात.
(इ)
चित्रातील भिंती कशा तयार होतात ?
उत्तर:
नेमक्या चार रेषांमध्ये चित्रातील भिंती तयार होतात.
(ई)
पाऊलवाटेवरून कोण येते?
उत्तर:
पाउलवाटेवरून साखेसोबती येतात.
प्र.२. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) इंद्रधनुष्यातील रंगांना ‘ जादूच्या पेटीतील रंग ' असे का म्हटले आहे?
उत्तर:
इंद्रधनुष्यामध्ये सात प्रकारचे रंग असतात. पावसाच्या थेंबातून जेव्हा प्रकाशकिरणे
जातात. तेव्हा त्या पांढर्या रंगातून अनुक्रमे तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा,
निळा, पारवा व जांभळा असे सात रंग तयार होतात. हे सात प्रकारचे रंग पांढऱ्या रंगात
लपलेले असतात, म्हणजे ही जादूच आहे. म्हणून इंद्रधनुष्यातील रंगांना ‘जादूच्या
पेटीतले रंग असे म्हटले आहे.
(अ)
कवितेत दिलेल्या प्रत्येक रंगाच्या प्रत्येकी
पाच - पाच गोष्टींची नावे लिहा.
उत्तर:
पांढरा : पांढरा कागद, पांढरी गाय, पंधरा प्रकाश,
पांढरा रुमाल, पांढरे पक्षी.
निळा: निळे आकाश, निळी शाई, निळे पाकीट, निळा पेन, निळी
पट्टी.
हिरवा: हिरवे झाड, हिरवे पान, हिरवा शालू, हिरवी मिरची, हिरवा
पोपट.
लाल: लाल टोपी, लाल चोच, लाल पेन, लाल रुमाल, लाल शर्ट.
काळा : शाई, धग, अंधार, शर्ट , इजार.
जांभळा: वेल, जांभूळ, शर्ट, वांगे, कापड.
रुपेरी: वाळू, चंद्र, मुकुट, साडी , चांदणे.
तांबडा: रुमाल , टेबल, माती, साडी, शर्ट.
प्र.३. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा .
(अ) आभाळ = गगन
(आ) निर्झर = झरा.
(ई) घर = सदन
प्र.४. तुम्हाला कोणत्या रंगाचे कपडे जास्त आवडतात? ते का आवडतात ते
सांगा.
उत्तर: मला सोनेरी रंगाचे कपडे आवडतात कारण माझ्यावर सोनेरी
रंग छान शोभून दिसतो.
मित्रांनो हा निबंध तुम्ही खालील प्रमाणे देखील शोधू शकता.