८. सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा.
८. सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा. | Sarvajanik suvidha aani mazi shaala 5th |
स्वाध्याय
प्र.१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(अ) सुविधांचा वापर आपण .......... केला पाहिजे.
उत्तर: जबाबदारीने
(आ) आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे ........... असते.
उत्तर: जग
(इ) शाळेच्या जडणघडणीत ........... वाटा असतो.
उत्तर: समाजाचा
प्र. २) पुढील प्रश्नांची एका
वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) महत्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत?
उत्तर: पाणीपुरवठा, वीजपुरवठा,
आरोग्यसेवा, शिक्षण आणि वाहतूक या काही महत्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत.
(आ) सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते?
उत्तर: सार्वजनिक सेवा या सेवा
देणाऱ्या संस्था आणि सेवा उपभोगणारे आपण सर्व लॉक मिळून सार्वजनिक व्यवस्था
निर्माण होते.
(इ) प्रत्येक मुलामुलींचा कोणता हक्क आहे?
उत्तर: प्रत्येक मुलामुलींना
शिक्षणाचा हक्क आहे.
प्र.३) पुढील प्रश्नांची दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा
(अ) आपण कोणकोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो ?
उत्तर:
1. आपण
बस सेवा, रेल्वे सेवा इत्यादी सार्वजनिक वाहतूक सेवा.
2. टपाल , दूरध्वनी, अग्निशमन दल, पोलिस, बँका,
नाट्यगृहे, बाग बगीचे, यांसारख्या सार्वजनिक सेवांचा आपण वापर करतो.
(आ) शाळेत शिक्षक - पालक
आणि माता - पालक संघ का असावेत?
उत्तर:
1. शाळेतील
शिक्षक पालक आणि माता-पालक संघांमुळे शिक्षक आणि पालक यांच्यात संवाद होतो.
2. शाळेच्या
विविध उपक्रमांत पालकांचा सहभाग वाढतो.
3. एकमेकांच्या
मतांची देवाणघेवाण होते.
प्र. ४) काय होईल ते लिहा .
(अ) मुलामुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही, तर
उत्तर:
१) मुलींचे शिकण्याचे प्रमाण कमी होईल
२) समाजामध्ये विषमता निर्माण होईल.
३) समाजात निरक्षरतेचे प्रमाण वाढीस लागेल.
(आ) समाजाने शाळेला मदत केली नाही , तर .
उत्तर:
१) शाळेच्या प्रगतील अडथळे निर्माण होतील.
२) विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतील.
३) शाळेच्या समस्या वाढतील.
(इ) सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला, तर. नाही, तर.
उत्तर:
१) सार्वजनिक सुविधांची कार्यक्षमता वाढेल.
२) सार्वजनिक सुविधांवरील खर्चामध्ये बचत होईल.
३) नवनवीन सुविधांची निर्मिती करण्यासाठी हातभार लागेल.
मुलांनो हा स्वाध्याय तुमच्या
मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.
स्वध्यायाची माहिती आवडल्यास
आम्हाला कमेंट करून सांगा.
मुलांनो हा स्वाध्याय तुम्ही
खालील प्रामाणे देखील शोधू शकता.