७.आपले परमवीर इयत्ता सहावी स्वाध्याय मराठी | Aapale paramvir swadhyay prashn uttare

 ७.आपले परमवीर

आपले परमवीर इयत्ता सहावी मराठी पाठ ६ स्वाध्याय प्रश्न उत्तरे / आपले परमवीर पाठ प्रश्न उत्तरे / इयत्ता सहावी मराठी आपले परमवीर पाठ प्रश्नउत्तरे / इयत्ता सहावी विषय मराठी आपले परमवीर स्वाध्याय / आपले परमवीर झाला स्वाध्याय इयत्ता सहावी.

स्वाध्याय


आपले परमवीर इयत्ता सहावी मराठी पाठ ६ स्वाध्याय प्रश्न उत्तरे / आपले परमवीर पाठ प्रश्न उत्तरे / इयत्ता सहावी मराठी आपले परमवीर पाठ प्रश्नउत्तरे / इयत्ता सहावी विषय मराठी आपले परमवीर स्वाध्याय / आपले परमवीर झाला स्वाध्याय इयत्ता सहावी.

आपले परमवीर स्वाध्याय 



प्र. १. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.


(अ)        फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ सावध का होते?

उत्तर:     शत्रूची सहा सेबर जेट विमाने हल्ला करण्यासाठी श्रीनगर हवाईक्षेत्राकडे झेपावली. हे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ यांना माहिती होते. त्यामुळे ते प्रतिहल्ला करण्यासाठी सावध होते.

 

(आ)     फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती?

उत्तर:     धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुराळ्यामुळे त्यांना उड्डाण करण्यात अडचण येत होती. त्यातच धावपट्टी थोडी दिसायला लागायच्या आतच शत्रूची विमाने माथ्यावर, अगदी जवळून घोंघावू लगली होती, गोळ्यांच्या फैरी झाडत होती.


(इ)      निर्मलजीत सेखाँनी निकराची लढाई चालू का ठेवली?

उत्तर:     शत्रूची विमाने माथ्यावर, अगदी खालन घोंगावू लागली होती, गोळ्यांच्या फैरी झाडत होती. तरीही प्राणाची पर्वा न करता फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँनी नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला. पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला.  जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली. कारण त्यांना श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्र वाचवायचे होते.

 

(ई)    निर्मलजीत सेखाँनी श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्राचा बचाव कसा केला?

उत्तर:     प्राणाची पर्वा न करता फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँनी नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला. पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला.  जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली. शत्रू संख्येने जास्त होते; पण त्यांच्याशी धाडसाने दोन हात केल्यामुळे  शत्रू पाठ दाखवून पळून गेले.  अशा प्रकारे निर्मलजीत सेखाँनी श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्राचा बचाव केला.

 

उ) दधीची ॠषींनी लोककल्याणासाठी कोणता त्याग केला?

उत्तर:     एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेले. निष्पाप माणसे पाण्यावाचून तडफडू आणि मरू लागली. या राक्षसावर कोणत्याच साध्यासुध्या शस्त्राचा परिणाम होईना- मग ते लाकडाचे असावे , नाहीतर धातूचे. त्याला हरवेल असे अमोघ शस्त्र बनवण्यासाठी काहीतरी दिव्य पदार्थ हवा होता. दधीची ॠषींच्या हाडांमध्ये असे दिव्य सामर्थ्य होते आणि दधीची ॠषींचे मानसिक सामर्थ्यही तेवढेच मोठे होते. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःच आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्या अस्थींचे दान केले.

 

प्र. २. फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ हे शत्रूशी धैर्या ने लढले. त्याचे पाच-सहा वाक्यांत वर्णन करा.

उत्तर:     १४ डिसेंबर १९७१ रोजी श्रीनगरवर हल्ला करण्यासाठी सहा सेबर जेट विमाने झेपावली. धावपट्टीवर अचानक उडालेल्या धूरळ्यामुळे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ यांना उड्डाण करण्यात अडचण निर्माण झली  होती. तोपर्यत शत्रूची विमाने अगदी जवळून गोळ्यांच्या फैरी झाडू लागली तेव्हा आपल्या प्राणांची पर्वा न करता नॅट विमान क्षणार्धात वरझेपावले. त्यांनी हल्लेखोर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला. पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी

अचूक वेध घेतला. शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना

निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली. त्यांच्या या धाडसी हल्ल्याला दाखऊन शत्रू पळून गेले. श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्र बचावले. परंतु या भीषण युद्धात फ्लाईंग ऑफिसर सेखाँचे विमानही कोसळले आणि त्यांनी आपले प्राण गमावले.

 

प्र. ३. परमवीरचक्रधारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते?

उत्तर:     परमवीर चक्र धारकांची माहिती वाचून आपल्याला प्रेरणा मिळते. त्यांनी केलेल्या कामाबाबत आपल्याला अभिमान वाटतो. आपणही देशसेवा करावी ही प्रेरणा मिळते. आपले जीवन देशहितासाठी वाहून द्यावे ही स्फूर्ती मिळते.

 

प्र. ४. आपले परमवीर व दधीची ॠषी यांच्यात तुम्हांला कोणते साम्य आढळते?

उत्तर:     आपले परमवीर देशातील जनतेची रक्षा करण्यासाठी आपले प्राण संकटात टाकून देशाच्या सीमेचे रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून  पहारा देतात. काही वेळेला तर स्वतःचा जीव सुद्धा या भूमीला अर्पण करतात. दधिजी ऋषींनी सुद्धा लोकांचे कल्याण व्हावे यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. लोककल्याणासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता बलिदान धने, हे साम्य दोघांमध्ये ही आढळते.

 

प्र. ५. परमवीर चक्राची माहिती खालील मुद्द्यांनुसार लिहा.

धातू | कापडी पट्टीचा रंग | पदकाची दर्शनी बाजू | पदकाची मागची बाजू | पदकावरील कोरलेले शब्द | भाषा | पुष्प

उत्तर: परमवीर चक्र ही कांस्य या धातूचे बनलेले असते.

परमवीर चक्राला असणाऱ्या छोट्या दांडीवर फिरेल अशी गडद जांभळ्या रंगाची कापडी पट्टी असते.

परमवीर चक्राच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे बोधचिन्ह कोरलेले असते.

पदकाच्या मागील बाजूला परमवीर चक्र हे शब्द हिंदीत व इंग्रजीत गोलाकार कोरलेले असतात. त्यांच्या मध्यभागी दोन कमल पुष्पे रेखाटलेली असतात.

 

प्र. ६. परमवीर चक्र पदकाचे डिझाइन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर यांची सहा-सात वाक्यांत माहिती लिहा.

उत्तर:     परमवीर चक्राचे डिझाइन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले. त्या मुळच्या युरोपात राहणाऱ्या होत्या. भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या भारतात आल्या. भारतावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. सावित्रीबाई खानोलकर यांनी भारताचे नागरिकत्व स्विकारले . त्यांनी भारतातील कला, संस्कृती आणि परंपरांचा अभ्यास केला. मराठी संस्कृत व हिंदी या भाषा त्यांना अवगत होत्या. अगदी सफाईपणे त्या या भाषांत संवाद साधत असत.

 

आपले परमवीर झाला स्वाध्याय इयत्ता सहावी. / Aapale paramvir eyatta sahavi swadhyay prshn uttare / Iyatta sahavi Vishay Marathi aapale paramvir swadhyay / Aapale paramvir swadhyay path prshn uttare

खेळूया शब्दांशी


(अ) खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.

(अ) घोंगावणे.

वाक्य : दुकानातील मिठाईवर माश्या घोंघावत होत्या.

(आ)     झेपावणे.

वाक्य: वाघ हरणाच्या दिशेने झेपावला.

(इ)     वेध घेणे.

वाक्य: एकलव्याने पक्षाच्या डोळ्याचा अचूक वेध घेतला.

(ई) वेढणे.

वाक्य: नदीच्या पाण्याने काठावरील मोठ्या झाडाला वेढले.

(उ) बचावणे.

उत्तर: कुत्र्यांच्या हल्यापासून राजू थोडक्यासाठी बचावला.

(ऊ) सामोरे जाणे.

वाक्य: सीमेवरील सैनिक कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी कायम तयार असतात.

 

(आ) समानार्थी शब्द लिहा.

(अ) सावध = सजग

(आ) लढाई = युद्ध

(इ) प्रत्यक्ष = समोर

(ई) शत्रू = वैरी / दुश्मन

 

आपण समजून घेऊया.

·       खालील वाक्यांतील संबंधी सर्वनामे अधोरेखित करा.

१. ज्यांनी बचत केली, त्यांनी आपले भविष्य सुरक्षित केले.

२. ज्याला खुंटावरचा खो खो खेळता येतो, त्याला गोल खो खो खेळता येतोच.

३. जे दुसऱ्याला मदत करतात, ते लोकप्रिय होता

मित्रांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

त्यांनाही अभ्यास करताना याचा फायदा होईल

 

आपले परमवीर इयत्ता सहावी मराठी पाठ ६ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
आपले परमवीर पाठ प्रश्न उत्तरे
इयत्ता सहावी मराठी आपले परमवीर पाठ प्रश्नउत्तरे
इयत्ता सहावी विषय मराठी आपले परमवीर स्वाध्याय
आपले परमवीर झाला स्वाध्याय इयत्ता सहावी.
Aapale paramvir eyatta sahavi swadhyay prshn uttare
Iyatta sahavi Vishay Marathi aapale paramvir swadhyay
Aapale paramvir swadhyay path prshn uttare

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.