६. पण थोडा उशीर झाला...
पण थोडा उशीर झाला इयत्ता सहावी मराठी पाठ ६ स्वाध्याय प्रश्न उत्तरे / पण थोडा उशीर झाला पाठ प्रश्न उत्तरे / इयत्ता सहावी मराठी पण थोडा उशीर झाला पाठ प्रश्नउत्तरे / इयत्ता सहावी विषय मराठी पण थोडा उशीर झाला स्वाध्याय / पण थोडा उशीर झाला स्वाध्याय इयत्ता सहावी.
स्वाध्याय
६. पण थोडा उशीर झाला... सहावी मराठी स्वाध्याय |
प्र. १. दोन-तीन वाक्यांत
उत्तरे लिहा.
(अ) लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते?
उत्तर: अतिशय खडतर
हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे, हे सैनिकाच्या आयुष्यातील
प्रचंड अवघड काम असते. अतिशय थंड हवामानात व सतत धगधगनारी तणावपूर्ण सीमा या
प्रतिकूल स्थितीत ही सेवा करायची असते म्हणून हे काम अवघड वाटते.
(आ) पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड का उडत असे?
उत्तर: बटालियनमध्ये आठ पंधरा दिवसांतून एकदा पोस्टमन येत असे. सैनिक गावापासून दूर एकटे असायचे. त्यांना गावाची ओढ असायची. गावाकडून आलेलं पत्र त्यांच्या आठवणींना उजाळा देत असे. आणि पुन्हा जोशात कामावर उभे राहण्यासाठी बळ देत असे. म्हणून पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड उडत असे.
उत्तर: गावाकडून आलेल्या
सुखदेवने लेखकाला गावाकडचा सांगावा सांगितला. लेखकाची आई खूप आजारी होती. आईने
त्याच्यासाठी निरोप पाठवला होता. तिचा प्रत्येक शब्द लेखकाच्या मनाचा ठाव घेत
होता. त्याचे मन ढसाढसा रडत होते. डोळ्यांत एकसारखे अश्रू ओघळत होते. लेखकाचा जीव
घाबराघुबरा होऊ लागला व मन सैरभैर झाले.
प्र. २. का ते लिहा.
(अ) कारगीलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो.
उत्तर: पावसाळा आणि हि वाळा
जेवढा जीवघेणा, तेवढाच उन्हा ळा सुखावह आणि आल्हाददायी. उन्हाळ्यात
पहाडावरील बर्फ वितळून
पर्व तरांगा हिरव्या रंगाने
नटून जातात. जमीन अशी दिसतच नाही; जणू वसुधेने हिरवागार शालू परिधानकेला
आहे. असा रमणीय निसर्ग लेखकांचे मन उल्हसित करायचा. म्हणून कारगीलमधील उन्हाळा
लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो.
(आ) लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे.
उत्तर: पत्नीने पाठवलेलं
अंतर्देशीय पत्र पाठवले होते. ते घेऊन लेखन बंकरकडे वळले. त्या पत्रात काहीच मजकूर
नव्हता. पत्नीच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय
काहीच लिहिलेलं नव्हतं. त्या पत्रावरून आईची खालावलेली तब्येत लिखाणाशिवायच कळली.
ते पत्र मजकुराविना खूप काही बोलून गेले. म्हणून
लेखकाने पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे.
(इ) गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटते.
उत्तर: आईची आजारपणाची
बातामिकाल्तच लेखक सामानाचा परसरा आवरून गावाला जायला निघाला. आठ-दहा दिवसांचा
प्रवास होता. वेळ सरता सरत नव्हता. आईला कधी एकदा पाहीन असे लेखकाला झाले होते.
तिच्या मायेच्या स्पर्शासाठी तो आसुसलेला होता. त्या त्याच्या अस्वस्थ स्थितीमुळे
गावाला जाताना रस्ता कटता कटत नव्हता, असे लेखकाला वाटले.
(ई) पण थोडा उशीर झाला... असे लेखकाने म्हटले आहे.
उत्तर: लेखन आजारी आईच्या
भेटीच्या ओढीने गावाच्या वेशीवर आले , तसेगावातील लोक जो
तो हातातलंकाम सोडून त्यांच्याकडे कावराबावरा होऊन पाहू लागला. हातातल्या जाडजूड
ट्रंका तिथंच टाकून लेखन घराच्या दिशेनं धावत सुटले. लेखक वाड्याच्या दरवाजातूनआत
पाऊल टाकताच बहिणी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागल्या . सर्व भाऊबंद मना खाली
घालून बसले होते. लेखकाची नजर आईला शोधण्यासाठी घरभर फिरत होती. मन आतुर झाले
होते. पण लेखकाला जाणीव झाली की आई यापुढे कधीच त्याला दिसणार नव्हती. लेखकाला न
भेटताच तिने जगाचा निरोप घेतला होता. ; म्हणून थोडा उशीर झाला..... असे लेखकाला
म्हटले आहे.
प्र. ३. पोस्टातील पत्राचा
प्रवास कसा होतो ते माहीत करून घ्या.
उत्तर:
प्र. ४. वसुंधरेचे व
सैनिकाच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हांला आवडलेली वाक्ये पाठातून शोधून लिहा.
उत्तर:
वसुंधरा: उन्हाळ्यात
फडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्याकंचा रंगाने नटून जातात; जणू वासुधेने
हिरवागार शालू परिधान केला आहे.
सैनिकाचे मन: रमणीय निसर्ग
आमचे मन उल्हासित करायचा. आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकांचं मन चंद्रमाण्यासारख
पाझरून कधी वाहू लागायचं, ते समजायचं नाही. गावाकडच्या आठवणीना उजाळा देत पुन्हा
नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो.
प्र. ५. तुम्हांला एका
सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी प्रश्न तयार करा.
उत्तर:
१) तुम्हाला सैनिक
व्हावे असे का वाटले?
२) सैनिक होण्यासाठी तुम्ही
कोणती मेहनत घेतली?
३) घरातील माणसाच्या
प्रतिक्रिया काय होत्या ?
४) तुमच्या कामगिरीचा एखादा
रोमहर्षक क्षण सांगा?
५) तुम्ही नव्या युवा पिढीला
कोणता संदेश द्याल?
प्र. ६. सैनिक जसे देशाचे रक्षण
करतात,
तसे तुम्हांला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते?
उत्तर:
१) देशाचा सुजाण नागरिक म्हणून कर्तव्ये पार पाडणे .
२) राष्ट्रीय एकात्मता टिकवणे .
३) राष्ट्रप्रेमाचा प्रसार करणे.
प्र. ७. कारगील या ठिकाणचे
विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द आकृतीत लिहा.
उत्तर: कारगील
- दुर्गम प्रदेश
- अतिशय खडतर हवामान
- अतिशय थंड हवामान
- सतत धगधगती तणावपूर्ण सीमा
Pan thoda usher zala eyatta sahavi swadhyay prshn uttare
Iyatta sahavi Vishay Marathi pn thoda usher zala swadhyay
Pn thoda usher zala swadhyay path prshn uttare
खेळूया शब्दांशी.
(अ) ‘मन’ शब्द असलेले पाठातील वाक्प्रचार लिहा.
उत्तर:
१) मन
उल्हासित होणे
२) मन
चंद्रमाण्यांसारखे पाझरणे
३) जीव
तीळतीळ तुटणे
४) अभिमानाने
फुलून येणे.
५) अंतरंगाचा
ठाव घेणे
६) जीव
घाबराघुबरा होणे.
७) मन
हेलावणे
८) मन आतुरणे
(आ)
‘पाव्हणेरावळे’ यासारखे तुम्हांला
माहीत असलेले जोडशब्द लिहा. त्या जोडशब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
उत्तर:
1.
सणवार: श्रावण महिन्यामध्ये अनेक
सणवार साजरे केले जातात.
2.
घाबराघुबरा: समोर वाघ बधून माझा जीव
घाबराघुबरा झाला.
3.
कावराबावरा: अचानक जमेलेली गर्दी
पाहून मी कावराबावरा झालो.
(१)
हात आहेत; पण हालवत नाही. = खुर्ची
(२) पाय आहेत; पण चालत नाही. = टेबल
(३) दात आहेत; पण चावत नाही. = फणी
(४) नाक आहे; पण श्वास घेत नाही. = सुई
(५) केस आहेत; पण कधी विंचरत नाही. =ब्रश
मित्रांनो हा स्वाध्याय
तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.
त्यांनाही अभ्यास करताना याचा
फायदा होईल