5. जिल्हा प्रशासन सहावी नागरिकशास्त्र प्रश्न उत्तरे | Jlha prashasan 6th swadhyay prashn uttare

5. जिल्हा प्रशासन स्वाध्याय उत्तरे

जिल्हा प्रशासन  स्वाध्याय / जिल्हा प्रशासन स्वाध्याय इयत्ता सहावी स्वाध्याय / जिल्हा प्रशासन स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी / जिल्हा प्रशासन याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे / Jilha prashasan shasan sanstha   uttare eyatta sahavi / Jilha prashasan eyatta sahavi swadhyay

स्वाध्याय

प्र.१ एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

उत्तर: जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो.


(२)   तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते?

उत्तर: तालुक्यात शांतात व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते.


(३)    न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते?

उत्तर: न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते.


(४)    कोणकोणत्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते?

उत्तर: पूर, वादळ यांसारख्या आपतींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते.

 

जिल्हा प्रशासन  स्वाध्याय जिल्हा प्रशासन स्वाध्याय इयत्ता सहावी स्वाध्याय जिल्हा प्रशासन स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी जिल्हा प्रशासन याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Jilha prashasan shasan sanstha   uttare eyatta sahavi Jilha prashasan eyatta sahavi swadhyay

5. जिल्हा प्रशासन सहावी नागरिकशास्त्र प्रश्न उत्तरे


प्र.२ जोड्या जुळवा.

 

अ गट

ब गट ( उत्तरे)

(अ) जिल्हाधिकारी

(२) कायदा व सुव्यवस्था

(आ) जिल्हा न्यायालय

 (३) तंटे सोडव

(इ) तहसीलदार राखणे

(१) तालुका दंडाधिकारी

 

प्र. ३ खालील मुद्‌द्यांवर चर्चा करा.

(१)  आपत्ती व्यवस्थापन

उत्तर:

१)    आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला ‘आपत्ती व्यवस्थापन’ असे म्हणतात.

२)  आपत्ती व्यवस्थापनात संपूर्णजिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता पूर्वसूचना मिळू शकते.

३)   पुराची, वादळाची पूर्वसूचना देणारी आधुनिक प्रणाली विकसित झाली आहे. या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते.


(२)   जिल्हाधिकाऱ्यांची कामे

उत्तर:

१)    शेतसारा गोळा करणे.

२)   शेतीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे.

३)   दुष्काळ व चाऱ्याची कमतरता यांवर उपाययोजना करणे.

४)  जिल्ह्यात शांतात प्रस्थापित करणे.

५)  सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे.

६)   सभाबंदी, संचारबंदी, जारी करणे.

७) निवडणूक योग्य प्रकारे पार पडणे.

८)  निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक ते निर्णय घेणे.

९)   आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे.

१०)   आपत्ती ग्रास्तांचे पुनर्वसन करणे.

 

प्र.४ तुम्हांला यांपैकी कोण व्हावेसे वाटते व का ते सांगा.


(१)   जिल्हाधिकारी

उत्तर: जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. त्याची नेमणूक राज्यशासन करते. जिल्हाधिकाऱ्याला शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात. म्हणून मला जिल्हाधिकारी व्हावेसे वाटते.

(२)  जिल्हा पोलीस प्रमुख

उत्तर: मला जिल्हा पोलीस प्रमुख व्हावेसे वाटते कारण, जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो. त्या जिल्ह्याचा तो प्रमुख पोलीस अधिकारी असतो. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर असते.


(३)   न्यायाधीश

उत्तर: आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडवणे, तंट्यात न्यायनिवाडा करणे आणि संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवरील न्यायालयाला करावी लागतात. म्हणून मला न्यायाधीश होऊन जिल्ह्यातील तंटे सोडून शांतता प्रस्थापित करणे महत्वाचे वाटते.

 

 

जिल्हा प्रशासन  स्वाध्याय
जिल्हा प्रशासन स्वाध्याय इयत्ता सहावी स्वाध्याय
जिल्हा प्रशासन स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी
जिल्हा प्रशासन याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Jilha prashasan shasan sanstha   uttare eyatta sahavi
Jilha prashasan eyatta sahavi swadhyay

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.