४. आपत्ती व्यवस्थापन इयत्ता सहावी सामान्य विज्ञान स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Aapatti vyavsthapn 6th swadhyay prashn uttare

४. आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय प्रश्न उत्तरे 


आपत्ती व्यवस्थापन  इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / आपत्ती व्यवस्थापन  प्रश्न उत्तर / आपत्ती व्यवस्थापन  स्वाध्याय / सहावी सामान्य विज्ञान आपत्ती व्यवस्थापन  स्वाध्याय उत्तरे / Aapatti vyavsthapn swadhyay prashn uttare / Aapatti vyavsthapn   prashn uttr / 6th vidnyan swadhyay prashn uttare.

स्वाध्याय


प्र.१. आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक सांगा ?


अ . पोलीस नियंत्रण कक्ष

उत्तर: १००


आ . अग्निशामक यंत्रणा

उत्तर: १०१


 इ . रुग्णवाहिका

उत्तर: १०२


ई . देशपातळीवरील एकच आपत्कालीन नंबर

उत्तर: १०८

आपत्ती व्यवस्थापन  इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे आपत्ती व्यवस्थापन  प्रश्न उत्तर आपत्ती व्यवस्थापन  स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान आपत्ती व्यवस्थापन  स्वाध्याय उत्तरे Aapatti vyavsthapn swadhyay prashn uttare Aapatti vyavsthapn   prashn uttr 6th vidnyan swadhyay prashn uttare.

आपत्ती व्यवस्थापन इयत्ता सहावी सामान्य विज्ञान स्वाध्याय प्रश्न उत्तरे 



प्र.२ . तात्काळ काय उपाय कराल ? 


अ . कुत्रा चावला

उपाय:

१)    सर्वात आधी जखम निर्जंतुक द्रावणाने  स्वच्छ धुवून घ्या.

२)   जेथे जखम झाली आहे त्या भागावर स्वच्छ कोरडा कापड ठेवा.

३)   त्वरित डॉक्टर कडे जाऊन अंटीरेबीज चे इंजेक्शन घ्या.


आ . खरचटले / रक्तस्राव .

उपाय:

१)    ज्या व्यक्तीला खरचटले असेल किंवा रक्तस्त्राव होत असेल तिला आराम वाटेल अशा स्थितीत बसवावे किंवा झोपवावे.

२)   ज्या अवयवातून रक्तस्त्राव होत आहे तो भाग हृदयाच्या स्थारापेक्षा उंच ठेवावा.

३)   आणि जखम पाण्याने स्वच्छ करून घ्यावी.


इ . भाजणे / पोळणे

उपाय:

१)    भाजल्यास जखमा पाण्याने धुवून घ्याव्यात.

२)   निर्जंतुक द्रावणात कपडा भिजवून जखम हलक्या हाताने पुसून घ्या

३)   झालेली जखम कोरड्या ड्रेसिंग ने झाकावी.

 

ई.सर्पदंश 

उपाय:

१)    सर्पदंश झाल्यास ती जखम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी.

२)   दंश झालेल्या वरच्या बाजूंला कपड्याने घट्ट बांधावे.

३)   शक्य तितक्या लवकर तातडीने वैद्यकीय मदत मिळवावी.


उ . उष्माघात 

उपाय:

१)    रुग्णाला सावलीच्या ठिकाणी घेऊन जावे.

२)   रुग्णाचे शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे.

३)   मानेवर थंड पाण्याने भिजवलेले कापड ठेवा.

४) पिण्यासाठी भरपूर पाणी देऊन तातडीने वैद्यकीय मदत मिळावा.


  

प्र.३. असे का घडते ?

 

अ . महापूर

उत्तर: कमी वेळेत बेसुमार पाऊस होतो. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. पाणी निचरा होण्याच्या व्यवस्था अपुऱ्या पडतात. त्यामुळे शहरी भागातील गटारे तुंबतात, पाणी रस्त्यावर पसरते आणि आजूबाजूच्या घरांत आणि पासिसात पुराचे पाणी शिरते.

 

आ . जंगलांना आग

उत्तर: जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशांत नैसर्गिक किंवा मानवी कारणांमुळे आग लागते. कधी कधी ही आग मोठ्या प्रमाणावर पसरते. तिच्यावर नियंत्रण मिळविणे शक्य होत नाही.

 

इ . इमारत कोसळणे / दरडी कोसळणे

उत्तर: भूकंपाच्या धक्क्यामुळे तर काही ठिकाणी दरड कोसळल्या मुळे  इमारती कोसळतात. मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने दरडी कोसळतात.

 

ई . वादळ

उत्तर: हवेमध्ये कमी-अधिक दवाचे पट्टे निर्माण होतात. त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगवान वारे वाहू लागतात आणि वादळांची निर्मिती होते.

 

उ . भूकंप

उत्तर: भूगर्भात झालेल्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणवर उर्जेचे उत्सर्जन होते. त्यामुळे भूकंप लहरींची निर्मिती होते. आणि याचाच परिणाम म्हणून जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात.

 

 

प्र.४. खालील प्रश्नांची तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा .

 

अ . आपत्ती म्हणजे काय ?

उत्तर: अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे राष्ट्राची किंवा समाजची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती म्हणतात.

 

आ . आपत्तींचे प्रकार कोणते ?

उत्तर: नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती हे दोन मुख्य प्रकार आहे.

 

 इ . आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय ?

उत्तर: आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यांसाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय.

 

ई . आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते ?

उत्तर: आपत्ती टाळण्यासाठी योग्य ते नियोजन करणे. आपत्तींना तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ एकत्रित करणे हे आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक आहेत.

 

प्र.५. सर्पमित्र कसे काम करतात ?

उत्तर: सर्पमित्र सापाला कोणतीही इजा न पोहोचवता पकडून त्यांना सुखरूपपणे जंगलामध्ये सोडून देतात. त्यामुळे सर्पमित्र हे सापांच्या प्रजातींचे रक्षणकर्ते आहेत. सर्पमित्राला साप पकडण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सापांना पकडण्याबाबत सर्व माहिती मिळते. समाजात असलेला सापांबद्दल चा गैरसमज सर्पमित्र दूर करण्याचे काम करतात. सापांना जीवनदान देतात.

 

 प्र.६. प्रथमोपचार पेटीत कोणकोणते साहित्य असते , त्याची माहिती घ्या .

उत्तर: प्रथमोपचार पेटीमध्ये पुढील साहित्य असते.

ओ.आर.एस. पोकेट, टिंचर आयोडीन, कैची, चिकटपट्टी, बँडेज, कापूस, मलम, थर्मामीटर, डेटोल, रुमाल, विजेरी इ.

 

प्र.७. मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती निवारण्या साठी तुम्ही उपाय सुचवा .


आपत्ती

उपाययोजना

आग

१)    अग्निशामक यंत्राचा वापर करा.
२)   आगीपासून दूर राहा. 
३)   अग्निशामक दलाला फोन करा.

इमारत कोसळणे

१)    इमारत धोकादायक असल्यास तिच्यामध्ये वास्तव्य करणे टाळावे. 
  २)   अचानक अपघात घडून आल्यास जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी.

अपघात

१)    अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी आणि प्रथमोपचार करावेत. 
२)   वैद्यकीय मदतीसाठी १०२ या क्रमांकावर फोन करावा.

पूर

१)    अतिवृष्टी झाल्यास सावधानता बाळगावी
२)   महापुराच्या परिस्थितीमध्ये उंच ठिकाणी जावून थांबावे. 
  ३)   निर्जंतुक केलेले पाणी प्यावे.

युद्धे

     १)    ज्या ठिकाणी युद्ध होत आहे अशा ठिकाणापासून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

बॉम्बस्फोट

१)    बॉम्बस्फोट झाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. 
२)   सुरक्षित ठिकाणी थांबावे.

भूकंप

१)    भूकंप होत असताना मोकळ्या जागेत जावे. 
२)   घरात अडकून पडल्यास टेबल, खुर्ची यांखाली आसरा घ्यावा.

महापूर

१)     अतिवृष्टी झाल्यास सावधानता बाळगावी

२)     महापुराच्या परिस्थितीमध्ये उंच ठिकाणी जावून थांबावे.

३)     निर्जंतुक केलेले पाणी प्यावे.

वादळ

१)    वादळाच्या परिस्थितीत बाहेर पडू नये. 
  २)   वादळाचे संकेत मिळताच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

स्तुनामी

१)    हवामानविभागाकडून मिळणाऱ्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे. 
२)   समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी जाऊन थांबावे.

दुष्काळ

१)    दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाणी काटकसरीने वापरावे. 
२)   दुष्काळी भागात पाणी पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेशी संपर्क साधावा.

दरड कोसळणे

    १)    अतिवृष्टी होत असल्यास डोंगराळ ठिकाणी थांबू नये.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂ 


आपत्ती व्यवस्थापन  इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

आपत्ती व्यवस्थापन  प्रश्न उत्तर
आपत्ती व्यवस्थापन  स्वाध्याय
सहावी सामान्य विज्ञान आपत्ती व्यवस्थापन  स्वाध्याय उत्तरे
Aapatti vyavsthapn swadhyay prashn uttare
Aapatti vyavsthapn   prashn uttr
6
th vidnyan swadhyay prashn uttare.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.