१.भारतीय उपखंड आणि इतिहास इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे | Bharatiy upakhanda aani itihas 6th swadhyay prashn uttare

१.भारतीय उपखंड आणि इतिहास इयत्ता सहावी स्वाध्याय

भारतीय उपखंड आणि इतिहास प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी / भारतीय उपखंड आणि इतिहास याचा स्वाध्याय / Bhartiy upkhand aani etihas prashn uttare eyatta sahavi / Bhartiy upkhand aani itihas eyatta sahavi swadhyay


प्र.१.   खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१)            इतिहास म्हणजे काय?

उत्तर: मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. म्हणजेच इतिहास होय.

 

(२)           मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो?

उत्तर: जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल, त्या ठिकाणी मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो.

 
(३)           डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठीप्रामुख्याने कशावर अवलंबून रहावे लागते?

उत्तर: डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून रहावे लागते.

 

(४) भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृतीकोणती?

उत्तर: हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती आहे.

भारतीय उपखंड आणि इतिहास भारतीय उपखंड आणि इतिहास स्वाध्याय भारतीय उपखंड आणि इतिहास इयत्ता सहावी स्वाध्याय भारतीय उपखंड आणि इतिहास प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी भारतीय उपखंड आणि इतिहास याचा स्वाध्याय Bhartiy upkhand aani etihas prashn uttare eyatta sahavi Bhartiy upkhand aani itihas eyatta sahavi swadhyay

१.भारतीय उपखंड आणि इतिहास इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे

 

प्र.२. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

(१) मानवी समाजजीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते?

उत्तर:

१)                मानवी समाज जेथे राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्यांचे समाजजीवन अवलंबून असते.

२)               आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय यांसारख्या बऱ्याच गोष्टी या त्या परिसरातील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात.

 

 
(२) आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात?

उत्तर:

१)      आपण राहतो त्या प्रदेशातील पुढील गोष्टी या आपल्या जगण्याची साधने असतात.

हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात.

 

(४)          ‘भारतीय उपखंड’ असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात?

उत्तर:

१)    अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांग्लादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग ‘दक्षिण आशिया’ या नावाने ओळखला जातो.

२)   याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला ‘भारतीय उपखंड’ असे म्हणतात.

 

प्र . ३. कारणे लिहा.

(१) इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते .

उत्तर: इतिहास आणि भूगोल यांचे अतूट नाते असते. कारण....

१)    स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत. या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही.

२)   इतिहासामधील स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. 

३)   भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते.

 

(२) लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते.

उत्तर:

१)    आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात.

२)   त्यांच्या आधारानेच त्या त्या प्रदेशातीलजीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल, तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो.

३)   कालांतराने या वस्त्यांचे ग्राम-वसाहती आणि नगरे यांत रूपांतर होते. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागते.

या कारणांमुळे लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते.

 

प्र.४. डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा.

उत्तर:

डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन

मैदानी प्रदेशातील लोकजीवन

१) डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते.

१)मैदानी प्रदेशातील लोकांचे जीवन कमी कष्टाचे असते.

२) डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी असते.

२) मैदानी प्रदेशात सुपीक

शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते.

३) डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या

कमी प्रमाणावर उपलब्ध असतात,

३) तृणधान्ये आणि भाज्या मैदानी

प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात.

४) डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर

आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून रहावे लागते.

४)मैदानी प्रदेशात लोकांना अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.

 

 

प्र.५. पाठ्यपुस्तकातील भारत-प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.

(१) भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत?

उत्तर: भारताच्या उत्तरेकडे हिंदुकुश व हिमालय या पर्वतरांगा आहेत.


(२) भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते?

उत्तर: खैरब व बोलन या खिंडीतून येणारे व्यापारी मार्ग हे भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग आहेत.


(३) गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो?

उत्तर: बांग्लादेश येथे गंगा- ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम होतो.


(४)भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत?

उत्तर: अंदमान आणि निकोबार ही बेटे भारताच्या पूर्वेस आहेत.


(५) थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे

उत्तर: भराच्या पश्चिम देशेला थरचे वाळवंट आहे.


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा

त्यांनाही बरोबर उत्तरे कोणती आहेत याची माहिती मिळेल.


भारतीय उपखंड आणि इतिहास
भारतीय उपखंड आणि इतिहास स्वाध्याय
भारतीय उपखंड आणि इतिहास इयत्ता सहावी स्वाध्याय
भारतीय उपखंड आणि इतिहास प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी
भारतीय उपखंड आणि इतिहास याचा स्वाध्याय
Bhartiy upkhand aani etihas prashn uttare eyatta sahavi
Bhartiy upkhand aani itihas eyatta sahavi swadhyay

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.