६. महासागरांचे महत्व स्वाध्याय प्रश्न उत्तरे
महासागरांचे महत्व याचे प्रश्न उत्तर / महासागरांचे महत्व पाठचा स्वाध्याय दाखवा / महासागरांचे महत्व सहावी भूगोल स्वाध्याय / महासागरांचे महत्व इयत्ता सहावी धडा सहावा स्वाध्याय
स्वाध्याय
महासागरांचे महत्व स्वाध्याय प्रश्न उत्तरे ६वी |
प्र.(अ) गटात
न बसणारा घटक ओळखा .
(नकाशा संग्रहाचा वापर करावा .)
(१) शंख , मासे , खेकडा , जहाज
उत्तर:
जहाज
(२) अरबी समुद्र
, भूमध्य
समुद्र , मृत समुद्र , कॅस्पियन समुद्र
उत्तर:
मृत समुद्र
(३)श्रीलंका , भारत , नॉर्वे , पेरू
उत्तर:
पेरू
(४) दक्षिण
महासागर , हिंदी महासागर , पॅसिफिक महासागर , बंगालचा उपसागर
उत्तर:
बंगालचा उपसागर
(५) नैसर्गिक
वायू , मीठ , सोने , मैंगनीज ,
उत्तर:
सोने
महासागरांचे महत्व सहावी भूगोल स्वाध्याय / महासागरांचे महत्व इयत्ता सहावी धडा सहावा स्वाध्याय / सहावी भूगोल धडा पाचवा स्वाध्याय महासागरांचे महत्व तापमान / Mahasagaranche mahatwa prashn uttare
प्र.(ब) प्रश्नांची उत्तरे लिहा.
( १
) महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो?
उत्तर:
१) महासागरातून मानव मीठ, मासे, शंख, शिंपले यांसारखी
उत्पादने मिळतो.
२) लोह, शिसे, कोबाल्ट,सोडीअम, माग्नीज, क्रोमिअम, झिंक,
इत्यादी खनिज तेल व नैसर्गिक वायू महासागरातून मिळवतो.
३) शंख शिंपले अशा शोभेच्या वस्तू.
४) विविध प्रकारच्या औषधी वनस्पती.
(२)जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर का ठरते?
उत्तर:
१) जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गांच्या
क्षमतेच्या तुलनेने बरीच जास्त आहे.
२) सागरी प्रवाहाला
अनुसरून जलवाहतूक केली जाते त्यामुळे जहाजाचा वेग नैसर्गिकरित्या वाढतो आणि वेळेची
आणि इंधनाची बचत होते.
म्हणून जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते.
(१) समुद्रसान्निध्य
असलेला प्रदेश व खंडांतर्गत प्रदेश यांच्या हवामानात कोणता फरक असतो व का ?
उत्तर:
१) समुद्रसान्निध्य
असलेल्या प्रदेशांच्या तापमानात फारसा फरक पडत नाही.
२) समुद्रसान्निध्य असलेल्या प्रदेशांच्या हवेमध्ये
बाष्पाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे तापमान जरी वाढले तरी ती उष्णता बाष्प शोषून
घेते त्यामुळे या ठिकाणचे तापमान हे कायम सम असते.
३) खंडांतर्गत
प्रदेशांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात तफावत आढळते.
४) या प्रदेशांमध्ये बाष्पाचे प्रमाण कमी असल्याने
दिवसभराच्या किमान व कमाल तापमानात फरक पडतो. त्यामुळे या ठिकाणचे हवामान हे विषम
स्वरूपाचे असते.
(२) पॅसिफिक
महासागराचा किनारा कोणकोणत्या खंडांलगत आहे?
उत्तर: पॅसिफिक महासागराचा
किनारा हा उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या खंडांलगत आहे.
मित्रांनो
हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.
त्यांनाही
अभ्यास करताना याचा मदत होईल.