७. मौर्यकालीन भारत इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Mouryakalin bharat 6th swadhyay prashn uttare

मौर्यकालीन भारत स्वाध्याय मौर्यकालीन भारत इयत्ता सहावी स्वाध्याय मौर्यकालीन भारत प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी मौर्यकालीन भारत याचा स्वाध्याय
Admin

 ७. मौर्यकालीन भारत स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

मौर्यकालीन भारत स्वाध्याय / मौर्यकालीन भारत  इयत्ता सहावी स्वाध्याय / मौर्यकालीन भारत प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी / मौर्यकालीन भारत याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे / Mouryakalin bharat prashn uttare eyatta sahavi / Mouryakalin bharat eyatta sahavi swadhyay

स्वाध्याय


प्र. १. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या?

उत्तर: सिकंदरच्या मृत्युनंतर सत्तेसाठी सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या.

 

(२) बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले?

उत्तर: बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना पाठवले.

 

(३) मौर्य काळात कोणते व्यवसाय होते?

उत्तर:मौर्य काळात शेती बरोबरच इतर उद्योग म्हणजे हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगावे, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते.

 

(४) सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत?

उत्तर: सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल या प्राण्यांची शिल्पे होती.

 

मौर्यकालीन भारत स्वाध्याय मौर्यकालीन भारत  इयत्ता सहावी स्वाध्याय मौर्यकालीन भारत प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी मौर्यकालीन भारत याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Mouryakalin bharat prashn uttare eyatta sahavi Mouryakalin bharat eyatta sahavi swadhyay

प्र. २. सांगा पाहू.

(१) सत्रप : ग्रीक अधिकारी

(२) सुदर्शन : गुजरात राज्यातील जुनागढजवळ बांधलेले धरण.

(३) ‘देवानं पियो पियदसी’: सम्राट अशोकाने लेखांमध्ये स्वतःचा उल्लेख असा केला आहे.

(४) अष्टपद : बुद्धिबळाचे नाव

 

प्र. ३. आठवा आणि लिहा.

(१)    चंद्रगुप्त मौर्ययाच्या साम्राज्याची व्याप्ती

उत्तर:

१)    चंद्रगुप्त मौर्याने इ.स.पू. ३२५ च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली.

२)   यानंतर त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन, आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली.

३)   सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले.

 

(२) सम्राट अशोक याच्या साम्राज्याची व्याप्ती

उत्तर:

१)    बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इ.स.पू. २७३ मध्ये सत्तेवर आला.

२)   वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत.

३)   पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते.

४) सम्राट अशोकाने कलिंगवर देखील विजय मिळवला होता.

 

प्र.४. जोड्या जुळवा.

‘अ’ गट

‘ब’ गट (उत्तरे)

(१) सम्राट अलेक्झांडर

(ब) ग्रीकचा सम्राट

(२) मेगॅस्थिनिस

(अ) सेक्युलस

निकेटरचा राजदूत

(३) सम्राट अशोक

(ड) मगधचा सम्राट

 

 

प्र. ५. तुम्हांला काय वाटते?

(१)     सिकंदरला अखेर माघार घेणे भाग पडले.

उत्तर:

१)    सिंधू नदी ओलांडून सिकंदर तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला.

२)   तरीही पंजाबपर्यंत पोचण्यात सिकंदर यशस्वी झाला, मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या.

३)   सैनिकांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते.

४)  त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले त्यामुळे सिकंदराला माघार घेणे भाग होते.


(२)    ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत.

उत्तर:

१)    ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला.

२)   ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र, तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. नाण्यावर त्या राजाचे नाव असे.

 

(३)    सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.

उत्तर:

१)    कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.

२)   सत्य, अहिंसा, इतरांप्रति दया आणि क्षमावृतहे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.

 

प्र.६. तुमच्या शब्दांत वर्णन करा.

(१)  सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे.

उत्तर:

१)    अशोकाने प्रजेसाठी सुखसोई निर्माण करण्यावर भर दिला.

२)   माणसांना तसेच पशूंना मोफत औषधपाणी मिळावे, अशी सोय केली.

३)   अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. विहिरी खोदल्या


(२)   मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने.

उत्तर:

१)    नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव, समारंभ साजरे होत.

२)   त्यांमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत.

३)   कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रियहोत्या. सोंगट्यांचा खेळ आणि बुद्‌धिबळ यांसारखे खेळ आवडीने खेळले जात.

४)  बुद्‌धिबळाला ‘अष्टपद’ असे नाव होते.

 

प्र.७. आज युआन श्वांगसारखे परदेशी प्रवासी तुम्हांला भेटले तर तुम्ही काय कराल?

उत्तर: 

        युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. तो भारतभर फिरला. नालंदा विद्यापीठात तो दोन वर्षे राहिला होता. त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर केले. यांसारखे प्रवासी मला भेटल्यास त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्याकडे असणारे ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न मी करेन. त्याच्यासोबत राहून शक्य तितकी मदत त्याला करेन. त्यांच्या देशातील विविध प्रकारची माहिती जाणून घेऊन त्या माहितीचा मी संग्रह करेन.



हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा

त्यांनाही बरोबर उत्तरे कोणती आहेत याची माहिती मिळेल.

 

मौर्यकालीन भारत स्वाध्याय
मौर्यकालीन भारत  इयत्ता सहावी स्वाध्याय
मौर्यकालीन भारत प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी
मौर्यकालीन भारत याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Mouryakalin bharat prashn uttare eyatta sahavi
Mouryakalin bharat eyatta sahavi swadhyay

1 comment

  1. Unknown
    Unknown
    धन्यवाद
प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.