१. नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन सहावी स्वाध्याय उत्तरे | Naisargik sansadhane-hava pani aani jamin 6th samanya vidnyan uttare

१. नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन स्वाध्याय उत्तरे 

नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे  / नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन प्रश्न उत्तर / नैसर्गिक संसाधने हवा पाणी व जमीन स्वाध्याय / सहावी सामान्य विज्ञान नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन स्वाध्याय उत्तरे

स्वाध्याय


प्र. १. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.


अ.ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी .................. किरणे शोषून घेतो.

उत्तर: अतिनील


आ.  पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण .......... टक्के साठा उपलब्ध आहे.
उत्तर: ०.०३


इ.    मृदेमध्ये .............. व ................ घटकांचे अस्तित्व असते.

उत्तर : मृदेमध्ये जैविक व अजैविक घटकांचे अस्तित्व असते.

 

नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन प्रश्न उत्तर नैसर्गिक संसाधने हवा पाणी व जमीन स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन स्वाध्याय उत्तरे Naisargik sansadhane hava pani aani jamin sahavi swadhyay prashn uttare Naisargik sansadhne hava pani aani jamin prashn uttr 6th vidnyan swadhyay prashn uttare.

नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन सहावी स्वाध्याय उत्तरे


प्र. २. असे का म्हणतात?


अ.ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे.

उत्तर:

१)    वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळततो.

२)   सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात.

३)    ही अतिनील किरणे ओझोन वायूचा थर शोषून घेतो.

४)  त्यामुळे पृथ्वीवरील साजीव्नाचे रक्षण होते. म्हणून ओझोन थर हा पृथ्वीचे संरक्षक कवच आहे.


आ.  पाणी हे जीवन आहे.

उत्तर:

१)      पाण्याशिवाय या पृथ्वीवर कोणताही सजीव जगू शकत नाही.

२)     प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमध्ये असणारी रसद्रव्ये यांमध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.

३)     कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जीवनात राहणे शक्य नाही.

म्हणून पाण्याला ‘जीवन’ असे म्हणतात.

 

इ.समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे.

उत्तर:

१)    समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे पाऊस पडतो. मासेमारी, हवामान, पाऊस तसेच संपूर्ण ऋतुचक्र हे समुद्रावरच अवलंबून असते.

२)   समुद्राच्या पाण्यात अनेक जलचर असतात यापैकी काही मासे, शिंपले, यांसारखे जलचरांचा उपयोग माणूस अन्न म्हणून करतो.

३)   समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांचे मासेमारी हे उपजीविकेचे साधन आहे.

४) मीठ, आयोडीन, आणि इतर काही खनिजे ही समुद्राच्या पाण्यापासून मिळवली जातात.

५)  समुद्रातूनच जलवाहतूक केली जाते.

६)    आज समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. म्हणून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे.

 

 

प्र. ३. काय होईल ते सांगा?


अ.मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले.

उत्तर: मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषांचे विघटन मृदेतील सुक्ष्मजीव करीत असतात. तसेच काही सुक्ष्मजीवांमुळे खडकाचा अपक्षय होतो. जर मृदेतील सारे सूक्ष्मजीव नसत झाले तर विघन आणि अपक्षय या दोन्ही प्रक्रिया थांबतील. सुक्ष्मजीव नष्ट झाल्याने त्यापासून तयार होणारी कृथितमृदा तयार होणार नाही.


आ.    तुमच्या परिसरात वाहने व कारखान्यांची संख्या वाढली.

उत्तर: वाहने तसेच कारखाने यांमध्ये जीवाश्म इंधनाचा वापर केला जातो. ही जीवाश्म इंधने जाळल्याने त्यांतून हवेत घातक घटक सोडले जातात. नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड , सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड यांसारख्या विषारी वायूंमुळे पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम घडून येतो. कारखान्यातून आणि वाहनातून बाहेर पडणारा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात. वाहने आणि कारखान्यांची सख्या वाढल्याने परिसरातील वायू प्रदुशानामध्ये वाढ होईल.


इ.    पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला.

उत्तर: 

१) पाण्याशिवाय या पृथ्वीवर कोणताही सजीव जगू शकत नाही.

२) प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमध्ये असणारी रसद्रव्ये यांमध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.

३) कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जीवनात राहणे शक्य नाही. म्हणून पाण्याला ‘जीवन’ असे म्हणतात.

पृथ्वीवरील पाण्याचा साठा संपला तर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे अस्तित्व संपुष्टात येईल.


Naisargik sansadhane hava pani aani jamin sahavi swadhyay prashn uttare / Naisargik sansadhne hava pani aani jamin prashn uttr / 6th vidnyan swadhyay prashn uttare.


प्र. ४. सांगा मी कोणाशी जोडी लावू?

 ( हा तक्ता पाहण्यासाठी मोबाईल आडवा करा.)

अ’ गट

उत्तरे

‘ब’ गट

कार्बनडायऑक्साईड

वनस्पती व अन्ननिर्मिती

मृदेची निर्मिती

ऑक्सिजन

ज्वलन

पाऊस

बाष्प

पाऊस

वनस्पती व अन्ननिर्मिती

सूक्ष्मजीव

मृदेची निर्मिती

ज्वलन

 

 

प्र. ५. नावे लिहा.


अ.जीवावरणाचे भाग

उत्तर: वनस्पती आणि प्राणी

 

आ.मृदेचे जैविक घटक

उत्तर: सूक्ष्मजीव, उंदीर, कीटक , घुशी.

 

इ.जीवाश्म इंधन

उत्तर: पेट्रोल, डीझेल, रॉकेल.

 

ई . हवेतील निष्क्रिय वायू

उत्तर: अरगॉन, हेलिअम, झेनॉन, निऑन.

 

उ.ओझोनच्या थरास घटक असणारे वायू.

उत्तर: क्लोरोफ्लुरोकार्बन आणि टेट्राक्लोराईड

 

प्र. ६ . खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.

 

अ.जमीन आणि मृदा एकाच असते.

उत्तर: चूक


आ. जमिनीखाली असणार्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात.

उत्तर: बरोबर.


इ.    मृदेचा २५सेमी जाडीचा ठार तयार होण्यास सुरामारे १००० वर्ष लागतात.

उत्तर: चूक 


ई . रेडॉनचा वापर जाहिरातींसाठीच्या दिव्यांत करतात.

उत्तर: चूक

 

प्र. ७ खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.


अ.मृदेची निर्मिती कशी होते हे आकृती काढून स्पष्ट करा.

उत्तर:

१)    जमिनीवरील मृदेची निर्मिती ही नैसर्गिक प्रक्रियेतून होते.

२)   उन, वारा व पाऊस यांपासून निर्माण होणार्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात.

३)   त्यांपासून खडे, वाळू आणि माती निर्माण होते.

४) या घटकांमध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर घुशी यांसारखे प्राणी आणि झाडांची मुळे यांमुळे खडकांचा अपक्षय होतो.

५)   मृदानिर्मिती होण्याची ही प्रक्रिया मंद गतीने सुरु असते.

६)   परिपक्व मृदेचा २.५ सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजार वर्षे लागतात.


आ.  पृथ्वीवर सुमारे ७१ % भाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते.

उत्तर:

१)     पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी सुमारे ७१ % इतका भाग हा पाण्याने व्यापला आहे.

२)   ७१% या एकूण पाण्यापैकी सुमारे ९७ टक्के इतके पाणी हे समुद्रामध्ये सामावलेले आहे.

३)   समुद्राच्या पाण्याची क्षारता जास्त असल्याने त्याचा वापर दैनंदिन जीवनात करता येत नाही.

४)  २.७ % इतके पाणी बर्फाच्या स्वरुपात आणि भूगर्भात सामावलेले आहे.

५)  फक्त ०.३ % इतकेच गोडे पाणी पृथ्वीवर उपलब्ध आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या आणि जागतिक तापमानवाढ यांमुळे गोड्या पाण्याचे स्त्रोत अपूरे पडल्याने पाण्याची कमतरता जाणवते.

६)   म्हणून पृथ्वीचा सुमारे ७१% इतका भूभाग पाण्याने व्यापलेला असला तरीही पाण्याची कमतरता जाणवते.


इ.    हवेतील विविध घटक कोणते? त्यांचे उपयोग लिहा.

उत्तर:

१) पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी वायू.

२)   अरगॉन, हेलिअम, निऑन आणि झेनॉन हे निष्क्रिय वायू आणि बाष्प, धूर, धुरके, धुके इत्यादी घटक हवेमध्ये असतात.


हवेतील घटकांचा उपयोग


१)  नायट्रोजन : सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो.


२)   ऑक्सिजन: सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी उपयोगी आहे.


३)   कार्बनडायऑक्साईड : वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात.


४) अरगॉन: विजेच्या बल्बमध्ये वापर करतात.


५) हेलिअम: कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो.


६)   निऑन: जाहिरातींसाठीच्या, रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो.


७) झे नॉन : फोटोग्राफी मध्ये याचा उपयोग केला जातो.


 
ई.    हवा. पाणी, जमीन ही बहुमील नैसर्गिक संसाधने का आहेत?

उत्तर:

        हवा, पाणी आणि जमीन या तीन्हींकडून पृथ्वीवरील सजीव जिवंत राहण्यासाठी विविध घटक मिळतात. सजीव सृष्टीच्या मुलभूत गरजा पूर्ण होऊन ती टिकवण्यासाठी याच घटकांची मदत होते. हवा. पाणी आणि जमिनिंनडून हे घटक नैसर्गिकरित्या मिळतात. म्हणूनच त्यांना बहुमोल नैसर्गिक संसाधने असे म्हणतात.

 

हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.


नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन प्रश्न उत्तर
नैसर्गिक संसाधने हवा पाणी व जमीन स्वाध्याय
सहावी सामान्य विज्ञान नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन स्वाध्याय उत्तरे
Naisargik sansadhane hava pani aani jamin sahavi swadhyay prashn uttare
Naisargik sansadhne hava pani aani jamin prashn uttr
6th vidnyan swadhyay prashn uttare.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.