११. प्राचीन भारत आणि जग इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे | Prachin bharat aani jag 6th swadhyay prashn uttare

प्राचीन भारत आणि जग स्वाध्याय प्राचीन भारत आणि जग इयत्ता सहावी स्वाध्याय प्राचीन भारत आणि जग प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी प्राचीन भारत आणि जग
Admin

११. प्राचीन भारत आणि जग स्वाध्याय उत्तरे 

प्राचीन भारत आणि जग स्वाध्याय / प्राचीन भारत आणि जग  इयत्ता सहावी स्वाध्याय / प्राचीन भारत आणि जग  प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी / प्राचीन भारत आणि जग  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे  Prachin bharat aani jag   uttare eyatta sahavi / Prachin bharat aani jag  eyatta sahavi swadhyay


स्वाध्याय


प्र.१ ओळख पाहू

(१)   रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणे.

उत्तर: महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि तामिळनाडू येथील अरिकमेडू.


(२) कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला ती शैली.

उत्तर: कुशाण काळात भारतामध्ये गांधार कला शैलीचा उगम झाला.


(३)   महावंस आणि दीपवंस या ग्रंथांची भाषा.

उत्तर: महावंस आणि दिपवंस या ग्रंथांची भाषा पाली होती.


(४)  प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश.

उत्तर: जपान, कोरिया, व्हिएतनाम, चीन, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी.

 

प्राचीन भारत आणि जग स्वाध्याय प्राचीन भारत आणि जग  इयत्ता सहावी स्वाध्याय प्राचीन भारत आणि जग  प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी प्राचीन भारत आणि जग  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Prachin bharat aani jag   uttare eyatta sahavi Prachin bharat aani jag  eyatta sahavi swadhyay

११. प्राचीन भारत आणि जग  इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे


प्र. २. विचार करा आणि लिहा.

(१) आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो.

उत्तर:

१) इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये आग्नेय आशियातील देशांमध्ये भारतीय वान्सास्च्या लोकांची छोटी छोटी राज्ये उदयाला आली होती.

२)   यांमुळे भारतातील नृत्य, नाटके, अन्य कला, संस्कृती, यांचा प्रभाव उत्तरोतर वाढत गेला.

३) मंदिरांची निर्मिती झाली म्हणून आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो.


(२)  चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली.

उत्तर:

            इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये होऊन गेलेला चीनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यपमातंग हे भारतीय बौध्द भिक्खू चीनमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी अनेक भारतीय बौध्द ग्रंतांचे चीनी भाषेत रुपांतरण केले. त्यामुळे चीन व भारत यांचे धार्मिक संबंध प्रस्थापित होऊन चीनमध्ये बौध्द धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली.

 

प्र. ३. तुम्ही काय कराल?

तुमच्या आवडत्या छंदाला चालना मिळाली, तर तुम्ही काय कराल.

उत्तर: माझ्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर मी तो छंद चांगल्याप्रकारे जोपासेन . त्या छंदाबाबत अधिक माहिती आणि ज्ञान आत्मसात करून त्यामध्ये आणखी प्रगती करण्याचा मी प्रयत्न करीन. माझा छंद इतरांना कसा उपयोगी पडेल याचा विचार करेन.

 

प्र.४. चित्र वर्णन करा.

आपल्या पाठातील अफगाणिस्तानमधील हड्डा येथील स्तूपावरच्या गांधार शैलीच्या शिल्पांचे निरीक्षण करून चित्रवर्णन करा.

उत्तर:

            प्राचीन भारतामधील गांधार देशात इ.स.पू. पहिल्या शतकापासून ते इ.स.पू. पाचव्या शतकापर्यंत वास्तुकला, मूर्तीकला, कनिष्ठ कला यांची भरभराट झाली. या कलानिर्मितीस गंधार शैली असे म्हटले जाते. ग्रीक देवतांच्या मूर्तींचे साम्य बुद्धसंत व भिक्षूंच्या विविध मुर्तींत आढळते. वस्त्राची ठेवण, केशरचना, शरीरशौष्ठव हा ग्रीक प्रभाव मानला, तरी हस्तमुद्रा, ध्यानस्त भाव या गोषित हिंदी परंपरेतील आहेत.

 

प्र. ५. अधिक माहिती मिळवा.

(१) गांधार शैली

उत्तर: ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात  भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला. त्याला गांधार कला असे म्हणतात. गांधार कलाशैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या, म्हणून त्या शैलीस ‘गांधार शैली’ असे म्हटले जाते. या शैलीतील मूर्तींची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळतीजुळती आहे. भारतातील सुरुवातीची नाणीही ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर घडवलेली होती.


(३) रेशीम मार्ग

उत्तर: प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते. सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात ‘चीनांशुक’ असे नाव होते. चीनांशुकाला भारतात मोठी मागणी होती. प्राचीन भारतातील व्यापारी हे चीनांशुक पश्चिमेकडील देशांमध्येपाठवत असत. हा व्यापार खुश्कीच्या मार्गाने होत असे. त्या मार्गाला ‘रेशीम मार्ग’ असेही म्हणतात

 

प्र. ६. पाठात उल्लेख केलेले आग्नेय आशियातील देश नकाशा आराखड्यात दाखवा.

उत्तर:

प्राचीन भारत आणि जग स्वाध्याय प्राचीन भारत आणि जग  इयत्ता सहावी स्वाध्याय प्राचीन भारत आणि जग  प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी प्राचीन भारत आणि जग  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Prachin bharat aani jag   uttare eyatta sahavi Prachin bharat aani jag  eyatta sahavi swadhyay

प्राचीन भारत आणि जग  इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे





प्राचीन भारत आणि जग स्वाध्याय
प्राचीन भारत आणि जग  इयत्ता सहावी स्वाध्याय
प्राचीन भारत आणि जग  प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी
प्राचीन भारत आणि जग  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Prachin bharat aani jag   uttare eyatta sahavi
Prachin bharat aani jag  eyatta sahavi swadhyay

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.