२.सजीव सृष्टी इयत्ता सहावी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | Sajiv srushti 6th samanya vidnyan prashn uttare

सहावी सामान्य विज्ञान सजीव सृष्टी स्वाध्याय उत्तरे Sajiv srushti sahavi swadhyay prashn uttare सजीव सृष्टी हवा पाणी आणि जमीन प्रश्न उत्तर
Admin

२.सजीव सृष्टी स्वाध्याय उत्तरे.

सजीव सृष्टी इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / सजीव सृष्टी हवा पाणी आणि जमीन प्रश्न उत्तर / सजीव सृष्टी स्वाध्याय / सहावी सामान्य विज्ञान सजीव सृष्टी स्वाध्याय उत्तरे / Sajiv srushti sahavi swadhyay prashn uttare

स्वाध्याय

 

प्र. खलील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.


अ.वनस्पती आणि प्राणी यांमधील फरक स्पष्ट करा.

उत्तर:

वनस्पती

प्राणी

१.वनस्पती या स्वयंपोषी असतात.

१.प्राणी हे परपोषी असतात.

२.वनस्पती हरितद्रव्याच्या मदतीने प्रकाशसंश्लेषण ही क्रिया करतात.

२.प्राण्यांमध्ये हरितद्रव्य नसते त्यामुळे ते प्रकाशसंश्लेषण क्रिया करू शकत नाहीत.

३.वनस्पतींची वाढ त्या जिवंत असलेपर्यंत होत राहते.

३.प्राण्यांची वाढ एक अठराविक काळापर्यंतच होते.

४.वनस्पतीती खोड व पानानावरील सूक्ष्म छिद्रांद्वारे श्वसन करतात.

४. प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक अवयव असतात.

५.वनस्पतींच्या बिया, खोडे, पाने, इत्यादींपासून नवीन वनस्पती निर्माण होतात.

५.काही प्राणी अंडी घालून त्यांतून पिल्लांना जन्म देतात तर काही पिलांना जन्म देतात.

 

आ.    वनस्पती आणि प्राणी यांमधील साम्य स्पष्ट करा.

उत्तर:

१)    प्राणी व वनस्पती हे दोन्हीही घटक सजीव आहेत.

२)   वाढ, श्वसन , उत्सर्जन आणी चेतनाक्षमता तसेच पुनरुत्पादन या गोष्टी वनस्पती आणि प्राणी यांमध्ये साम्य दर्शवतात.

३)   वनस्पती आणि प्राणी यांमध्ये पेशीय रचना आढळते.

४)  काही वनस्पती आणि प्राणी उपयुक्त आहेत तर काही अपायकारक आहेत.

 
सजीव सृष्टी इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे सजीव सृष्टी हवा पाणी आणि जमीन प्रश्न उत्तर सजीव सृष्टी स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान सजीव सृष्टी स्वाध्याय उत्तरे Sajiv srushti sahavi swadhyay prashn uttare Sajiv srushti  prashn uttr 6th vidnyan swadhyay prashn uttare.

सजीव सृष्टी इयत्ता सहावी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे 


इ.वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे.

उत्तर:

१)    वनस्पतींचा घरगुती त्याचप्रमाणे औद्योगिक वापर केला जातो.

२)   मेथी , बटाटा, भेंडी , सफरचंद, हिरडा, बेहडा, शतावरी यांसारख्या वनस्पतींचा वापर आह औषध निर्मितीसाठी केला जातो.

३)   वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडतात त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो.

४) वनस्पतींपासून लाकूड, फळे, औषधे, यांसारख्या अनेक गोष्टी उपलब्ध होतात.

अशा प्रकारे वनस्पती सृष्टी आपल्यासाठी उपयोगी ठरते.


इ.    प्राणी सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे.

उत्तर:

१)    कुत्रा, मांजर, गाय, म्हैस यांसारखे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात.

२)   मासे, कोंबड्या, मेंढी इत्यादींचा आहारात समावेश केला जातो.

३)   घोडा, उंट, बैल यांसारख्य प्राण्यांचा वापर वाहतुकीसाठी आणि विविध व्यवसायांसाठी केला जातो.

४)  मातीमध्ये असणारा गांडूळ पर्णी हा शेतीसाठी उपयुक्त आहे.

अशा प्रकारे प्राणी सृष्टी आपल्याला उपयोगी आहे.


उ.सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत?

उत्तर:

१)    वाढ, अन्नग्रहण, श्वसन, उत्सर्जन आणि प्रजनन, हालचाल यांसारखी लक्षणे सजीवांमध्ये आढळतात.

२)   सजीव जन्म घेतात आणि आणि त्यांचा कालावधी पूर्ण झाला कि मृत्यू पावतात.

३)   अशा प्रकारची लक्षणे ही निर्जीवांमध्ये दिसून येत नाहीत.

त्यामुळे सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे आहेत.


प्र.२. कोण कशाच्या सहाय्याने श्वसन करते.


अ.मासा        : कल्ले

आ.  साप        : फुफ्फुसे

इ.    करकोचा  : फुफ्फुसे

ई.    गांडूळ      :त्वचा

उ.   मानव        : फुफ्फुसे

ऊ. वडाचे झाड: पानावरील छिद्रांतून

ए.    अळी          :श्वसनछिद्रे.

 

प्र.३.  दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.


अ.स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला .......... म्हणतात.

उत्तर: स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात.


आ.  शरीरात ............. वायू घेणे व ............ वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात.

उत्तर: शरीरात ऑक्सिजन वायू घेणे व कार्बनडायऑक्साईड वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात.


इ.    शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे ............ होय.

उत्तर: शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन होय.


ई . घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला ............ म्हणतात.

उत्तर: घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता  म्हणतात.


उ.आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव ............... पावतो.

उत्तर: आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव मृत्यू  पावतो.


(ऑक्सिजन, मृत्यू, उत्सर्जन, कार्बनडायऑक्साईड, चेतनाक्षमता, प्रकाश संश्लेषण )

 

सहावी सामान्य विज्ञान सजीव सृष्टी स्वाध्याय उत्तरे / Sajiv srushti sahavi swadhyay prashn uttare / Sajiv srushti  prashn uttr
6th vidnyan swadhyay prashn uttare.

प्र. ४. प्राणी व वनस्पतींचे उपयोग लिहा.


प्राणी: मधमाशी, शार्क मासा, याक, मेंढी, गांडूळ, कुत्रा, शिंपले घोडा, उंदीर.

उत्तर:

१] मधमाशी:

१)मध मिळविण्यासाठी मधमाश्या अत्यंत उपयुक्त ठरतात.

२) मधमाश्यांपासून तयार झालेल्या मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

३) मधमाश्यांपासून मेणाचे उत्पन्न घेतले जाते.


२]शार्क मासा:

१)शार्क माश्याच्या यकृतामध्ये सापडणाऱ्या तेलाचा वापर औषध म्हणून केला जातो. याला शार्कलिव्हर ऑईल असेही म्हणतात.

२) शार्क माश्याचा अन्न म्हणून देखील वापर केला जातो.


३] याक:

१)शेतीकामासाठी याक चा वापर नेपाळ आणि तिबेट मध्ये केला जातो.

२)वाहतुकीसाठी सुद्धा याक या प्राण्याचा वापर केला जातो.


४] मेंढी:

१)मेंढीपासून प्रामुख्याने लोकर मिळवली जाते.

२) मेंढीच्या विष्ठेपासून एक उत्तम प्रकारचे खत तयार होते.


५] गांडूळ:

१)गांडूळ शेतजमिनीतील माती सैलसर ठेवते त्यामुळे वनस्पतींच्या मुळांना आवश्यक ते घटक मिळतात.

२)पालापाचोळा, आणि कुजणाऱ्या पदार्दार्थांचे विघटन करण्यास गांडूळ मदत करते.


६] कुत्रा:

१)कुत्रा हा प्रामाणिक प्राणी मनाला जातो. घराचे रक्षण करण्यासाठी त्याला पाळले जाते.

२)गुन्हेगारांचा शोध घेण्यास, स्फोटके शोधण्यास कुत्रा पोलिसांच्या उपयोगी पडतो.


६] शिंपले:

१)शिंपल्यांपासून मोत्याचे उत्पादन घेतले जाते.

२)विविध प्रकारच्या शोभेचा वस्तू तयार केल्या जातात.

३)औषधे निर्मिती क्षेत्रात देखिल शिंपल्यांच्या उपयोग केला जातो.


७] घोडा:

१)घोडा हा वातुकीसाठी वापरला जातो.

२)पोलीस तसेच सैन्यदलात घोड्यांचा वापर केला जातो.


८] उंदीर:

१)नवीन औषध निर्माण केल्यावर त्याची उपयुक्तता तपासण्यासाठी प्रयोगशाळेत उंदरांचा वापर केला जातो.

२)विविध प्रयोग उंदरांवर केले जातात.

 

वनस्पती: आले, आंबा, निलगिरी, बाभूळ, साग, पालक, कोरफड, हळद, तुळस, करंज, मोह, तुती, द्राक्ष.


१] आले:

१)आल्याचा उपयोग हा रोजच्या जेवणात केला जातो.

२) आल्याचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

३)रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका आल्याचे सेवन केल्याने कमी होतो.


३] आंबा:

१)आंब्याचे सेवन केल्याने आतड्याचे, प्रोस्टेट ग्रंथीचे कर्करोग कमी होण्यास मदत होते.

२)आंब्याच्या सेवनाने दृष्टी सुधारण्यास मदत होते आणी डोळ्याच्या समस्या कमी होतात.

३)हृदयविकार कमी होण्यास मदत होते.


३] निलगिरी:

१)सुगंधी द्रव्ये मिळविण्यासाठी निलगिरी चा वापर केला जातो.

२) निलगिरीपासून औषधी तेल तयार केले जाते.

३)भाजल्यावर त्वचेवर निलगिरी तेल लावले जाते.


४] बाभूळ:

१)पचनशक्ती सुधारण्यासाठी बाभळीचा काढा केला जातो.

२)पोटदुखी होत असल्यास बाभळीच्या सालीचा काढा ताकात मिसळून सेवन केल्याने पोटदुखी बरी होते.

३)बाभळीच्या छोट्या फांद्यांचा उपयोग दात घासण्यासाठी देखील होतो.


५] साग:

१)टिकावू साहित्य बनवण्यासाठी सागाच्या लाकडाचा उपयोग केला जातो.

२)किडणी मध्ये होणाऱ्या खड्यांवर साग हा उपयुक्त ठरतो.

३)पोटदुखी, कफ यांसारख्या आजारांवर साग हा औषधी ठरतो.


६] पालक:

१)पालक चा उपयोग आहारात केला जातो.

२)पालक भाजीमध्ये विविध प्रकारची उपयुक्त जीवनसत्वे आढळून येतात.

३)पालक च्या सेवनाने हाडे मजबूत होण्यास मदत होते.


७] कोरफड:

१)पचनक्रिया सुधारण्यास कोरफड उपयुक्त ठरते.

२)कफ, खोकला यांसारख्या आजारांवर औषधी आहे.

३) केसांच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणवर वापर केला जातो.


८] हळद:

१)रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

२)एखादी जखम झाल्यास त्यावर हळद लावल्याने जखम भरून येण्यास मदत होते.

३)हळदीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत.


९] तुळस:

१)विविध आजारांवर तुलसी चा वापर केला जातो.

२)तुळस २४ तास ऑक्सिजन वायू बाहेर सोडते.

३)आजूबाजूचा परिसर शुद्ध राहण्यास मदत होते.


१०] करंज:

१)करंजापासून बनवलेले तेल उपयुक्त मानले जाते.

२)करंजाच्या तेलाचा औषध म्हणून वापर केला जातो.


११] मोह:

१)डोकेदुखी, त्वचाविकार, संधिवात यांसारख्या समस्यांवर मोहाच्या तेलाचा वापर केला जातो.

२) औषध निर्मिती मध्ये मोहाचा वापर केला जातो.


१२] तुती:

१)रेशीम उत्पादनासाठी तुतीच्या झाडांचा वापर केला जातो.

२)तुतीच्या फळाचा अन्न म्हणून वापर केला जातो.


१३] द्राक्ष:

१)आहारामध्ये द्राक्षांचा वापर केला जातो.

२)द्राक्षे सुकवून त्यापासून सुका मेवा म्हणजेच बेदाणे तयार केले जातात.

 

 

प्र.५. यादीमध्ये दिलेल्या सजीवांच्या हालचालींची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत.


सजीव: साप , कासव, कांगारू, गरुड, सरडा, बेडूक, गुलमोहर, रताळ्याचा वेळ, डॉल्फिन, मुंगी, रेटल साप, नाकतोडा, गांडूळ.

उत्तर:


१] साप:

१)साप हा सरपटणारा प्राणी आहे.

२)त्याच्या शरीराचे स्नायू आकुंचार व प्रसरण पावतात त्याद्वारे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो.


२] कासव:

१)कासवाचे पुढचे पाय हे पोहण्यासाठी रुपांतरीत झालेले असतात.

२) कासवे ही संथ गतीने चालतात.


३] कांगारू:

१)कांगारू मागच्या दोन पायांवर चालतो.

२)शेपटीचा उपयोग आधार देण्यासाठी करतो.


४] गरुड:

१)गरुड हा आकाशात उंच उडतो.

२)तंदुरुस्त पंख आणि निमुळते शरीर यांमुळे तो वेगात आणि उंच उडतो.


५] सरडा:

१)सरड्याला चार लहान पाय असतात त्यामुळे तो चालताना सरपटत चालल्यासारख्या दिसतो.

२)सरडा हा लहान असला तरी काही प्रमाणात चपळ असतो.


६] बेडूक:

१)बेडूक हा उभयचर प्राणी आहे तो जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहतो.

२)पाण्यात पोहण्यासाठी बेडूक मागच्या दोन पायांचा वापर करतो. तर पुढचे पाय शरीराचा समतोल राखण्यास मदत करतात.


७] गुलमोहर:

१)गुलमोहराच्या पानांवर सूर्यप्रकाश पडताच त्याच्या पर्णिका ताठ होतात.

२) रात्र झाल्यावर याच पर्णिका मिटतात.


८] रताळ्याचा वेल:

१)रताळ्याचा वेल नाजूक असल्याने तो जमिनीवर पसरत वाढतो.

२)कोणत्या काठीचा किंवा इतर वस्तूंचा आधार मिळाल्यास तो त्यावर वाढतो.


९] डॉल्फिन:

१)डॉल्फिन आपल्या परांच्या सहाय्याने पाण्यात पोहतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो.

२)श्वसन करण्यासाठी तो पाण्याच्या पृष्ठभागावर येतो.


१०] मुंगी:

१)मुंगी तिच्या छोट्या पायांनी इकडून तिकडे हालचाल करते.


११] रेटल साप:

१)रेटल साप हा वेगाने सरपटत जातो.


 १२] नाकतोडा:

१)पंखांचा वापर उडण्यासाठी करतो.

२)चालण्यासाठी पायांचा वापर करतो.


१३] गांडूळ:

१)गांडूळ हा सरपटत हालचाल करतो.

२)तो उपचार्माद्वारे हालचाल करतो.

 

प्र.६. सभोवताली आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी उपयुक्त किंवा आपल्याला अपायकारक कसे आहेत, याविषयी माहिती लिहा.

उत्तर: 

            घरगुती त्याचप्रमाणे औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात.बटाटा, भेंडी, सफरचंद, केली, यांचा वापर अन्नासाठी केला जातो.प्राणीही माणसाला उपयोगी पडतात.कुत्रा, मांजर, गाय, म्हैस यांसारखे प्राणी घरगुती उपयोगासाठी उपयुक्त ठरतात. मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी केला जातो. घोडा, बैल, यांसारखे प्राणी वाहतुकीसाठी आणि विविध कामांसाठी उपयुक्त ठरतात.

 

अपायकारक प्राणी वनस्पती

            आपल्या सभोवती असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक असतात. डास,माशी यांमुळे रोगांचा प्रसार होतो. झुरले, घुशी हे अन्नाची नासाडी करतात. उवा गोचीड, कोळी, साप आणि विन्ची चावल्यास मृत्यूही ओढवतो.

            प्रण्यांप्रमाणे वनस्पती देखील अपायकारक ठरतात. खाजखुजालीच्या शेंगा, अळूची पणे यांना हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. कण्हेर, घाणेरी या वनस्पतींचा वास उग्र असतो. धोतरा ही वनस्पती विषारी असते.कवक , शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाल्याने पाणी प्रदूषित होते.

 

 

हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

 

सजीव सृष्टी इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
सजीव सृष्टी हवा पाणी आणि जमीन प्रश्न उत्तर
सजीव सृष्टी स्वाध्याय
सहावी सामान्य विज्ञान सजीव सृष्टी स्वाध्याय उत्तरे
Sajiv srushti sahavi swadhyay prashn uttare
Sajiv srushti  prashn uttr
6th vidnyan swadhyay prashn uttare.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.