४.शहरी स्थानिक शासन संस्था स्वाध्याय उत्तरे
शहरी स्थानिक शासनसंस्था स्वाध्याय / शहरी स्थानिक शासनसंस्था स्वाध्याय इयत्ता सहावी स्वाध्याय / शहरी स्थानिक शासनसंस्था स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी / शहरी स्थानिक शासनसंस्था याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे / Shahari sthanik shasan sanstha uttare eyatta sahavi / Shahari shasan sanstha eyatta sahavi swadhyay
स्वाध्याय
प्र. १. पर्यायांतून योग्य
पर्याय ओळखा व लिहा.
(१) महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात
आली,
त्या शहराचेनाव ........... .
(नागपूर, मुंबई, लातूर)
उत्तर: महाराष्ट्रात प्रथम
महानगरपालिका स्थापन करण्यात आली, त्या शहराचेनाव मुंबई.
(२) शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावेअसतात तेथेकामकाज पाहते..............
(नगरपरिषद, महानगरपालिका, नगरपंचायत)
उत्तर: शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते नगरपंचायत .
(३) नगरपरिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो.............. .
(मुख्याधिकारी, कार्यकारी अधिकारी, आयुक्त)
उत्तर: नगरपरिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो मुख्याधिकारी .
शहरी स्थानिक शासन संस्था इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे
प्र.२. थोडक्यात उत्तरेलिहा.
(१) शहरामध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात?
उत्तर:
शहरांमध्ये खालील समस्या आढळतात.
१) निवाऱ्याच्या अपुऱ्या सोई सुविधा
२) जागेचा तुटवडा
३) मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी
४) कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या
५) वाढत जाणारी गुन्हेगारी
६) गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य करणारी लोकसंख्या.
(२) महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा.
उत्तर: महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
१) शिक्षण समिती
२) आरोग्य समिती
३) परिवहन समिती
४) स्थायी समिती
५) पाणी पुरवठा समिती.
प्र.३. पुढील मुद्द्यांच्या
आधारे शहरी स्थानिक शासन संस्थांविषयी माहिती देणारा तक्ता तयार
करा.
( हा तक्ता पाहण्यासाठी मोबाईल आडवा करून पहा)
मुद्दे |
नगरपंचायत |
नगरपरिषद |
महानगरपालिका |
पदाधिकारी |
अध्यक्ष व उपाध्यक्ष |
अध्यक्ष व उपाध्यक्ष |
अध्यक्ष व उपाध्यक्ष |
सदस्य संख्या |
किमान ९ व कमाल १५ |
किमान १७व कमाल ३८ |
शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्यसंख्या निश्चित केली जाते. |
अधिकारी |
कार्यकारी अधिकारी |
मुख्याधिकारी |
महानगरपालिका आयुक्त |
प्र.४. सांगा पाहू.
(१) नगरपरिषदेच्या आवश्यक कामांमध्ये कोणकोणत्या कामांचा समावेश होतो?
उत्तर:
नगर परिषदेच्या आवश्यक कामांमध्ये पुढील कामांचा समावेश होतो.
१) सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणे
२) पाणीपुरवठाकरणे
३) सार्वजनिक स्वच्छता आणि मलनिःसारणाची व्यवस्था करणे
४) जन्म-मृत्यू, विवाह यांच्या नोंदी ठेवणे.
५) गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे.
६) सार्वजनिक बागा व उद्याने बांधणे
७) गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे इ.
(२) नगरपंचायत कोणत्या ठिकाणी असते?
उत्तर:
१) शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत असते.
२) पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही अशी काही ठिकाणे आपण पाहतो. तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजे नगरपंचायत होय.