९. ऊर्जा साधने स्वाध्याय प्रश्न उत्तरे
ऊर्जा साधने पाठचा स्वाध्याय दाखवा / ऊर्जा साधने सहावी भूगोल स्वाध्याय / सहावी भूगोल धडा नववा स्वाध्याय ऊर्जा साधने / Urja sadhane sahavi dhada tisara swadhya
स्वाध्याय
(अ) पुढील कार्यासाठी कोणते साधन वापरावे लागेल?
(१) रोहनला पतंग उडवायचा आहे.
उत्तर:
वारा.
(२) आदिवासी पाड्यातील लोकांचे थंडीपासून संरक्षण
करायचे आहे.
उत्तर:
लाकूड
(३) सहलीसाठी प्रवासात सहज हाताळता येतील अशी
स्वयंपाकाची उपकरणे.
उत्तर:
लाकूड, कोळसा
(४) सलमाला
कपड्यांना इस्त्री करायची आहे.
उत्तर:
वीज, कोळसा.
(१)
रेल्वेचे
इंजिन सुरू करायचे आहे.
उत्तर: कोळसा, वीज , खनिज तेल.
(२) अंघोळीसाठी
पाणी तापवायचे आहे.
उत्तर:
लाकूड, बायोगॅस
(७) सूर्यास्तानंतर घरात उजेड हवा आहे.
उत्तर: खनिज तेल, वीज.
उर्जा साधने इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
(ब) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो? त्याचे कारण काय असेल?
उत्तर:
मानव कोळसा हे उर्जा साधन सर्वाधिक प्रमाणात वापरतो.
कोळसा
हा इतर संसाधनांच्या तुलनेने जास्त उपलब्ध आहे. हे त्याचे कारण असावे.
(२) ऊर्जा साधनाची गरज काय ?
उत्तर:
१)
दैनंदिन उपयोगांसाठी उर्जा साधनांची गरज असते.
२)
स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी, उद्योगांसाठी, वाहने चालवण्यासाठी इत्यादी
कारणांसाठी उर्जा साधनांची गरज असते.
(३) पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा
आहे?
उत्तर:
१) जैविक उर्जा साधनांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणवर पर्यावरणाचे प्रदूषण होते.
२) वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते. त्याचा मानवावर, प्राण्यांवर व वनस्पतींवर विपरीत परिणाम होतो. म्हणून पर्यावरणपूरक उर्जा साधनांचा वापर गरजेचा आहे.
(क) खालील मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा.
(उपलब्धता, पर्यावरणपूरकता व फायदे तोटे)
(१) खनिज तेल व सौरऊर्जा
उत्तर:
( हा तक्ता पाहताना मोबाईल आडवा (tilt) करून पहा )
|
खनिज तेल |
सौरउर्जा |
उपलब्धता |
खनिज तेल मर्यादित प्रमाणात उपलब्ध
आहे. |
सौरउर्जा विपुल प्रमाणात सर्वत्र
उपलब्ध आहे. |
पर्यावरणपूरकता |
खनिज तेलाचा वापर हा पर्यावरणपूरक
नाही. |
सौरउर्जेचा वापर पर्यावरण पूरक आहे. |
फायदे / तोटे |
खनिज तेलाचा वापर केल्याने मोठ्या
प्रमाणावर प्रदूषण होते. |
सौरउर्जेचा वापर केल्याने कोणत्याही
प्रकारचे प्रदूषण होत नाही. |
(२) जलऊर्जा व भूगर्भीय ऊर्जा
उत्तर:
( हा तक्ता पाहताना मोबाईल आडवा (tilt) करून पहा )
|
जलऊर्जा |
भूगर्भीय ऊर्जा |
उपलब्धता |
जलऊर्जा भूगर्भीय उर्जेच्या
तुलनेमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध आहे. |
भूगर्भीय उर्जा सर्वत्र विपुल
प्रमाणत उपलब्ध आहे. |
पर्यावरणपूरकता |
पर्यावरणपूरक आहे. |
कमी प्रदूषण होते. |
फायदे / तोटे |
जलऊर्जा तुलनेने कमी खर्ची क आहे. |
भूगर्भीय ऊर्जा निर्मिती अधिक खर्चिक
आहे. |
मित्रांनो
हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.
त्यांनाही
अभ्यास करताना याचा फायदा होईल.