४.वैदिक संस्कृती इयत्ता सहावी इतिहास स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Vaidik sanskruti 6th swadhyay prashn uttare

४.वैदिक संस्कृती स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

वैदिक संस्कृती   स्वाध्याय / वैदिक संस्कृती   इयत्ता सहावी स्वाध्याय / वैदिक संस्कृती   प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी / वैदिक संस्कृती   याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे / Vaidik sanskruti  prashn uttare eyatta sahavi Vaidik sanskruti eyatta sahavi swadhyay

स्वाध्याय


प्र.१. पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा.

(१) वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया

उत्तर: गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा


 (२) वेदकालीन मनोरंजनाची साधने

उत्तर: वादन, गायन, नृत्य, सोंगट्याचा खळे, रथांच्या शर्यती आणि शिकार.


 (३) वेदकालीन चार आश्रम

उत्तर: ब्राम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम.

वैदिक संस्कृती   स्वाध्याय वैदिक संस्कृती   इयत्ता सहावी स्वाध्याय वैदिक संस्कृती   प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी वैदिक संस्कृती   याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Vaidik sanskruti  prashn uttare eyatta sahavi Vaidik sanskruti eyatta sahavi swadhyay

४.वैदिक संस्कृती इयत्ता सहावी इतिहास स्वाध्याय प्रश्न उत्तरे


प्र.२. चूक की बरोबर ओळखा.

(१) यज्ञात म्हटले जाणारे मंत्र-ऋग्वेद

उत्तर: चूक


(२) अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद-अथर्ववेद

उत्तर: बरोबर


(३) यज्ञविधींच्या वेळी मंत्रगायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद-सामवेद

उत्तर: बरोबर

 

प्र.३. एका शब्दात उत्तरे लिहा.

(१) वैदिक वाङ्मयाची भाषा......... .

उत्तर: संस्कृत


(२) विद् म्हणजे......... .

उत्तर: जाणणे


(३) गोधूम म्हणजे......... .

उत्तर: गहू 

(४) घराचा प्रमुख म्हणजे......... .

उत्तर: गृहपती


(५) श्रेणींच्या प्रमुखाला म्हणत......... .

उत्तर: श्रेष्ठ


प्र.४. नावे लिहा.

(१) तुम्हांस माहीत असलेली वाद्ये ........................... .

उत्तर: वीणा, मृदुंग, ढोलकी, बासरी, टाळ, चिपळ्या,  डमरू, सतार, तबला.


(२) सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान दोन दागिने ........................... .

उत्तर: हार, पैजण, अंगठी.


(३) सध्याची मनोरंजनाची साधने...........................

उत्तर: मोबाईल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट.

 

प्र.५. थोडक्यात उत्तरे लिहा.

(१) वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता?

 उत्तर:

१)    गहू, सातू, तांदूळ या तृण धान्यांचा वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने समावेश होता. यापासून ते विविध प्रकारचे पदार्थ बनवत असत.

२)   दुध, दही, लोणी, तूप, मध इत्यादी पदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश होता.

३)   उडीद , तीळ, मसूर यांचाही आहारामध्ये समावेश होता.

 

(२) वेदकाळात गाईंची विशेष काळजी का घेतली जाई?

उत्तर:

१)घोडा, गाय-बैल, कुत्रा या प्राण्यांना वैदिक प्राण्यांना विशेष असे महत्व होते.

२) वैदिक काळात गाईंचा विनिमयासाठी वापर केला जात असे त्यामुळे गाईंना विशेष किंमत होती.

३)कोणी आपल्या गाई चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई.

 

(३) संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती?

उत्तर:

१)    चौथा आश्रम म्हणजे ‘संन्यासाश्रम’ आहे.

२)   यामध्ये माणसाने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्यजन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे, फार काळ एका ठिकाणी राहू नये, असा संकेत होता. अशा प्रकारे संन्यासाश्रम मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती.

 

प्र.६. टीपा लिहा.

(१) वेदकालीन धर्मकल्पना

उत्तर:

१)    वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते.

२)   त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत.

३)    त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत. त्याला ‘हवी’ असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये ‘हवी’ अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ.

४) प्राणी मात्रांचे जीवन हाही सृष्टीचाक्राचाच भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर अनेक संकटे येतात.

५)  तसे होऊ नये म्हणून प्रत्येक मनुष्याने काळजी घ्यायला हवी. सर्वांनी सृष्टीचे नियम न मोडता वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे समजले जाई.

 

 (२) वेदकालीन घरे

उत्तर:

१)    वेदकाळातील घरे ही मातीची किंवा कुडापासून तयार केलेली असत.

२)   गवत किंवा वेलींचे जाड तट्टे विणून त्यावर शेण-माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कुड होय.

३)   या घरांच्या जमिनी शेणा मातीने सारवलेल्या असत. घरास्ठी ‘गृह’ किंवा ‘शाला’ हे शब्द वापरले जात.


(३) वेदकालीन शासनव्यवस्था

उत्तर:

१)    वेदकाळातील ग्रामवसाहतीच्या प्रमुखास ‘ग्रामणी’ असे म्हटले जाई.

२)   ग्रामवसाहतींचा समूहाला ‘विश्’असे म्हटले जात असे. आणि त्या समूहाच्या प्रमुखास ‘विश्पति’ असे म्हणत.

३)   अनेक ‘विश्’ मिळून ‘जन’ तयार होत असे आणि हे जन नंतर जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले, तेव्हा त्या प्रदेशाला ‘जनपद’ म्हटले गेले. ‘जन’च्या प्रमुखाला ‘नृप’ किंवा ‘राजा’ म्हटले जाई.

४)  ‘जन’ च्या उत्पन्नातील राजाचा ‘भाग’ गोळा करणारा भागदुघ असे.

५)  राजाला मार्गदर्शन करण्यासाठी ‘सभा’, ‘समिती’, ‘विदथ’ आणि ‘जन’अशा प्रकारच्या चार संस्था होत्या. त्यांमध्ये राज्यातील लोक सहभागी होत.

६)   ‘सभा’ आणि ‘विदथ’ या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास ‘सभा’ म्हटले जात असे.

७) तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस ‘समिती’ असे म्हणत.समितीमध्ये लोकांचा सहभाग असलेला पाहायला मिळतो.


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा

त्यांनाही बरोबर उत्तरे कोणती आहेत याची माहिती मिळेल.

 

वैदिक संस्कृती   स्वाध्याय
वैदिक संस्कृती   इयत्ता सहावी स्वाध्याय
वैदिक संस्कृती   प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी
वैदिक संस्कृती   याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Vaidik sanskruti  prashn uttare eyatta sahavi
Vaidik sanskruti eyatta sahavi swadhyay

Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.