1.शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय प्रश्न उत्तर
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय / शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय / शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र प्रश्न उत्तर
स्वाध्याय
प्र.१. रिकाम्या जागी कंसातील
योग्य पर्याय लिहा.
(अ) शिवाजी महाराज ज्या काळात
होऊन गेले तो काळ ............युगाचा होता .
( प्राचीन , मध्य , आधुनिक )
उत्तर: शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्य युगाचा होता .
(आ) शिवाजी महाराजांनी ................
निर्माण केले.
( महाराष्ट्रात , मध्यप्रदेशात , उत्तर प्रदेशात )
उत्तर: शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात निर्माण केले.
शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र इयत्ता ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र.२.' अ ' गट व ' ब ' गट यांच्या जोड्या लावा .
(हा तक्ता पाहण्यासाठी मोबाईल(tilt) आडवा करा.)
'अ' गट |
उत्तरे |
'ब' गट |
(अ) विजयनगरचा सम्राट |
कृष्णदेवराय |
(१) निजामशाहा |
(आ) अहमदनगरचा सुलतान |
निजामशाहा |
(२) आदिलशाहा |
(इ) विजापूरचा सुलतान |
आदिलशाहा |
(३) कृष्णदेवराय |
|
|
(४) सम्राट अकबर |
प्र.३.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .
(अ) प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा .
उत्तर: उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राज्य करणारे राजे आहेत. त्याचबरोबर शिवाजीमहाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते.
(आ) शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले ?
उत्तर: शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचे कार्य हाती घेतले.
(इ) शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली?
उत्तर: रयतेवर अन्याय करणाऱ्या
सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली.
प्र.४.वेगळा शब्द ओळखा .
(अ) स्वराज्य , गुलामगिरी , स्वातंत्र्य .
उत्तर: गुलामगिरी
(आ) रयत , प्रजा , राजा .
उत्तर: राजा
हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.