10.बल व बलाचे प्रकार इयत्ता ६वी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Bal v Balache prakar 6th swadhyay prashn uttare

10.बल व बलाचे प्रकार स्वाध्याय प्रश्न उत्तरे

 

बल व बलाचे प्रकार इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / बल व बलाचे प्रकार प्रश्न उत्तर / बल व बलाचे प्रकार स्वाध्याय / सहावी सामान्य विज्ञान बल व बलाचे प्रकार स्वाध्याय उत्तरे

स्वाध्याय


प्र.१.रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून लिहा .

अ . ............वस्तूची ............... बदलण्यासाठी........... लावावे लागते .

( बल , गतिमान , दिशा )

उत्तर:  गतिमान वस्तूची दिशा  बदलण्यासाठी बल लावावे लागते .

 

आ . हत्ती लाकडाचा ओंडका जमिनीवरून ओढून नेताना त्या ओंडक्यावर............., .................व ................ ही बले लावलेली असतात .

 ( स्नायू बल , यांत्रिक बल , गुरुत्वीय बल , व घर्षण बल )

उत्तर: हत्ती लाकडाचा ओंडका जमिनीवरून ओढून नेताना त्या ओंडक्यावर स्नायू बल , घर्षण बल गुरुत्वीय बल  ही बले लावलेली असतात .

 

इ . एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळत सोडला . त्याची .............बदलायची असेल , तर त्यावर .............लावावे लागेल .

( बल , गती , गुरुत्वाकर्षण )

उत्तर: एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळत सोडला . त्याची गती बदलायची असेल , तर त्यावर बल लावावे लागेल .

 

उ . घर्षण बल हे नेहमीच गतीच्या ...............कार्य करते .

( दिशेने , विरोधात )

उत्तर: घर्षण बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते .

 

बल व बलाचे प्रकार इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे बल व बलाचे प्रकार प्रश्न उत्तर बल व बलाचे प्रकार स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान बल व बलाचे प्रकार स्वाध्याय उत्तरे Bal v balache prakar  swadhyay prashn uttare Bal v balache prakar prashn uttre 6th vidnyan swadhyay prashn uttare.

.बल व बलाचे प्रकार इयत्ता ६वी स्वाध्याय प्रश्न उत्तरे


प्र.२.शोधा पाहू , माझा सोबती कोण ?


' ' गट

उत्तरे

' ' गट

१. बैलाने गाडी ओढणे

स्नायू बल

अ . चुंबकीय बल

२. क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे

चुंबकीय बल

आ.स्थितिक विदयुत बल

३. ताणकाट्याने वजन करणे

गुरुत्वीय बल

इ.स्नायू बल

४. सायकलला ब्रेक लावणे

घर्षण बल

ई.घर्षण बल

५.घासलेल्या प्लॅस्टिक कागदाचे कपटे उचलणे .

स्थितीक विद्युत बल

 

 

प्र.३ . खालील उदाहरणांमध्ये एक किंवा अधिक बले कार्यरत आहेत ती ओळखा.


 अ . उंच झारतीवरून खाली पडणारी वस्तू –

उत्तर: गुरुत्वीय बल

 

आ . आकाशातून जाणारे विमान –

उत्तर: यांत्रिक बल

 

इ . उसाच्या चरकातून रस काढताना –

उत्तर: यांत्रिक बल, घर्षण बल


ई . धान्य पाखडले जात असताना –

उत्तर: स्नायू बल , गुरुत्वीय बल

 

प्र.४.प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा .

स्नायू बल , गुरुत्वीय बल , स्थितिक विदयुत बल , घर्षण बल व चुंबकीय बल

उत्तर:

१)   स्नायू बल:

उत्तर:

                    स्नायूंच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायू बल असे म्हणतात.

                    जर एखादी धान्याने भरलेली पिशवी उचालायची असेल तर ती हाताने उचलण्यासाठी आपल्याला ताकद लावावी लागते. या वेळी त्या क्रियेमध्ये आपले स्नायू बल उपयोगी पडते.

उदा: हातगाडी ओढणारा कामगार आपल्या स्नायू बलाने हातगाडी ओढतो.


२)   गुरुत्वीय बल

उत्तर:

                पृथ्वी  जे बल लावून वस्तूंना आपल्याके खेचते त्यास गुरुत्वीय बल असे म्हणतात.

उदा: आपण वर फेकलेली वस्तू पुन्हा खाली येते तेव्हा तिच्यावर गुरुत्वीय बल कार्यरत असते.


३)   स्थितीक विद्युत बल

उत्तर:

                घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाईट यांसारख्या पदार्थांवर विद्युतभार निर्माण होतो. अशा विद्युतभरीत पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितीक विद्युतबल असे म्हणतात.

उदा: घासलेल्या प्लॅस्टिक कागदाचे कपटे उचलणे . यामध्ये स्थितीक विद्युत बल कार्यरत असते.


४)   घर्षण बल:

उत्तर:

        दोन पृष्ठभाग जेव्हा एकमेकांवर घासल्यावर जे बल निर्माण होते त्याला घर्षण बल असे म्हणतात.

उदा: सायकल थांबवताना ब्रेक लावला , की थोड्या अंतरावर सायकल थांबते या वेळी घर्षण बल कार्य करते.


५)   चुंबकीय बल:

उत्तर:

                चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात.

मोठ मोठ्या क्रेन मध्ये चुंबकीय बलाचा वापर करून मोठ मोठ्या वस्तू उचलल्या जातात.

 

Bal v balache prakar  swadhyay prashn uttare / Bal v balache prakar prashn uttre  6th vidnyan swadhyay prashn uttare.

प्र.५.असे का ?

 

अ . यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते .

उत्तर:     यंत्रांमध्ये यांत्रिक बलाचा वापर केला जातो. यंत्रांमध्ये असणारे काही भाग हे एकमेकांवर घासत असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये घर्षण बल कार्य करू लागते आणि त्यामुळे यंत्रांच्या गतीला विरोध निर्माण होतो आणि यांत्रिक बलासाठी जास्त उर्जा खर्ची पडते. यंत्रांना वेळोवेळी तेल दिल्याने यंत्रामध्ये होणारे घर्षण कमी होऊन त्याचे आयुष्य वाढते व यंत्र चांगल्या प्रकारे कार्य करते. म्हणून यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते.

 

आ . वर फेकलेली वस्तू उंचावर जाऊन खाली येते.

उत्तर:     पृथ्वीवरून वर फेकलेल्या वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्यरत असते. वर फेकलेली वस्तू पृथ्वी गुरुत्वीय बलाने स्वतःकडे खेचून घेते त्यामुळे वर फेकलेली वस्तू उंचावर जाऊन खाली येते.

 

इ . कॅरम बोर्डवर पावडर टाकतात .

उत्तर:

            जेव्हा आपण कॅरम बोर्डवरील सोंगटीला हळूच टिचकी मारली की ती कॅरम बोर्डवरून घसरत पुढे जाते त्यावेळी त्या सोंगटीमध्ये आणि  कॅरम बोर्डच्या पृष्ठभागावर घर्षण बल कार्यरत असते त्यामुळे सोंगटी काही अंतरावर जाऊन थांबते. कॅरम बोर्डवर पावडर टाकल्याने सोंगटीमध्ये आणि  कॅरम बोर्डच्या पृष्ठभाग यांमधील घर्षण बल कमी होऊन सोंगट्या सहज सरकतात. म्हणून कॅरम बोर्डवर पावडर टाकतात.

 

ई . रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो.

उत्तर:

                रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग गुळगुळीत असेल तर त्यामुळे चप्पल आणि जिन्याचा उतरणीचा पृष्ठभाग यांमध्ये घर्षणबल कमी झाल्याने तेथून घसरण्याची शक्यता जास्त असते . असे होऊ नये म्हणून उतरणीच्या पृष्ठभाग खडबडीत करून पृष्ठभागाचे घर्षण वाढवले जाते. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका टाळतो म्हणून रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो.

 

 

प्र.६. आमच्यातील वेगळेपणा काय ?

 

अ . स्नायू बल व यांत्रिक बल

उत्तर:

स्नायू बल

यांत्रिक बल

स्नायूंच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायू बल म्हणतात.

यंत्रामार्फत लावलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात.

स्नायू बलासाठी अन्नामार्फत मिळणारी उर्जा वापरली जाते.

यांत्रिक बलासाठी इंधन, किंवा विद्युत उर्जेची आवश्यकता असते.

उदा: एखादे वजन हाताने उचलणे

उदा: यंत्राच्या सहाय्याने वजन उचलणे.

 

 

आ . घर्षण बल व गुरुत्वीय बल

उत्तर:

घर्षण बल

गुरुत्वीय बल

दोन पृष्ठभाग जेव्हा एकमेकांवर घासतात तेव्हा घर्षणबल कार्य करते.

पृथ्वी जे बल लाऊन वस्तूंना आपल्याकडे खेचते त्याला गुरुत्वीय बल म्हणतात.

सरकणाऱ्या वस्तूच्या विरोधात कार्य करते.

वर फेकलेल्या वस्तूवर कार्य करते.

उदा: सपाट जमिनीवरून घरंगळत जाणारा चेंडू पुढे जाऊन थांबतो.

उदा: वर फेकलेला चेंडू पुन्हा खाली येतो.

 

बल व बलाचे प्रकार इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / बल व बलाचे प्रकार प्रश्न उत्तर / बल व बलाचे प्रकार स्वाध्याय     / सहावी सामान्य विज्ञान बल व बलाचे प्रकार स्वाध्याय उत्तरे

प्र.७. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शवदांत लिहा .

अ . बल लावून काय काय करता येते ?

उत्तर:

                दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया पार पडण्यासाठी बालाची आवश्यकता असते. वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा वस्तूची दिशा बदलण्यासाठी त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूचा मूळ आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. जड समान उचलणे, एखाद्या यंत्र चालवणे, वस्तूचे वजन करणे यांसारखी कामे बल लावून करता येतात.

 

आ . वजन म्हणजे काय ?

उत्तर:

        वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजेच त्या वस्तूचे वजन होय.

 

 इ . स्नायू बलाने चालणारी यंत्रे  कोणती ?

उत्तर:    नांगर, बैलगाडी, घोडागाडी, हातगाडी, नावेचा वल्हा, सायकल.

 

 ७ .खालील शब्दकोडे सोडवा .

उभे शब्द

१. बंद पडलेली स्कूटर ढकलण्यासाठी ...... बल लावावे लागते .

२. सांडलेल्या पिना उचलण्यासाठी ...... बलाचा उपयोग करता येतो .

आडवे शब्द

३ . ...........लोखंडी खिळ्याला स्वतःकड़े ओढतो .

४. ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेत नांगरले तेव्हा ... .....बल लावले गेले .

 ५. ढगातून पावसाचे थेंब जमिनीवर ..............बलामुळे पडतात .

उत्तर:

 

 

 

 

स्ना

 

 

 

 

 

यू

 

 

 

 

चुं

यां

त्रि

 

 

 

 

की

 

 

गु

रु

त्वी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

 

बल व बलाचे प्रकार इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
बल व बलाचे प्रकार प्रश्न उत्तर
बल व बलाचे प्रकार स्वाध्याय
सहावी सामान्य विज्ञान बल व बलाचे प्रकार स्वाध्याय उत्तरे
Bal v balache prakar  swadhyay prashn uttare
Bal v balache prakar prashn uttre
6
th vidnyan swadhyay prashn uttare.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.