10.शर्थीने खिंड लढवली स्वाध्याय प्रश्न उत्तरे
शर्थीने खिंड लढवली स्वाध्याय शर्थीने खिंड लढवली प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी शर्थीने खिंड लढवली प्रश्न उत्तर इयत्ता चौथी शर्थीने खिंड लढवली प्रश्न उत्तरे
स्वाध्याय
10.शर्थीने खिंड लढवली इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र.१. रिकाम्या जागी योग्य
शब्द लिहा .
(अ)सिद्दी जौहरने .................गडाला
चौफेर वेढा घातला.
उत्तर: सिद्दी जौहरने पन्हाळा
गडाला चौफेर वेढा घातला.
(अ)
बाजीप्रभूची .............. बघून
शिवराय गहिवरले .
उत्तर: बाजीप्रभूची स्वामिभक्ती
बघून शिवराय गहिवरले .
(आ)
घोडखिंड ........ या नावानेच इतिहासात
अमर झाली .
उत्तर: घोडखिंड पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली .
प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .
(अ) शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्दीला कोणता निरोप पाठवला ?
उत्तर: शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी ‘लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो’, असा सिद्धीला निरोप पाठवला.
(आ) सिद्दी जौहर का चवताळला ?
उत्तर: शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी जौहर चवताळला.
(इ) विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले ?
उत्तर: “आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचतात तोफांचे आवाज होतील; मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या.”, असे विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला म्हणाले.
प्र.३. दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा .
(अ) पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली?
उत्तर: शिवरायांनी दोन पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीकडून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने टी पकडली जाणार आणि शिवाजीराजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार, एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार. अशी युक्ती पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी योजली होती.
(आ) बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली?
उत्तर: बाजीप्रभू खिंडीच्या
तोंडाशी हातात तलवार घेऊन उभा राहिला. त्याने मावळ्यांच्या तुकड्या पडल्या.
त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगड-गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी
तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार केली अशी योजना
बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी आखली.
प्र.४. कारणे लिहा .
(अ) आदिलशाहा भयंकर चिडला .
उत्तर: अफजलखानच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला.
(आ) शिवरायांच्या सेवेमधील शिवा काशिद अमर झाला .
उत्तर: पन्हाळ गडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवाजी महाराजांनी आखलेल्या योजनेमध्ये शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिवा काशिदने आत्मबलिदान केले. त्यामुळे शिवा काशिद अमर झाला.
(इ) पावनखिंड इतिहासात अमर झाली .
उत्तर: शिवाजी महाराज पन्हाळ गडावरून निसटून विशाळगडावर जात असताना . बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीच्या तोंडाशी रोखले. यात स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बाजीप्रभूसारखे देशभक्त होते, म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामिनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड ‘पावनखिंड’ या नावाने अमर झाली.
प्र.५. कोण ते लिहा .
(अ) शूर पण क्रूर होता ..................
उत्तर: सिद्दी जौहर
(आ) घोडखिंडीत शर्थीची झुंज देणारे ..........
उत्तर: बाजीप्रभू
(इ) वेढ्यातून निसटून जाणारे..............
उत्तर: शिवाजी महाराज
हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २
शर्थीने खिंड लढवली स्वाध्याय
शर्थीने खिंड लढवली स्वाध्याय
शर्थीने खिंड लढवली प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी
शर्थीने खिंड लढवली प्रश्न उत्तर
इयत्ता चौथी शर्थीने खिंड
लढवली प्रश्न उत्तरे
Sharthine khind ladhavli iyatta chouthi swadhyay prashn uttare
Sharthine khind ladhavali swadhyay prashan uttare