६.अन्नातील विविधता स्वाध्याय प्रश्न उत्तरे
अन्नातील विविधता स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / अन्नातील विविधता भाग १ घरोघरी पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / अन्नातील विविधता इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी
स्वाध्याय
(अ) थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) गव्हापासून कोणकोणतेअन्नपदार्थ बनवले जातात?
उत्तर: गव्हापासून विविध
अन्नपदार्थ बनवले जातात. गव्हाच्या पिठापासून पुरी, पोळी, पराठा यांसारखे पदार्थ
बनवले जातात. याव्यतिरिक्त लापशी, खीर, शिरा तसेच पापड, कुर्दी यांसारखे पदार्थ
गव्हापासून बनवले जातात .
(२) विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावे लिहा.
उत्तर: मोहरीचे तेल, तिळाचे तेल, सोयाबीन तेल, सुर्यफुल तेल, शेंगदाणा तेल. इत्यादी.
(३) तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ कोणता ? हा अन्नपदार्थ कशापासून बनवला जातो ?
उत्तर: आमच्या गावी केला जाणारा
विशेष अन्नपदार्थ म्हणजे मासेभात होय.
यामध्ये तांदूळ आणि मासे हे अन्न घटक वापरले जातात.
६.अन्नातील विविधता स्वाध्याय प्रश्न उत्तरे |
(आ) गटात न बसणाऱ्या अन्नपदार्थाभोवती गोल करा.
गटात तो न बसण्याचे कारण लिहा.
(१) कैरी लोणचे, आंबा, मुरांबा, आमरस.
उत्तर: आंबा
कारण : वरीलपैकी आंबा हा मूळ अन्नघटक असून आमरस, मुरांबा व कैरीचे लोणचे हे आंबा हा अन्नघटक वापरून बनवलेले अन्नपदार्थ आहेत. म्हणून आंबा हा वेगळा अन्नघटक आहे.
(२) पुलाव, पराठा, दहीभात, बिर्याणी.
उत्तर: पराठा
कारण: वरीलपैकी पराठा हा वेगळा घटक आहे कारण पुलाव , दहीभात आणि बिर्याणी या पदार्थांमध्ये तांदूळ हा मुख्य अन्नघटक वापरला जातो. पुलाव वेगळा घटक आहे कारण तो गव्हाच्या पिठापासून बनवला जातो.
(३) मैसूरपाक, पुरणपोळी, थालीपीठ, झुणका-भाकर.
उत्तर: मैसूरपाक
कारण: पुरणपोळी, थालीपीठ, झुणका-भाकर हे सर्व पदार्थ हे महाराष्ट्रीयन आहेत त्यांचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अन्न म्हणून वापर केला जातो. तर मैसूरपाक हा पदार्थ कर्नाटक राज्यामध्ये प्रामुख्याने बनवला जातो.
(इ) खालीलपैकी धान्य, भाजी व फळभाजी कोणती ते ओळखा.
यांपासून कोणकोणते अन्नपदार्थ होऊ शकतात त्यांची यादी करा.
कणीस
उत्तर: धान्य
पदार्थ : उसळ, पराठा, भाजी.
भोपळा:
उत्तर: फळभाजी
पदार्थ: भाजी, घारगे.
गवार:
उत्तर: भाजी
पदार्थ: भाजी.
✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂
- स्वाध्याय आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
- हा स्वाध्याय खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.