९.गती व गतीचे प्रकार सामान्य विज्ञान सहावी प्रश्न उत्तरे | Gati v gatiche prakar 6th swadhyay prashn uttare.

९.गती व गतीचे प्रकार स्वाध्याय प्रश्न उत्तरे.

गती व गतीचे प्रकार इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / गती व गतीचे प्रकार प्रश्न उत्तर / गती व गतीचे प्रकार स्वाध्याय / सहावी सामान्य विज्ञान गती व गतीचे प्रकार  स्वाध्याय उत्तरे / Gati v gatiche prakar  swadhyay prashn uttare 

स्वाध्याय


प्र.१.गतीचा प्रकार ओळखा.


अ.पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे...........

उत्तर: नियतकालिक गती


आ. छताला टांगलेला फिरणारा पंखा ...............

उत्तर: वर्तुळाकार गती 


इ.   आकाशातून पडणारी उल्का ..............

उत्तर: रेषीय गती


ई.    जमिनीवरून उडवलेले रॉकेट ...........

उत्तर: रेषीय गती  


उ.   पाण्यात पोहणारा मासा.................

उत्तर: यादृच्छिक गती


ऊ. सतारीची छेडलेली तार.............

उत्तर: आंदोलित गती

 

गती व गतीचे प्रकार इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे गती व गतीचे प्रकार प्रश्न उत्तर गती व गतीचे प्रकार स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान गती व गतीचे प्रकार  स्वाध्याय उत्तरे Gati v gatiche prakar  swadhyay prashn uttare Gati v gatiche prakar prashn uttre 6th vidnyan swadhyay prashn uttare.

९.गती व गतीचे प्रकार सामान्य विज्ञान सहावी प्रश्न उत्तरे


प्र.२. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.


अ.इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो ............... गतीने खाली येतो तर गच्चीला समांतर रेषेत  गच्चीबाहेर फेकल्यास तो ................... गतीने जमिनीवर येईल.

उत्तर: इमारतीच्या गच्चीवरून चेंडू सोडून दिल्यास तो एकरेषीय असमान  गतीने खाली येतो तर गच्चीला समांतर रेषेत  गच्चीबाहेर फेकल्यास तो नैकरेषीय  गतीने जमिनीवर येईल.

 

आ.धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती .................. असते.

उत्तर: धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती एकरेषीय असते.

 

इ.आकाशातून भक्ष्याच्या शोध घेत उडणारी घार ............... गतीने उडते.

उत्तर: आकाशातून भक्ष्याच्या शोध घेत उडणारी घार वर्तुळाकार  गतीने उडते.

 

ई.फिरतात असलेल्या आकाशपाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती .................., तर मेरी गो राउंडमध्ये बसलेल्या मुलांची गती ................ असते.

उत्तर: फिरतात असलेल्या आकाशपाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती समान वर्तुळाकार तर मेरी गो राउंडमध्ये बसलेल्या मुलांची गती असमान वर्तुळाकार असते.


(एकरेषीय,नैकरेषीय, वर्तुळाकार, एकरेषीय समान, एकरेषीय असमान, समान वर्तुळाकार, असमान वर्तुळाकार, यादृच्छिक )

 

प्र.३.आमच्यातील वेगळेपण काय?

 

अ.आंदोलित गती व रेषीय गती.

उत्तर:

आंदोलित गती

रेषीय गती

आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती म्हणतात.

एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर.

आंदोलित गती हा नैकरेषीय गतीचा प्रकार आहे.

रेषीय गती ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने असते.

वस्तू पुन्हा मूळ जागी परत येते.

वस्तूचे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर विस्थापन होते.

उदा: झोपाळा

उदा: सैनिकांचे संचलन

 

 

आ.रेषीय गती व यादृच्छिक गती.

उत्तर:

रेषीय गती

यादृच्छिक गती

रेषीय गतीची दिशा बदलत नाही.

यादृच्छिक गतीची दिशा सतत बदलत असते.

या गतीतील वस्तू एका सरळ रेषेत जातात.

या गतीतील वस्तू एका सरळ रेषेत जात नाहीत.

उदा: सैनिकांचे संचलन

उदा: फुलपाखराचे उडणे.

 

इ.यादृच्छिक गती व आंदोलित गती.

उत्तर:

यादृच्छिक गती

आंदोलित गती

यादृच्छिक गतीची दिशा सतत बदलत असते.

आंदोलित गतीतील वस्तूला निच्छित दिशा असते.

ज्या गतीची दिशा आणि चाल सतत बदलत असते, अशा गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात.

आंदोलनामुळे प्राप्त झालेल्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात.

वस्तू पुन्हा मूळ जागी येत नाही

वस्तू पुन्हा मूळ जागी येत.

उदा: फुलपाखराचे उडणे.

उदा: झोपाळा

 


प्र.४. प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

 

अ.रेषीय गती

उत्तर: 

                    एकाच सरळ रेषेत एखाद्या वस्तूचे विस्थापन होत असेल , तर त्या वस्तूच्या गतीला रेषीय गती असे म्हणतात. रेषीय गतीचे रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती असे दोन प्रकार आहेत. एकक कालावधीमध्ये एका सरळ रेषेमध्ये जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर हे सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हटले जाते. आणी ज्या वेळी एखादी वस्तू एकक कालावधी सरळ रेषेत जात असतना ती वस्तू  समान कालावधीत असमान अंतर पार करते तेव्हा त्या गातील रेषीय असमान गती अशे म्हटले जाते.

उदा: सैनिकांच्या संचलनाची गती ही ‘रेषीय एकसमान गती चे उदाहरण आहे. आणि घसरगुंडीवरून घसरणारी मुले रेषीय असमान गती दर्शवतात.


आ.आंदोलित गती

उत्तर:

                    आंदोलित गती ही नैकरेषीय गतीचा प्रकार आहे. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. आंदोलित गतीमधील वस्तू काही ठराविक कालावधीनंतर पुन्हा तिच्या मूळ जागी येते.

उदा: घडाळ्यात फिरणारा लंबक , शिवणयंत्र चालू असताना सुईची होणारी हालचाल, पक्षांच्या पंखांची हालचाल.

 

इ.वर्तुळाकार गती
उत्तर:

                    जेव्हा गतिमान असलेली वस्तू ही वर्तुळाकार मार्गात फिरत असते तेव्हा त्या वस्तूच्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. जेव्हा वर्तुळाकार मार्गात फिरणारी एखादी वस्तू ही काही ठराविक वेळेत पुन्हा त्याच जागेवर येते तेव्हा त्या गतीला नियतकालिक गती म्हणतात. वर्तुळाकार गती ही नियतकलिक गती देखील होऊ शकते.

उदा: घरातील पंखे, मेरी गो राउंड.

 

ई.यादृच्छिक गती

उत्तर:

                    ज्या गतीची दिशा आणी चाल सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. या गतीमधील वस्तूला कोणतीही निश्चित अशी दिशा नसते.

उदा: उडणारे फुलपाखरू, खेळणारी मुले.

 

उ.नियतकालिक गती

उत्तर:

                    ज्या वस्तू ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात. त्या गतीला नियतकालिक गती असे म्हटले जाते.

उदा: घडाळ्याचा काटा ६० मिनिटांत एक फेरी पूर्ण करतो.

 

प्र.५. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.


अ.आकाशात उडणाऱ्या पक्षांच्या हालचालींमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात.

उत्तर:

                आकाशामध्ये उडणाऱ्या पक्षांच्या पंखांच्या हालचालींमध्ये आंदोलित गती दिसते. काही पक्षी ही एका सरळ रेषेत आणि समान गतीने उडतात आणि काही पक्षी एका सरळ रेषेत आणि असमान कालावधीत उडतात. त्यामुळे पक्षी रेषीय एकसमान आणि रेषीय असमान या दोन्ही गती दर्शवतात.


आ.रस्त्यावरून सायकल चालवताना तुम्हाला कोणकोणत्या गतीचा अनुभव येतो ते सविस्तर लिहा.

उत्तर:

  सायकल चालवताना पुढील गतींचा अनुभव येतो.

                    सायकलची फिरणारी चाके ही वर्तुळाकार गती दर्शवतात. सायकल ला गती देण्यासाठी मारावे लागणारे पेडल हे सुद्धा वर्तुळाकार गती दर्शवतात. आपण जर एका समान गतीने एकाच रेषेत सायकल चालवली तर रेषीय एकसमान गतीचा अनुभव होतो. जर आपण सायकल एका सरळ रेषेत पण कमी जास्त गतीने चालवली तर त्या ठिकाणी रेषीय असमान गतीचा अनुभव येतो.

 

प्र.६. खालील कोडे सोडवा.


१.घड्याळातील काट्यांची गती.

२.झाडावरून खाली पडणाऱ्या फळांची गती

३.गोफानीची गती

४.मैदानात खेळणाऱ्या मुलांची गती.

उत्तर:

 

 

 

१.नि

 

 

२.रे

षी

 

 

 

 

 

३.व

र्तु

ळा

का

 

 

 

लि

 

४.या

दृ

च्छि

 

 

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


गती व गतीचे प्रकार इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
गती व गतीचे प्रकार प्रश्न उत्तर
गती व गतीचे प्रकार स्वाध्याय
सहावी सामान्य विज्ञान गती व गतीचे प्रकार  स्वाध्याय उत्तरे
Gati v gatiche prakar  swadhyay prashn uttare
Gati v gatiche prakar prashn uttre
6
th vidnyan swadhyay prashn uttare.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.