९. हवा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
हवा स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / परिसर अभ्यास भाग १ हवा स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / हवा इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी / इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वाध्याय
(अ) माहिती मिळवा.
इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये औषध
घेण्यापूर्वी सिरिंजची दांडी आधी आत दाबतात. ते कशासाठी ?
उत्तर: इंजेक्शन चे सिरींज औषधाने भरण्याआधी सिरींजची दांडी आत दाबल्याने त्यातील हवा निघून जाते. नंतर जेव्हा औषध घेण्यासाठी सिरींजची दांडी मागे ओढली जाते तेव्हा हवेबरोबर औषध सिरींजमध्ये चढते. जर सिरींजची दांडी आधीच आत दाबली नाही तर आधी पासून सिरींजमध्ये असणाऱ्या हवेमुळे औषध सिरींजमध्ये चढणार नाही. म्हणून इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये औषध घेण्यापूर्वी सिरिंजची दांडी आधी आत दाबतात.
हवा स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी परिसर अभ्यास भाग १ | |
(अ) जरा डोके चालवा.
(१) रोजच्या वापरातल्या कोणत्या वस्तूंमध्ये हवा दाबून भरलेली असते?
उत्तर: गाडीचा टायर, सायकल चा टायर, सिलिंडर, फुटबॉल, हवेची गादी किंवा उशी. इत्यादी रोजच्या वापरातल्या वस्तूंमध्ये हवा दाबून भरलेली असते.
(२) लाकूड किंवा कोळसा जाळताना हवेत काय मिसळताना दिसते?
उत्तर: लाकूड किंवा कोळसा जाळताना हवेत धूर मिसळताना दिसतो.
(३) पाणी उकळत असताना हवेत काय मिसळते?
उत्तर: पाणी उकळत असताना हवेत पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प हवेत मिसळते.
(आ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
(१) रिकाम्या भांड्यातही ------ असते.
उत्तर: रिकाम्या भांड्यातही हवा असते.
(२) पृथ्वीपासून उंचावरची हवा पृथ्वीलगतच्या हवेपेक्षा ------ असते.
उत्तर: पृथ्वीपासून उंचावरची हवा पृथ्वीलगतच्या हवेपेक्षा विरळ असते.
(३) हवेचे पाच भाग केल्यास त्यांतील ----- भाग ऑक्सिजन असतो.
उत्तर: हवेचे पाच भाग केल्यास त्यांतील एक भाग ऑक्सिजन असतो.
(४) हवेचे पृथ्वीजवळचे थर वरच्या थरांपेक्षा ------ भार पेलतात.
उत्तर: हवेचे पृथ्वीजवळचे थर वरच्या थरांपेक्षा जास्त भार पेलतात.
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
हा स्वाध्याय खालील दिलेल्या व्हॉट्सॲप च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. 👇
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏