८. मोलाचे अन्न स्वध्याय प्रश्न उत्तरे चौथी परिसर अभ्यास भाग १ | Molache anna swadhyay prashn uttare parisar abhyas bhag 1

८. मोलाचे अन्न स्वध्याय  प्रश्न  उत्तरे

मोलाचे अन्न  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / मोलाचे अन्न  भाग १ घरोघरी पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / मोलाचे अन्न  इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी / इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय

 

( अ ) काय करावे बरे ?

        डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत कुठून येतात याची माहिती मित्राला हवी आहे .

उत्तर: काही लोक जंगलांमध्ये मिळणारे डोंगरी आवळे गोळा करतात आणि विकतात. त्यांच्या प्रयत्नांतून डोंगरी आवळे आपल्याला घरापर्यंत येतात.

 

( आ ) माहिती मिळवा .

१.    समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते , त्या ठिकाणाला काय म्हणतात ?

उत्तर: समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला ‘मिठागर’ असे म्हणतात.

मोलाचे अन्न  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी मोलाचे अन्न  भाग १ घरोघरी पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी मोलाचे अन्न  इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Molache anna eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag 1 molache anna swadhyay iyatta chothi  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

मोलाचे अन्न स्वध्याय  प्रश्न  उत्तरे चौथी


२.   शेतामध्ये बटाट्याचे पीक घेतले , तर बटाटे जमिनीखाली तयार होतात . मुळाही जमिनीखाली तयार होतो . वनस्पतींपासून आणखी कोणती कंदमुळे मिळतात ?

उत्तर: रताळे, बीट, सुरण, मुळा, गाजर इत्यादी कंदमुळे वनस्पतींपासून मिळतात.


३.   कणगी म्हणजे काय ? त्याचा शेतकऱ्याला कोणता उपयोग होतो ?

उत्तर: धान्य साठवून ठेवण्यासाठी बांबूपासून रांजणाच्या आकाराची बनवलेली टोपली. जिचा तळाकडील भाग पसरत असतो आणि वर निमुळता होत जातो. बांबूपासून तयार केल्यानंतर तिच्यावर शेणाचा थर लिंपला जातो जेणेकरून ती हवाबंद व्हावी. यालाच कणगी असे म्हणतात. शेतकऱ्याला या कणगीचा वापर धान्य साठवून ठेवण्यासाठी होतो.


४.  शेतकरी तिफण नावाचे अवजार कशासाठी वापरतात ?

उत्तर: शेतात पिक लागवड करण्यासाठी तिफण या अवजाराचा वापर केला जातो.  तिफण या अवजाराला औत किंवा नांगर असे देखील म्हटले जाते. शेत नांगरण्यासाठी आणि पेरणीसाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो.


५.  लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात ? ते पदार्थ आपल्या घरापर्यंत कोठून येतात ?

उत्तर: लिंबाचे सरबत तयार करण्यसाठी मीठ, पाणी, लिंबू, साखर हे पदार्थ लागतात. नळाच्या माध्यमातून पाणी आपल्या घरापर्यंत येते. शेतकरी लिंबाची शेती करतात आपण ती बाजारात जाऊन खरेदी करतो .समुद्राच्या पाण्यापासून मिठागरांत मीठ तयार केले जाते. शेतकरी उसाचे उत्पादन घेतो. उसावर कारखान्यात प्रक्रिया केली जाते आणि साखर तयार केली जाते.

 

( इ ) पुढील तक्ता पूर्ण करा .

बाजरीची

कणसे

ज्वारीची

कणसे

गव्हाच्या

लोंब्या

भाताच्या

लोंब्या

भुईमुगाच्या

शेंगा.

 

Molache anna eyatta chouthi swadhyay prashn uttare
Parisar abhyas bhag molache anna swadhyay iyatta chothi 
Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

 ई ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा .


१.    जमिनीचा.............. झाला की पेरणी करतात .

उत्तर: जमिनीचा वाफसा झाला की पेरणी करतात .


२.   कणसापासून बाजरीचे दाणे सुटे करायच्या कामाला ............. म्हणतात .

उत्तर: कणसापासून बाजरीचे दाणे सुटे करायच्या कामाला मळणी म्हणतात .


३.   वाऱ्याने हलकी ............ उडून दूर जातात .

उत्तर: वाऱ्याने हलकी टरफले उडून दूर जातात.

 

४. काही लोक बोरे , करवंदे अशी .......... जंगलातून गोळा करून विकतात .

उत्तर: काही लोक बोरे , करवंदे अशी फळे जंगलातून गोळा करून विकतात .

 

५.अन्न उत्पादनात व वाहतूक करताना यंत्रे व वाहने वापरतात . ती चालवण्यासाठी ..................वर  खर्च होतो .

उत्तर: अन्न उत्पादनात व वाहतूक करताना यंत्रे व वाहने वापरतात . ती चालवण्यासाठी वाहतुकीवर  खर्च होतो .

 

( उ ) थोडक्यात उत्तरे लिहा .


१.    बाबा जमिनीची मशागत कशी करतात ?

उत्तर: जमिनीची मशागत करण्यासाठी बाबा आपल्या ट्रक्टर ला वेगवेगळी अवजारे जोडतात आणि मशागतीसाठी सर्वात अदाही शेतीची नांगरणी करतात, मातीची ढेकळे फोडतात. आणि जमीन पेरणी करण्यासाठी सपाट करून घेतात. अशा प्रकारे बाबा जमिनीची मशागत करतात.


२.   धान्य साऱ्या देशभर कसे पोचवले जाते ?

उत्तर: शेतकरी शेतात पिक घेतात आणि धन्य मिळवतात. घरात आवश्यक तेवढे धान्य ठेऊन उरलेले धन्य शेतकरी बाजारपेठेत विक्री करतात. व्यापारी हे धान्य शेतकऱ्यांकडून विकत घेतात आणि ट्रकने, मालगाडीने सर्वत्र देशभर पोहोचवतात.


३.   अन्न वाया का घालवायचे नाही ?

उत्तर: शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यापासून ते अगदी आपल्या घरात अन्नपदार्थ बनवण्यापर्यंत  अनेक लोकांच्या प्रयत्नांनी अन्न तयार होते. आपल्या आहारामध्ये येणारे सर्व अन्नपदार्थ हे नीरनिराळ्या ठिकाणांहून येतात. धान्याचे पिक घेताना, शेतीच्या माशागातीपासून धन्यान पोत्यात भरून गोदामात साठावून होईपर्यंत अनेक कामे करावी लागतात.. मळणी, कापणी, उफणणी ही त्यापैकी काही कामे आहेत. त्यानंतर पुढे धान्याची वाहतूक , विक्री आणि खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी कष्ट घ्यावे लगत तेव्हा आपल्याल ताटात अन्न येते. शेतीप्रमाणे इतर लोकांचेही कष्ट असतात. म्हणून आपण अन्न वाया घालवायचे नाही.


४.  घरात धान्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी काय काय करावे लागते?

उत्तर: घरात धान्य आणल्यानंतर  ते निवडले जाते आणि स्वच्छ केले जाते. स्वच्छ केलेले धान्य दळून त्यापासून पीठ मिळवले जाते. स्वयंपाक करताना पीठ मळणे, भाकरी थापणे आणि तव्यावर भाजून भाकरी तयार करणे इत्यादी कामे घरात धन्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी करावी लागतात.

 

( ऊ ) जोड्या लावा .


' ' गट

उत्तरे

' ' गट

( १ ) मीठ

समुद्र

( १ ) गोड्या पाण्याचे तळे

( २ ) ऊस

शेत

( २ ) समुद्र

( ३ ) मकाणे

गोड्या पाण्याचे तळे

( ३ ) मळा

( ४ ) बोरे

 वन

( ४ ) शेत

( ५ ) भाजीपाला

मळा

( ५ ) वन

 

 

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

हा स्वाध्याय खालील दिलेल्या व्हॉट्सॲप च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. 👇

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.