५.पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म सहावी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | Padarth sabhovatalache avstha aani gundharm 6th swadhyay

५.पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म स्वाध्याय प्रश्न उत्तरे

पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म प्रश्न उत्तर / पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म स्वाध्याय / सहावी सामान्य विज्ञान पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म स्वाध्याय उत्तरे

स्वाध्याय

 

प्र.१. खालील परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करा . त्यात ज्या पदार्थांचा उल्लेख आलेला आहे कंसात त्यांच्या पुढे स्थायू , द्रव , वायू यांपैकी योग्य पर्याय लिहा .

उत्तर:

            सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्कमध्ये रिया आणि गार्गी चेंडू (स्थायू) बरोबर खेळत आहेत . गार्गीला तहान लागली म्हणून रियाने तिच्यासाठी नारळपाणी (द्रव) आणले . तेवढ्यात वारा (वायू) वाहू लागला आणि पाऊस (द्रव) देखील पडू लागला . त्या पटकन घरात (स्थायू) आल्या . आपले कपडे (स्थायू) बदलले आणि आईने त्यांना एक - एक कप (स्थायू) गरम दूध (द्रव) प्यायला दिले .

 

पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म प्रश्न उत्तर पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म स्वाध्याय उत्तरे Padarth sabhovtalache avstha aani gundharm swadhyay prashn uttare Padarth sabhovtalache avastha anai gundharm   prashn uttr 6th vidnyan swadhyay prashn uttare.

५.पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म सहावी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे 


प्र.२.चर्चा करा .

अ . रिया तिच्याजवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतते . त्यामुळे पाण्याच्या आकारात काही बदल होईल का ?

उत्तर:

        द्रव पदार्थांना ठराविक आकारमान असते. भांड्यातील ठराविक जागा द्रव पदार्थ व्यापतात. पाणी हा एक द्रव पदार्थच आहे. द्रव पदार्थ ज्या आकाराच्या भांड्यात आपण ठेऊ त्या आकारात ते रुपांतरीत होतात. त्यामुळे एका बाटलीतील पणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतल्यावर पाणी हे दुसऱ्या बाटलीचा आकार ग्रहण करेल. त्यामुळे पाण्याच्या आकारात बदल होईल.

 

आ . हलीमा एक लहान वाळूचा खडा जमिनीवरून उचलून पाण्याने भरलेल्या डिशमध्ये टाकते , तर त्या खड्याचा आकार बदलेल का ?

उत्तर:

        स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार असतो. ते कसेही ठेवली तरी त्यांच्या आकारात बदल होत नाही . बाळूचा खडा हा देखील स्थायू पदार्थ आहे त्यामुळे हलीमाने वाळूचा खडा पाण्यात टाकला तर त्याच्या आकारात बदल होणार नाही.

       


प्र.३ . पुढील पदार्थांचे गुणधर्म नमूद करा .

( पाणी , काच , खडू , लोखंडी गोळा , साखर , मीठ , पीठ , कोळसा , माती , पेन, शाई , साबण )

उत्तर:

पाणी: प्रवाहिता, पारदर्शकता,द्रवरूप.

काच: स्थायुरूप, पारदर्शकता, ठिसूळपणा.

खडू: ठिसूळपणा, स्थायुरूप.

लोखंडी गोळा: स्थायुरूप, उष्णतावाहकता, तन्यता, कठीणपणा.

साखर: विद्राव्यता, स्थायुरूप.

मीठ: विद्राव्यता, स्थायुरूप.

पीठ: अविद्राव्य

कोळसा: ठिसूळपणा

माती:अविद्राव्य

पेन: कठीणपणा, स्थायू.

शाई: प्रवाहिता, द्रव पदार्थ.

साबण: स्थायू पदार्थ, विद्राव्यता.

 

Padarth sabhovtalache avstha aani gundharm swadhyay prashn uttare / Padarth sabhovtalache avastha anai gundharm   prashn uttr / 6th vidnyan swadhyay prashn uttare.

प्र.४. संप्लवन म्हणजे काय ते सांगून दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थांची नावे लिहा .

उत्तर:

        स्थायुरूप पदार्थांचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रुपांतर होणे या अवस्थांतराला संप्लवन म्हणतात. आयोडीन, डांबर गोळ्या, कापूर हे संप्लवनशील पदार्थ आहेत.

 

प्र.५.कशापासून बनवतात ते सकारण लिहा .

अ . ऊस तोडण्याचा कोयता

उत्तर: 

१)उस तोडण्यासाठी वापरण्यात येणारा कोयता हा लोखंड या धातूपासून बनवलेला असतो. 

२) कारण तन्यता, वर्धानियता आणि कठीणपणा हे लोखंड या धातूचे गुणधर्म आहेत. त्यामुळे त्याचा वापर कोयता बनवण्यासाठी केला जातो.

       

आ . घरावर लागणारे पत्रे

उत्तर: 

१)अल्युमिनीअम या धातूपासून बनवलेले पत्रे घरासाठी लागतात. 

२) कारण अल्युमिनीअम हा धातू,कठीणपणा, टिकाऊपणा आणि वजनाने हलके तसेच वर्धानीय असल्याने पसरत पत्रे बनवता येतात.

 

इ . स्क्रू ड्रायव्हर पक्कड

उत्तर: 

१) स्क्रू ड्रायव्हर चे पुढचे टोक ही स्टील, लोखंड या धातूपासून बनवलेले असते तर त्याचा मागचा दांडा हा प्लास्टिक किंवा लाकडापासून बनवलेला असतो. 

२) कारण स्क्रू ड्रायव्हर चे टोक हे कठीण धातूने बनवले गेले असल्याने त्याचा उपयोग स्क्रू लावण्यासाठी करता येतो.

 

उ . विजेच्या तारा

उत्तर: 

१) विजेच्या तारा या तांबे या धातूपासून बनवल्या जातात. 

२) कारण , तांबे या धातूला तन्यता, वर्धानियाता हे गुणधर्म असल्याने त्याच्यापासून बारीक तार काढणे शक्य होते. तसेच तांबे हा धातू विद्युत वाहकता हा गुणधर्म आहे.

 

ऊ . दागिने पातेले

उत्तर: 

१) दागिने आणि पातेले हे सोने , चांदी, तांबे यांसारख्या धातूंपासून बनवले जातात. 

२) कारण, या धातूंच्या तन्यता गुणधर्मामुळे त्यांना सहज आकार देणे शक्य होते.त्यामुळे विविध आकाराचे दागिने आणि भांडी बनवता येतात.

 


प्र.६.असे केले तर काय होईल आणि का ?

अ . खिळे प्लॅस्टिकचे बनवले

उत्तर: लाकडामध्ये किंवा भिंतीमध्ये ठोकण्यासाठी खिळ्याचा उपयोग करतात. लाकूड आणि भिंत ही कठीण असतात. त्यामुळे प्लास्टिक चा खिळा बनवला तर तो लाकडामध्ये किंवा भिंतीमध्ये घुसणार नाही कारण ,कठीणपणा हा गुणधर्म प्लास्टिक मध्ये नाही त्यमुळे तो तुटून जाईल.

 

आ . घंटा लाकडाची बनवली

उत्तर: लाकडाची घंटा बनविली तर तिच्यातून ध्वनी ऐकू येणार नाही. कारण लाकडाला नादमयता नसते त्यामुळे ती वाजणार नाही.

 

इ . पक्कडला रबर बसवले नाही

उत्तर: पकड ही धातूपासून बनवलेली असते. आणि उष्णतावाहक हा धातूचा गुणधर्म आहे. त्यामुळे जर पक्कडला रबर बसवले नाही तर एखादी गरम वस्तू उचलत असताना धातुमधून उष्णतेचे वाहन झाल्याने आपल्या हाताला चटका बसू शकतो.

 

ई . चाकू लाकडाचा तयार केला

उत्तर: लाकडापासुन चाकू तयार केला तर त्याचा वापर करून आपल्याला कोणतीही वस्तू कापता येणार नाही. लाकडामध्ये कठीणपणा, आणि तन्यता हा गुणधर्म नसल्याने त्याला धार देखील काढता येणार नाही.

 

उ . कु - हाड रबराची बनवली

उत्तर: कुऱ्हाड लाकूड तोडण्यासाठी वापरली जाते. रबरची कुऱ्हाड बनवली तर तिचा उपयोग करून लाकूड तोडता येणार नाही. कारण राबरामध्ये कठीणपणा आणि तन्यता गुणधर्म नसल्याने त्याला धार काढता येऊ शकत नाही. त्याच्याकडे असलेल्या स्थितीस्थापकता गुणधर्मामुळे त्याच्या आकारात बदल होऊन काही वेळाने तो पुन्हा त्याच्या स्थितीत येईल.

 

प्र.७.मी कोण ?

अ . तुमचा ताप मोजतो , तापमापीत असतो .

उत्तर: पारा.


आ . माझ्याशिवाय गरम नाही , थंड नाही .

उत्तर: उष्णता


इ . नाही मला आकार !

उत्तर: वायू , द्रव

 

ई.पाण्यात विरघळतो , रॉकेलमध्ये विरघळत नाही .

उत्तर: मीठ

 

प्र.८.असे का झाले ?

 

अ . हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले .

उत्तर: उष्णता मिळाली की स्थायुंचे द्रवात तर द्रवाचे रुपांतर वायूत होते. त्याचप्रमाणे पदार्थ थंड होत गेला म्हणजे त्यातील उष्णता कमी झाली की वायूचे द्रवात तर द्रवाचे स्थायुत रुपांतर होते. ज्या तापमानाला द्रवाचे स्थायुत रुपांतर होते त्याला त्या पदार्थाचा गोठण बिंदू म्हणतात. हिवाळ्यात तापमान कमी असते आणि खोबऱ्याच्या तेलाचा गोठणबिंदू कमी असल्यामुळे हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले

 

आ . प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले .

उत्तर: उष्णता मिळाली की स्थायुंचे द्रवात तर द्रवाचे रुपांतर वायूत होते. रॉकेल चे उघड्यावर ठेवल्याने त्याचे बाष्पीभवन होते आणि प्लेटमधील रॉकेल नाहीसे झालेले दिसते.

 

इ . एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला .

उत्तर: अगरबत्तीतून निघणारा धूर हा वायुरूप आहे. आणि वायू  हा सहज पसरतो.त्यामुळे एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास हा हवेबरोबर दुसऱ्या कोपऱ्यात आला.

 

ई. 



उत्तर: सफरचंदाची घनता पाण्यापेक्षा जास्त असल्याने ते पाण्याच्या तळाशी जाते तर फुग्याची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो.

 

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म प्रश्न उत्तर
पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म स्वाध्याय
सहावी सामान्य विज्ञान पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म स्वाध्याय उत्तरे
Padarth sabhovtalache avstha aani gundharm swadhyay prashn uttare
Padarth sabhovtalache avastha anai gundharm   prashn uttr
6
th vidnyan swadhyay prashn uttare.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.