६. पदार्थ आपल्या वापरातील स्वाध्याय प्रश्न उत्तरे
पदार्थ आपल्या वापरातील इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / पदार्थ आपल्या वापरातील प्रश्न उत्तर / पदार्थ आपल्या वापरातील स्वाध्याय / सहावी सामान्य विज्ञान पदार्थ आपल्या वापरातील स्वाध्याय उत्तरे / Padarth aaplya vaparatil swadhyay prashn uttare / Padarth aapalya vaparatil prashn uttr
स्वाध्याय
प्र.१ शब्द वापरून रिकाम्या जागा भरा .
अ . व्हल्कनायझेशनमध्ये तयार होणारे रबर ...................पदार्थ आहे .
उत्तर: टणक
आ . नैसर्गिक पदार्थांवर .................करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात .
उत्तर: प्रक्रिया
इ . न्यूयॉर्क व लंडन येथे ............... हा कृत्रिम धागा तयार झाला .
उत्तर: नायलॉन
ई . रेयॉनला ....... नावाने ओळखले जाते .
उत्तर: कृत्रिम रेशीम
६. पदार्थ आपल्या वापरातील इयत्ता सहावी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे
प्र.२.उत्तरे लिहा .
अ .
मानवनिर्मित पदार्थांची गरज का निर्माण झाली ?
उत्तर:
१) सतत
नवीन गोष्टींचा शोध घेणे, जीवन अधिक सुकर करणे हा मानवाचा स्वभाव आहे.
२) मानवाच्या
वाढत जाणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवनिर्मित पदार्थांची निर्मिती करण्याची
गरज निर्माण झाली.
आ .
निसर्गातून कोणकोणते वनस्पतीजन्य प्राणीजन्य पदार्थ मिळतात ?
उत्तर:
१)निसर्गातून
मिळणारे वनस्पतीजन्य पदार्थ: कापूस, साग, आम्बडी, फळे फुले, लाकुड, कापूस
२)निसर्गातून
मिळणारे प्राणीजन्य पदार्थ: चामडे, रेशीम, लाख, मोती, लोकर.
इ . व्हल्कनायझेशन म्हणजे काय ?
उतर: रबराला
कठीणपणा आणण्यासाठी राबराला गंधकाबारोबर तीन-चर तापवले जाते. त्यामुळे राबराला
कठीणपणा प्राप्त होतो. या पद्धतीला व्हल्कनायझेशन असे म्हणतात.
ई .
नैसर्गिकरीत्या कोणत्या पदार्थांपासून धागे मिळतात ?
उत्तर: नैसर्गिकरित्या
कापूस, लोकर, ताग, अंबाडी, लोकर, या पदार्थांपासून धागे मिळतात.
प्र.३.आमचे उपयोग काय आहेत ?
अ . माती
उत्तर:
मातीचे अनेक
उपयोग आहेत. बांधकाम करण्यासाठी मातीचा उपयोग केला जातो. विटा कौले हे देखील
मातीपासूनच तयार केली जातात. शेतीसाठी मातीचा उपयोग केला जातो. भांडी तयार करणे,
चूल, कुंड्या अशा प्रकारच्या वस्तू तयार करण्यासाठी
मातीचा उपयोग केला जातो.
आ . लाकूड
उत्तर:
इमारती घरे बांधण्यासाठी
लाकडाचा वापर केला जातो. घराचे खिडक्या दरवाजाने हे लाकडापासून बनवले जातात.
लाकडाचा वापर इंधन म्हणून देखील
केला जातो.
इ . नायलॉन
उत्तर:
नायलॉन चे धागे हे मजबूत
पारदर्शी आणि चमकदार असतात. त्यांचा वापर मासेमारीची जाली तयार करणे, दोरखंड बनवणे
त्याचबरोबर वस्त्रनिर्मितीमध्ये देखील या नायलॉन चा वापर केला जातो.
ई . कागद
उत्तर:
कागदाचा वापर हा वह्या, पुस्तके,
पुठ्ठे, कागदी पिशव्य इत्यादी साहित्य बनवण्यासाठी होतो.
टिश्यू पेपर, कलाकुसरीच्या
वस्तू बनवणे, वर्तमानपत्र तयार करणे अशा विविध कारणांसाठी कागदाचा उपयोग केला
जातो.
उ . रबर
उत्तर:
राबरापासून खोडरबर, रबराचे
चेंडू, रबराची खेळणी बनवली जातात.
त्याचप्रमाणे वाहनाचे टायर
बनवण्यासाठी सुद्धा रबराचा वापर केला जातो.
प्र.४. कागदनिर्मिती कशी केली जाते ते तुमच्या शब्दांत लिहा .
उत्तर:
१) कागद
तयार करण्यासाठी सुचीपर्णी वृक्षांचा वापर केला जातो.
२) वृक्षांच्या
लाकडांच्या ओंडक्यांची साल काढून त्याचे बारीक तुकडे केले जातात.
३) हे
तुकडे रासायानामध्ये खूप वेळ भिजत ठेवले जातात.
४) त्यांमध्ये
रंगद्रव्ये टाकती जातात आणि त्याचा लगदा तयार केला जातो. हा लगदा रोलर्स च्या
सहाय्याने पातळ लाटला जातो.
५) लाटलेला
लगदा हा पुढे कोरडा कडून गुंडाळला जातो.
६) कारणे
लिहा .
अ . उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत .
उत्तर:
उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत
कारण,
१)उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये
शरीराला येणारा घाम हा सुती कपड्यांत सहज शोषला जावून आपले शरीर कोरडे राहते.
२) सुती कपडे हे नैसर्गिक
धाग्यापासून बनवले गेलेले असतात.
३) कृत्रिम धाग्यांपासून बनवलेले
कपडे वापरले तर उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतो.
आ . पदार्थांचा वापर करण्यामागे काटकसर करावी .
उत्तर:
१) स्वतःचे जीवन सुकर करण्याठी मानवाला नैसर्गिक आणि मानव निर्मित असे दोन प्रकारचे पदार्थ वापरावे लागतात.
२) निसर्ग निर्मित पदार्थ हे जैविक किंवा अजैविक असतात ते वनस्पतींकडून तसेच प्राण्यापासून आपल्याला उपलब्ध होतात.
३) पदार्थ उपयोगात आणण्यासाठी त्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात त्यांतून पर्यावरणाला हनिकाराक ठरणारे पदार्थ निर्माण होतात.
४) मोठ्या प्रमाणवर पदार्थांचा वापर केला तर त्यांच्यावर ताण येऊन त्यांचे साठे संपून जातील म्हणून पदार्थांचा वापर करण्यामागे काटकसर करावी.
इ . कागद वाचवणे काळाची गरज आहे .
उत्तर:
कागद वाचवेन काळाची गरज आहे कारण,
१) कागद बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालामध्ये वृक्षांची मोठ्या प्रमाणवर तोड केली जाते.
२) जेवढी कागदाची निर्मिती केली जाते तेवढ्या मोठ्या प्रमाणवर वृक्षतोड केली जाते.
३) जर मोठ्या प्रमाणवर अशीच वृक्षतोड होत राहिली तर निसर्गाचा समतोल ढासळेल म्हणून कागद वाचवणे काळाची गरज आहे.
ई . मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे .
उत्तर:
१)नैसर्गिक पदार्थांवर
प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार केले जातात यांना मानवनिर्मित पदार्थ म्हणतात.
२) हे पदार्थ वापरला अधिक सोयीचे आणि कमी खर्चात मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला.
म्हणून मानव निर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे.
उ . कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे .
उत्तर:
१) कृथित मृदा ही मृदेमध्ये विघटन करणारे सूक्ष्म जीव करत असतात.
२) ते कुजणाऱ्या पदार्थांचे विघटन करून त्याचे रुपांतर मातीत करतात.
३) कृथित मृदा ही निसर्गात होणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियांमुळे तयार होते. म्हणून कृथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे.
प्र.६. कसे मिळवतात याची माहिती मिळवा .
१. लाख हा पदार्थ निसर्गातून कसा मिळवतात ?
उत्तर:
१)लाखेच्या किड्यांपासून लाख हा
पार्थ मिळतो.
२)पिंपळ , वड, बोर, खैर इत्यादी
वर्गातील वृक्षांवर ही कीड आढळते तिचा आकार अतिशय सूक्ष्म असतो.
३)वृक्षांचा रस शोषून घेत असताना आपले संरक्षण करण्यासाठी ती तिच्या तोंडातून एक प्रकारची लाळ सोडते ही लाळ म्हणजेच लाख होय.
२. मोती हे रत्न कसे मिळवतात ?
उत्तर:
१) मोती हे रत्न शिंपल्यातून मिळवले जाते.
२) काही ठराविक प्रजातींच्या शिंपल्यांमध्ये कोणताही परकीय कण नैसर्गिकरित्या शिंपल्यात शिरला की शिंपले त्याच्या भोवती विशिष्ट प्रकारचा थर टाकतात. त्यापासूनच मोती तयार होतो.
३) आत्ता प्रयोगशाळांमध्ये कृत्रिमरीत्या देखील मोती तयार केला जातो यामध्ये कृत्रिमरीत्या कोणताही परकीय कण पर्ल ऑयस्टर या शिंपल्याच्या शरीरात सोडला जातो आणि त्यापासून कृत्रिम मोती मिळवला जातो.
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏
हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.