११.पाहू तरी शरीराच्या आत स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी परिसर अभ्यास भाग १ | Pahu tari sharirachya aat 4th std swadhyay prashn uttare

११.पाहू तरी शरीराच्या आत स्वाध्याय प्रश्न उत्तरे

पाहू तरी शरीराच्या आत  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / परिसर अभ्यास  भाग १ पाहू तरी शरीराच्या आत  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / पाहू तरी शरीराच्या आत  इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी / इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय


( अ ) जरा डोके चालवा .


( १ ) जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप का लागते ?

उत्तर: जोराने पळत गेल्यानंतर आपल्या शरीराची हालचाल झाल्याने शरीराला आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन ची गरज वाढते. ऑक्सिजन हे रक्ताच्या माध्यमातून साऱ्या शरीरापर्यंत पोहचवले जाते.  या वेळी हृदययाचे आकुंचन व प्रसरण जोराने होते. त्यामुळे हृदयाला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी फुफ्फुसे देखील  ऑक्सिजन मिळवण्यासाठी जोराने कार्य करू लागतात. त्यामुळे जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप लागते.

 

पाहू तरी शरीराच्या आत  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी परिसर अभ्यास  भाग १ पाहू तरी शरीराच्या आत  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी पाहू तरी शरीराच्या आत  इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Pahu tari sharirachya aat eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag 1 Pahu tari sharirachya aat swadhyay iyatta chothi  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

पाहू तरी शरीराच्या आत स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी 



( आ ) खालील प्रश्नांची उत्तरे दया .

 

( १ ) आंतरेंद्रिय म्हणजे काय ?

उत्तर: जे इंद्रिय शरीराच्या आत असतात. त्यांना आंतरेंद्रिय असे म्हणतात.

 

( २ ) पोटाच्या भागातील पोकळीच्या दोन भागांची नावे सांगा .

उत्तर: उदरपोकळी आणि कातीपोकळी ही पोटाच्या भागातील पोकळीच्या दोन भागांची नावे आहेत.

 

( ३ ) वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात कोणती महत्त्वाची इंद्रिये असतात?

उत्तर: हृदय आणि फुफ्फुसे ही महत्वाची इंद्रिये वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात .

 

( ४ ) श्वास घेतल्याने छाती का फुगते ?

उत्तर: आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपली फुफ्फुसे थोडीशी प्रसरण पावतात त्यामुळे श्वास घेल्यावर आपली छाती फुगते.

 

 ( ५ ) निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच का घातले आहे ?

उत्तर: मेंदू हे शिरोपोकळीत असणारे अत्यंत महत्वाचे आंतरेन्द्रीय आहे. मेंदूला इजा झाली, तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो दगावण्याचा संभव असतो.  म्हणून मेंदूला परिपूर्ण संरक्षण मिळावे यासाठी निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे.

 

( इ ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .


१. अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरेंद्रिये ........................असतात .

उत्तर: अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरेंद्रिये उदरपोकळीत असतात .


२ .    आपल्याला ....... फुप्फुसे असतात .

उत्तर: आपल्याला दोन फुप्फुसे असतात .


३ .   हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला ........................ ठोका म्हणतात .

उत्तर:  हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात.


४.    सर्व भावनांची ..................आपल्याला मेंदूमध्ये होते .

उत्तर: सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते .


५.  मानवी शरीराची रचना खूप ....................आहे .

उत्तर: मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची आहे .


( ई ) चूक की बरोबर ते लिहा .


१.    ग्रासनलिका वक्षपोकळीत असते .

उत्तर: बरोबर


२.   हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते .

उत्तर: बरोबर


३.   तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो .

उत्तर: बरोबर


४.  ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्येच समजतो .

उत्तर: बरोबर


( उ ) कारणे लिहा .


१.    आंतरेंद्रिये जागच्या जागीच रहावी , अशीच शरीराची रचना असते .

उत्तर: शरीराच्या आत असणारी इंद्रिये ही महत्वाची कामे करत असतात त्यामुळे ती सुरक्षित राहणे गरजेचे असते. आपण कितीही हालचाल केली तरीही आंतरेन्द्रीय जागच्या जागी राहणे गरजेचे असतात. त्यांचे कोणतीही इजा होण्यापासून रक्षण करणे गरजेचे असते. यामुळेच आंतरेन्द्रीय जगाच्या जागी रहावीत अशीच शरीराची रचना असते.


२.   शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवावे लागते .

उत्तर: आपल्या शरीरात रक्त असते, आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळला जातो आणि तो सर्व शरीराला रक्ताच्या मार्फत पोहोचवला जातो.  आपल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर ते अन्न शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहचवण्याचे काम देखील रक्त करते. म्हणूनच शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवावे लागते.


३.   मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते .

उत्तर: मेंदू हे शिरोपोकळीत असणारे अत्यंत महत्वाचे आंतरेन्द्रीय आहे. आपल्या शरीराच्या सर्व हालचालींवर मेंदूचे नियंत्रण असते. तसेच आपल्या ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्येच समजतो. जर मेंदूला इजा झाली, तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो दगावण्याचा संभव असतो.  म्हणून मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते.


 ( ऊ ) जोड्या जुळवा .


‘अ’ गट

उत्तरे

‘ब’गट

रक्तपुरवठा

हृदय

अन्ननलिका

श्वसन

फुफ्फुसे

हृदय

घास जठरापर्यंत पोहचवणे

अन्ननलिका

मेंदू

हालचालींवर नियंत्रण

मेंदू

फुफ्फुसे

 

  ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

हा स्वाध्याय खालील दिलेल्या व्हॉट्सॲप च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. 👇

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

परिसर अभ्यास  भाग १ पाहू तरी शरीराच्या आत  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Pahu tari sharirachya aat eyatta chouthi swadhyay prashn uttare
Parisar abhyas bhag 1 Pahu tari sharirachya aat swadhyay iyatta chothi 
Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.