९. प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्रतापगडावरील पराक्रम प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी प्रतापगडावरील पराक्रम प्रश्न उत्तर इयत्ता चौथी प्रतापगडावरील पराक्रम प्रश्न उत्तरे Pratapgadavaril parakram iyatta chouthi swadhyay prashn uttare Pratapgadavaril parakram swadhyay prashan uttare
स्वाध्याय
प्र.१. दिलेल्या अक्षरांवरून
योग्य शब्द तयार करा.
(अ)
ता ग प्र ड प ..............
उत्तर: प्रतापगड
(आ)
व रा य शि ..............
उत्तर: शिवराय
( इ ) खा अ ज
न ल फ ...............
उत्तर: अफजलखान
प्र.२.
प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .
(अ)
अफजलखानाने कोणता विडा उचलला ?
उत्तर:
शिवरायांना जिवंत कैद करून किंवा
ठार मारून आणण्याचा विडा अफजलखानाने उचलला .
(आ)
प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने
शिवरायांना कोणता निरोप पाठवला ?
उत्तर: ‘तुम्ही माझ्या मुलासारखे. मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हांला मी आदिलशहाकडून सरदारकी देववितो.’ असा निरोप अफजलखानाने प्रेमळपणाचे सोंग घेऊन शिवरायांना पाठवला.
३. दोन - तीन
वाक्यांत उत्तरे लिहा .
(अ)
शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीनेच सामना
देण्याचे का ठरवले ?
उत्तर: खान
कपटी, त्याची फौज मिओठी. आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान. उघड्या मैदानावर काही
खानापुढे आपला निभाव लागणार नाही. म्हणून शिवरायांनी अफजलखानशी युक्तीनेच सामना
देण्याचे ठरवले.
(आ) अफजलखानाच्या भेटीला जाताना
शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले ?
उत्तर: “ गड्यांनो, आपापली कामे नित करा. भवानी आई यश देणार , पण समजा आमचे काही
बरेवाईट झाले, तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गादीवर बसवा. मासाहेबांच्या
आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. आम्ही निघालो!” असे
अफजलखानच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना म्हणाले.
प्र ४. कारणे लिहा .
(अ) शिवराय प्रतापगडावर गेले , ही बातमी खानाला कळताच तो चिडला .
उत्तर: प्रतापगड किल्ल्यावर चाल
करून जाणे अफजलखानास सोपे नव्हते. प्रतापगड किल्ला डोंगरात असल्याने त्याच्या
सभोवती घनदाट जंगल होते. वाटेत उंच उंच डोंगर होते. फौजेला जायला वाट नव्हती. तोफा
चढवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा भयंकर सुळसुळाट होता. त्यामुळे
शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला.
(आ) विजापुरात हाहाकार उडाला .
उत्तर: अफजलखानाचा मुलगा फाजलखान
प्रतापगडावरून कसा बसा निसटला व विजापूर ला पोहोचला. त्याने सांगितलेली वातामी
ऐकून विजापुरात हाहाकार उडाला.
हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.