२.संतांची कामगिरी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ संतांची कामगिरी स्वाध्याय / संतांची कामगिरी स्वाध्याय / संतांची कामगिरी प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / संतांची कामगिरी प्रश्न उत्तर / इयत्ता चौथी संतांची कामगिरी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वाध्याय
प्र.१.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .
(अ) संत नामदेव .............. निस्सीम भक्त होते .
उत्तर: संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते .
(आ) ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ ..................येथे जिवंत समाधी घेतली.
उत्तर: ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली.
(इ) संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते ...............नदीमध्ये बुडवली.
उत्तर: संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली.
(ई) समर्थ
रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी ........... मंदिरे उभारली .
उत्तर: समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली .
.संतांची कामगिरी इयत्ता ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) श्रीचक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते?
उत्तर: श्री चक्रधर स्वामींना स्त्री-पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते.
(आ) संत नामदेवांनी लोकांच्या मनांत कोणता निर्धार निर्माण केला?
उत्तर: संत नामदेवांनी लोकांच्या मनांत धर्म रक्षणाचा व भक्तीमार्गाचा निर्धार निर्माण केला.
(इ) संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला?
उत्तर: कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा उपदेश संत एकनाथांनी लोकांना केला.
(ई) समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला?
उत्तर: सामर्थ्य आहे चळवळीचे,
जो जो करील तयाचे हा संदेश समर्थ रामदासांनी दिला.
प्र.३.दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले ?
उत्तर:
ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले असता त्यांन कोणी भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांन्या वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. या साऱ्याचे त्यांच्या बालमनाला खूप दुखः झाले . म्हणून संत ज्ञानेश्वर झोपडीत दर बंद करून बसले.
(आ) संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला?
उत्तर:
संत तुकाराम लोकांना दया, क्षमा,
शांती यांची शिकवण देत, समतेचा उपदेश करीत.
‘जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणजे जो आपुले तोचि साधू ओळखावा | देव
तेथेची जाणावा |’ हा संदेश संत तुकारामांनी लोकांच्या मनावर बिंबवला.
हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.