३. साठवण पाण्याची स्वाध्याय प्रश्न उत्तरे
साठवण पाण्याची स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / परिसर अभ्यास भाग १ साठवण पाण्याची स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी
साठवण पाण्याची इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी / इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वाध्याय
(अ) थोडक्यात उत्तरेद्या.
(१) पाणी कशासाठी साठवायचे?
उत्तर: आपल्याला पावसापासून
पाणी मिळते यातील काही पाणी जे जमिनीमध्ये मुरते. पावसाळा हा तीन ते चार महिने
असतो. परंतु सर्व सजीवांना वर्षभर पाणी लागते. पाणी साठवून नाही ठेवले तर आपल्याला
पुरेसे पाणी मिळणार नाही. म्हणून पाणी साठवायला लागते.
(२)
पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत
असत ?
उत्तर: पारंपारिक पद्धतीमध्ये
घरामध्ये कमी घेराचे आड खणलेले असत. या आडांना वर्षभर पाणी असे. आडामध्ये पोहरा
टाकून हे पाणी पिण्यासाठी बाहेर काढले जात असे. अशा प्रकारे पारंपारिक पद्धतींत
घरात पाणी साठवत असत.
(3) धरण कशावर बांधतात ?
उत्तर: धरण नदीवर बांधतात.
(4)
पाण्याचा वापर करताना कोणती काळजी
घ्यावी ?
उत्तर:
दात घासत असताना, अंघोळ
करताना, पाण्याची विनाकारण नासाडी करणे टाळावे.
माठात, पिंपामध्ये, बादलीमध्ये
पाणी भरत असताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे.
सार्वजनिक ठिकाणी किंवा घरातील
नळ चालू असल्यास तो लगेच बंद करावा.
गळत असेलेला नळ त्वरित बदलावा. इत्यादी
काळजी प्रत्येकाने पाण्याचा वापर करताना घ्यावी.
(5)
पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय ?
उत्तर: पाण्याचा दर्जा कमी होणे म्हणजे पाण्याचे प्रदूषण होय. जेव्हा सांडपाणी, टाकावू व दुषित पदार्थ , कारखान्यातील सांडपाणी जेव्हा चांगल्या पाण्याच्या स्त्रोतात सोडले गेल्यास पाण्याचे प्रदूषण होते.
(आ) पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल, याचा विचार करा. त्यासाठी काय करता येईल ते सूचवा.
उत्तर:
पाणीटंचाई असलेल्या
भागात असलेल्या भागामध्ये पुढील प्रकारे पाणी साठवता येईल.
उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे. पाण्याची नासाडी टाळणे. टंचाई असलेल्या भागामध्ये पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी भूमिगत टाक्या खोदणे व त्यात पाणी साठवणे.
Sathavan panyachi eyatta chouthi swadhyay prashn uttare / Parisar abhyas bhag 1 sathavn panyachi swadhyay iyatta chothi / Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi
(इ) पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात ?
उत्तर:
पाण्याचा काटकसरीने वापर
करण्यासाठी पुढील सवयी स्वतःला लावून घेता येतील. दात घासत असताना, अंघोळ करताना, पाण्याची विनाकारण नासाडी करणे
टाळावे.
माठात, पिंपामध्ये, बादलीमध्ये पाणी भरत असताना ते खाली
सांडणार नाही याची काळजी घेणे.
सार्वजनिक ठिकाणी किंवा घरातील
नळ चालू असल्यास तो लगेच बंद करावा.
गळत असेलेला नळ त्वरित बदलावा.
- स्वाध्याय आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
- हा स्वाध्याय खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.