४.शिवरायांचे बालपण स्वाध्याय प्रश्न उत्तरे
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ शिवरायांचे बालपण स्वाध्याय / शिवरायांचे बालपण स्वाध्याय / शिवरायांचे बालपण प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / शिवरायांचे बालपण प्रश्न उत्तर / इयत्ता चौथी शिवरायांचे बालपण स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वाध्याय
प्र.१.रिकाम्या कंसातील योग्य पर्याय लिहा .
(अ) शिवरायांचा जन्म ............... किल्ल्यावर झाला .
( पुरंदर , शिवनेरी , पन्हाळा )
उत्तर: शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला .
(आ) आदिलशाहाने शहाजीराजांची .................... प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली.
( कर्नाटकातील , खानदेशातील , कोकणातील )
उत्तर: आदिलशाहाने शहाजीराजांची कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली.
शिवरायांचे बालपण इयत्ता ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे |
प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात
(अ) जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले?
उत्तर: जिजामातेच्या उपदेशाने, आपणही मोठे झाल्यावर शूर पुरुषांच्या सारखे पराक्रमी व्हावे असे विचार शिवरायांच्या मनात घोळू लगले.
(आ) शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत ?
उत्तर: मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे आणि लपंडाव, चेंडू , भोवरा इत्यादी. खेळ शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर खेळत असत.
(इ) शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग का केला ?
उत्तर: निजामशहाच्या चिथावणीने शहाजीराजांचे सासरे लखुजीराव जाधव यांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला.
प्र.३ . दोन - तीन वाक्यांत
उत्तरे लिहा .
(अ) जिजाबाई शिवरायांना
कोणाकोणाच्या गोष्टी सांगत ?
उत्तर:
जिजाबाई शिरावारायांना रामाच्या , कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत असत. तसेच कधी कधी संत एकनाथांचे, नामदेवांचे, संत ज्ञानेश्वरांचे अभंग म्हणून दाखवत असत.
(आ) शहाजीराजांनी निजामशाहाच्या वंशातील मुलाला निजामशाहा म्हणून जाहीर का केले ?
उत्तर:
वजीर फत्तेखान याने मुघलांशी
हातमिळवणी करून निजामशाहाची हत्या केली आणि शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलुख
मुखालांनी परस्पर त्याला देऊन टाकला. वजीर फत्तेखान व मुघल बादशहा यांना शह
देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूळ शोधून काढून त्याला निजामशहा
म्हणून घोषित केले.
हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.