५.शिवरायांचे शिक्षण स्वाध्याय प्रश्न उत्तरे
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ शिवरायांचे शिक्षण स्वाध्याय / शिवरायांचे शिक्षण स्वाध्याय / शिवरायांचे शिक्षण प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / शिवरायांचे शिक्षण प्रश्न उत्तर / इयत्ता चौथी शिवरायांचे शिक्षण स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र.१.रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
(अ) शहाजीराजे ................... गाढे पंडित होते .
( संस्कृतचे , कन्नडचे तमीळचे )
उत्तर: शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते .
(आ) मावळात राहणाऱ्या लोकांना .......................म्हणतात .
( शेतकरी , सैनिक , मावळे )
उत्तर: मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात .
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ शिवरायांचे शिक्षण स्वाध्याय |
प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .
(अ) शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली ?
उत्तर: शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक शहाजीराजांनी बंगळूर येथे केली.
(आ) शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विदया शिकवण्यास प्रारंभ केला.
उत्तर: शिवरायांना शिक्षकांनी घोड्यावर बसने, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विदया शिकवण्यास प्रारंभ केला
( इ ) दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट का दिली ?
उत्तर: शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी , म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट दिली.
प्र.३. दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा .
(अ) पुण्याचे रूप कसे पालटले ?
उत्तर:
जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे तेथील आसपासच्या लोकांना समजल्यावर त्यांना धीर आला. जिजाबाईंनी तेथील लोकांना दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले, शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पुण्यातील पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळांत सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. अशा रीतीने पुण्याचे रूप पालटले.
(आ) शिवरायांना कोणत्या विदया अवगत झाल्या?
उत्तर:
शिवरायांना पुढील विद्या अवगत
झाल्या.
उत्तर राज्यकारभार कश्या
प्रकारे कराव, शत्रूची युद्ध कसे करावे, किल्ल्यांचे बांधकाम कसे करावे, घोड आणि
हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम परिसरातून निसटून कसे बाहेर
पडावे, इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या.
(इ ) जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता ?
उत्तर:
शिवाजी महाराज परक्यांची
चाकरी करणार नाहीत . ते स्वतःच्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्याची स्थापना करतील
. या विचाराने त्यांना घडवण्याचा निर्णय जिजाबाईंनी केला.
हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.