६.स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय / स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय / स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा प्रश्न उत्तर
स्वाध्याय
प्र.१. रिकाम्या जागी योग्य
शब्द लिहा .
(अ) पुण्याच्या नैर्ऋत्येला
असलेले ......................... देवालय मोठे रमणीय स्थान होते .
उत्तर: पुण्याच्या नैर्ऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते .
(आ) मावळांत ठिकठिकाणी काही ................मंडळी
आपली वतने सांभाळत बसली होती .
उत्तर: मावळांत ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी
आपली वतने सांभाळत बसली होती .
( इ ) शहाजीराजांनी शिवरायांची
स्वतंत्र ....................... तयार केली होती .
उत्तर: शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती .
६.स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात
उत्तरे लिहा .
(अ) रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले ?
उत्तर: “हिंदवी स्वराज्याच्या
रूपाने हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे हे मनोरात आपण पूर्ण
करूया. “ अशे शिवराय रायरेश्वराच्या देवायालात
शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले.
(आ) जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला ?
उत्तर: आपण मनी जे धरले ते शिवाजी महाराज पूर्ण करणार असा विश्वास जिजाबाईंना वाटू लागला.
(इ) शिवरायांनी कोणत्या गोष्टींची खडान खडा माहिती मिळवली ?
उत्तर: शिवरायांनी चोरवाटा,
तळघरे, भुयारे, हत्यारे, दारुगोळा आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा
माहिती मिळवली.
(ई) शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले ?
उत्तर: मावळांतील आपापसात
होणाऱ्या भांडणांना आळा घालण्याचे शिवरायांनी ठरवले.
प्र.३. दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा .
(अ) शिवरायांचे ध्येय कोणते होते ?
उत्तर: सर्वांचे हिंदवी
स्वराज्य हेच ध्येय असेल. सर्वांच्या हक्काचे स्वराज्य स्थापन करायचे . परक्यांची
गुलामी आत्ता कोणी करणार नाही. हे शिवरायांचे ध्येय होते.
(आ) शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला ?
उत्तर: मावळ्यांना घेऊन
तलवारीचे हात करणे, घोडदौड करावी, डोंगरांतील आडमार्ग शोधणे, खिंडी, घाट आणी
चोरवाटा निर्खाव्या असा शिवरायांचा नित्यक्रम सुरु झाला.
हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.