२. बोलणारी नदी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
बोलणारी नदी इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे. / इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय बोलणारी नदी / इयत्ता चौथी बोलणारी नदी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र. १ . एका वाक्यात उत्तरे लिहा .
(अ लीलाला कसली हौस होती ?
उत्तर: लीलाला खोड्या काढण्याची हौस होती.
(आ) लीलाला काय खायचे होते ?
उत्तर: लीलाला बर्फाचा गोळा
खायचा होता.
(इ) नदीबाई
कोणाकोणापेक्षा मोठी होती ?
उत्तर: नदीबाई माईपेक्षा मोठी
होती.
(ई) आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता ?
उत्तर: आईने पेढ्यांचा डबा शिकाळ्यावरच्या
बुट्टीत ठेवला होता.
(उ) पेढा घेऊन लीला कोठे गेली ?
उत्तर: पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली.
प्र.२. खालील प्रश्नांची उत्तरे
तुमच्या मनाने लिहा .
(अ) तुम्हाला काय खावेसे वाटते ?
उत्तर: मला चकली खावीशी वाटते.
(आ) घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत , असे सांगतात?
उत्तर: घरातील मोठी माणसे
उघड्यावरचे पदार्थ, तसेच अति थंड पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात.
(इ) तुम्हांला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते ?
उत्तर: मला कंटाळा आल्यावर मला खेळायला बाहेर जावेसे वाटते.
चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा बोलणारी नदी / बोलणारी नदी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी.
प्र .३ . दोन अक्षरी शब्द - गळा
,
तीन अक्षरी शब्द - घोटाळा , चार अक्षरी शब्द -
घळाघळा यांसारखे शेवटी ' ळा ' हे अक्षर
येणारे प्रत्येकी चार शब्द लिहा .
उत्तर:
दोन अक्षरी शब्द: पळा, माळा, मळा,
फळा.
तीन अक्षरी शब्द: कंटाळा, आवळा,
सावळा, कावळा.
चार अक्षरी शब्द : खूळखुळा, घळाघळा.
प्र . ४. कोण , कोणाला म्हणाले ?
(अ) " नको बुडवू शाळा . "
उत्तर: असे ताई, आई, आणि माई
लीलाला म्हणाले.
(आ) " काय खाऊ आणलास ? "
उत्तर: असे लीला भोलामामाला
म्हणाली.
(इ) " तू बदामी पेढे नदीत टाकलेस ! "
उत्तर: असे आई नीलाला म्हणाली.
(ई) " काय गं लीला , नदी तुझ्याशी बोलते ? "
उत्तर: असे माई लीलाला म्हणाली.
4th standard Marathi bolnari nadi questions answers / 4th standard Marathi bolnari nadi answers Bolnari nadi 4th class question answers
प्र .५ . खालील शब्दांचे
अनेकवचन - करा ,
(अ) डबा
उत्तर: डबे
(आ) बैल
उत्तर: बैल
(इ) नदी
उत्तर: नद्या
( ई ) डोळा
उत्तर:डोळे
( उ ) दिवस
उत्तर:दिवस
( ऊ ) पेढा
उत्तर:पेढे
4th standard Marathi bolnari nadi questions answers / 4th standard Marathi bolnari nadi answers
Bolnari nadi 4th standard Marathi questions answers / Iyatta chouthi prashn uttare
प्र. ६. लीलाप्रमाणे तुम्हांला
नदीशी बोलायचे असेल , तर तुम्ही नदीशी काय बोलाल ?
उत्तर: नदीबाई आम्ही तुझे ऋणी
आहोत. तू आम्हांला निस्वार्थी पणे तुझे अनमोल पाणी आम्हांला देतेस. तुझ्या पाण्यामुळेच
आम्ही आमचे जीवन सुखाने जगत आहोत. या पृथ्वीवरील सजीवसृष्टी ही तुझ्यामुळेच अस्तित्वात
आहे. हे नदीबाई आमच्या जीवनात तुझे आईचे स्थान आहे. तुझे खूप खूप आभार.
प्र . ७. या पाठात ' वावर हा शब्द आलेला आहे . वावर या शब्दाचे दोन अर्थ सांगणारी खालील वाक्ये
वाचा .
• रामजीच्या वावरात कापसाचे पीक
आहे . (वावर - शेत )
• सरपंचांच्या घरात लोकांचा नेहमी
वाचर असतो . ( वावर - वर्दळ ये - जा . )
या प्रमाणे दोन अर्थ असलेले पाच
शब्द शोधा . प्रत्येक शब्दाचे दोन अर्थ दाखवणारी वाक्ये लिहा .
उत्तर:
राजूची मान अचानक दुखू लागली. (मान
– शरीराचा भाग)
वर्गाच्या वर्गप्रमुखाला सर्वात
पुढे बसण्याचा मान मिळतो. ( मान – सन्मान, मोठेपणा)
माणसाला दोन कर असतात. ( कर –हात)
राजू लवकर शाळेची तयारी कर ( कर
_ कृती करणे )
तुझे नाव काय आहे? ( नाव –
व्यक्तीची ओळख )
नाव समुद्रात फिरत होती . ( नाव
– होडी )
घराच्या भिंतीवर राजूला कोळी
दिसला ( कोळी – एक कीटक)
कोळी लोक समुद्राची पूजा करतात (
कोळी – मासे पकडणारे लोक)
राजूला पावसात भिजल्याने ताप
आला होता ( ताप _ अंग गरम होणे )
✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂
हे सुद्धा पहा:
इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके |
|
इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे |