१२. छोटे आजार, घरगुती उपचार स्वाध्याय प्रश्न उत्तरे
छोटे आजार, घरगुती उपचार स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / परिसर अभ्यास भाग १ छोटे आजार, घरगुती उपचार स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / छोटे आजार, घरगुती उपचार इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वाध्याय
( अ ) काय करावे बरे ?
मुंबईच्या एका शाळेत हेलन चौथीत शिकते . एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा धक्का लागून ती पडली . तिची शुद्ध हरपली . पायाला जबरदस्त दुखापत झाली .
उत्तर: हेलन ला लगेच वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. तिला त्वरित दवखान्यात घेऊन जावे. दवखान्यात नेत असताना तिच्या ज्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आहे त्या पायाची काळजी घ्यावी. तिच्या पालकांना फोन करून कळवावे व दवखान्यात बोलवून घ्यावे. डॉक्टरांनी सांगितलेली सर्व औषधे वेळेवर घेण्यास सांगणे.
छोटे आजार, घरगुती उपचार स्वाध्याय प्रश्न उत्तरे |
( आ ) जरा डोके चालवा .
१. अडुळशाच्या
पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो ?
उत्तर: सर्दी खोकला बरा करण्यासाठी अडुळशाच्या पानांचा अर्क उपयोगी पडतो
२. सर्दीची लक्षणे कोणती ?
उत्तर:१) नाकातून पाणी येणे २) डोके दुखणे ३) नाक व डोळे लाल होणे ४) श्वास घ्यायला त्रास होणे. ५) अंग मोडून येणे .
३ . बाम कशासाठी वापरला जातो ?
४.ताप उतरल्याची खूण कोणती ?
( १ ) सर्दी (
२ ) चिकुनगुनिया ( ३ ) हिवताप ( ४ ) खेळताना पडून खरचटणे ( ५ ) पोटाला तड लागणे (
६ ) विषमज्वर ( ७ ) गरम तव्याचा बोटांना चटका बसणे ( ८ ) पाय मुरगळणे .
यांपैकी कोणते आजार लवकर बरे होणार आहेत , कोणते लवकर बरे न होणारे आहेत , ठरवा आणि खालील
कोष्टक पूर्ण करा . लवकर बरे होणारे आजार लवकर बरे न होणारे आजार
उत्तर:
लवकर बरे होणारे आजार |
लवकर बरे न होणारे आजार |
( १ ) सर्दी |
( २ ) चिकुनगुनिया |
( ४ ) खेळताना पडून खरचटणे |
( ३ ) हिवताप |
( ५ ) पोटाला तड लागणे |
( ६ ) विषमज्वर |
( ७ ) गरम तव्याचा बोटांना चटका बसणे |
|
( ८ ) पाय मुरगळणे . |
|
थोडक्यात
उत्तरे लिहा .
( १ ) सखूचा
घसा का दुखू लागला ?
उत्तर: सखूने
थंडगार आईस्क्रीम खाल्ल्याने सखूचा घसा दुखू लागला.
( २ ) कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली?
उत्तर: कावीळ
झाल्यामुळे ताईला तीन आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली.
( ३ ) सर्दीवर घरगुती उपचार कोणता ?
उत्तर: सर्दी झाल्यास
झोपताना गरम पाण्याचा वाफारा घेतात. छाती
शेकतात.
( ४ ) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घ्यावीत का ?
उत्तर: डॉक्टरांच्या
सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घेऊ नयेत.
( उ ) गाळलेले
शब्द भरा.
( १ ) सखूच्या
ताईचे डोळे ...................दिसत होते .
उत्तर: सखूच्या
ताईचे डोळे पिवळसर दिसत होते .
( २ ) ....................चावल्यामुळे
श्रीपती चांगलाच घाबरला .
उत्तर: साप
चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला .
( ३ ) धुतलेली
जखम ...... ....... करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे .
उत्तर: धुतलेली
जखम कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे .