९. ईदगाह स्वाध्याय प्रश्न उत्तरे
इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय / इयत्ता चौथी ईदगाह स्वाध्याय प्रश्न उत्तरे / चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा ईदगाह / ईदगाह स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी.
स्वाध्याय
( अ ) गावात कशाची गडबड चालली होती ?
उत्तर: गावात ईदगाह ची गडबड
चालली होती.
( आ ) मुलांचा आनंद का उतू चालला होता ?
उत्तर: ईदगाहला जायचे म्हणून
मुलांचा आनंद उतू चालाला होता.
( इ ) हमीदच्या घरी कोणकोण होते ?
उत्तर: हमीदच्या घरी फक्त अमिनाआजी
होती.
( ई ) नमाज संपल्यावर लोक काय करतात ?
उत्तर: नमाज संपल्यावर लोक
एकमेकांना मिठी मारून भेटतात.
( उ ) अमीनाने दिलेल्या पैशाचे हमीदने काय घेतले ?
उत्तर: अमिनाने दिलेल्या पैशाचे
हमीदने एक चिमटा आणला.
प्र .२ . थोडक्यात उत्तरे लिहा .
( अ ) ईदच्या दिवशीची सकाळ कशी
आहे ?
उत्तर: ईदच्या दिवशीची सकाळी ही
रम्य आणि सुंदर आहे. झाड हिरवीगार दिसत आहेत. शेतामध्ये समृद्धी डोलत आहे.
आकाशामध्ये लाली पसरली आहे. आजचा सूर्य सुरेख दिसत आहे. सकाळ शांत आणि सुखद आहे.
जणू काही साऱ्या जगालाच ईदच्या शुभेच्छा देत आहे. गावात सर्वत्र ईदीची गडबड चालली
आहे. ईदगाहाला जाण्यासाठी सर्वजण तयारी करत आहेत.
( आ ) ईदच्या दिवशी मुलांचा आनंद कसा आहे ?
उत्तर: ईदच्या दिवशी मुल खूप
आनंदात आहेत. मुलांना ईदगाहला जाण्याची फारच घाई झाली आहे. काही मुलांनी एक
दिवसाचा रोज पाळलाय तोही फक्त दुपारपर्यंत. अशा प्रकारे सर्व मुलांना ईदच्या दिवशी
खूप आनंद झाला आहे.
( इ ) हमीद कोणत्या आनंदात होता ?
उत्तर: अब्बाजान पैसे कमवायला
गेले आहेत. खूप पिशव्या भरून पैसे घेऊन ते परत येतील. अम्मिजान अल्लाच्या घरून
आपल्यासाठी खूप छान छान गोष्टी घेऊन येईल. असा त्याचा विश्वास होता. म्हणून तो आनंदात
आहे.
( ई ) ईदची प्रार्थना कशी चालते , त्याचे वर्णन करा ,
उत्तर: चिंचेच्या दाट सावलीत
खाली पक्की फारशी लावलेली आहे. त्यावर जाजम घातले आहे. रोजे करणाऱ्यांच्या लांबच
लांब रंग लागलेल्या होत्या. नंतर येणारे लोक रांगेत मागे उभे राहतात. या ठिकाणी
कोणाला पैसा प्रतिष्ठा पहिली जात नाहीत.
सर्वांना समान वागणूक दिली जाते. सगळे एकदम खाली वाकतात, गुढगे टेकतात.
नमाज संपल्यानंतर एकमेकांना मिठी मारून भेटतात. अशा प्रकारे ईदची प्रार्थना चालते.
( उ ) ईदगाहजवळच्या मेळ्यात हमीदच्या मित्रांनी काय काय मौज केली?
उत्तर: नमाज संपल्यावर सर्व
मित्र मिठाईच्या आणि खेळण्यांच्या दुकानाकडे धावले. मेळ्यात झोपाळे होते. चक्राकार
फिरणारे उंट, हत्ती आणि घोडे होते. हमीदचे मित्र नूर, मोहसीन, आणि सम्मी या
घोड्यांवर बसत आहेत. महमूदने खेळण्याच्या दुकानातून शिपाई घेतला. मोहसीन ने
पाणक्या घेतला. खेळण्यांच्या दुकानानंतर ते मिठाईच्या दुकानाकडे आहे. त्या ठिकाणी
काहींनी रेवड्या घेतल्या तर काहींनी गुलाबजामून घेतले काहींनी कराजी घेतली तर कोणी
जिलेबी. अशी हमीदच्या मित्रांनी ईदगाहजवळच्या मेळ्यात मौज केली.
( ऊ) चिमट्याचे काय काय उपयोग होतात ?
उत्तर: चिमट्याचे पुढील उपयोग
होतात
फुलके तव्यावरून उतरायला चिमटा
वापरतात. विस्तवावर फुलके भाजण्यासाठी या चिमट्याचा उपयोग होतो. जर कोणी
विस्तावातले निखारे मागायला आले तर त्याला पटापट चिमट्याने निखारे उचलून देता
येतात. इत्यादी चिमट्याचे उपयोग आहेत.
( ए ) हमीदने आणलेला चिमटा पाहून अमीनाआजीला काय वाटले ?
उत्तर: अमिनाजी हमीदने आणलेला चिमटा पाहून आधी दुखी झाली. मेळ्यामध्ये दुपारपर्यंत काही खाल्ले नाही आणि घरी येताना चिमटा कसा आणलास असे हमीदला विचारताच तो उत्तरला की तुझे हात स्वयंपाक करताना भाजतात म्हणून हा चिमटा घेतला.मेळ्यामध्ये दुसऱ्या मुलांनी मिठाई खेळणी घेतलेली पाहून हमीदला देखील घ्यावास वाटल असेल मग त्याने आपल्या मनावर ताबा मिळवला कसा हा विचार आजी करत होती. तिचे मन भरून आले . तिने हमीदला कुशीत घेतले.
4th standard Marathi idgah questions answers / 4th standard Marathi idgah answers / idagah 4th class question answers / idgah 4th standard Marathi questions answers / Iyatta chouthi prashn uttare
प्र.३.गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.
( अ ) जणू तो साऱ्या जगाला..................... शुभेच्छा देत आहे .
उत्तर: जणू तो साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहे .
( आ ) हमीदचे अब्बा
मागच्यावर्षी..................... बळी गेले .
उत्तर: हमीदचे अब्बा मागच्यावर्षी कॉलऱ्याला बळी गेले .
( इ ) हमीदच्या खिशात ........................पैसे आहेत .
उत्तर: हमीदच्या खिशात तीनच पैसे आहेत .
( ई ) दुकानदाराने आधी चिमट्याची किंमत ..................पैसे
सांगितली
उत्तर: दुकानदाराने आधी चिमट्याची किंमत सहा पैसे सांगितली
प्र ४ . शब्दसमूहांचा वाक्यात
उपयोग करा ,
( अ ) आनंद उतू जाणे .
उत्तर: स्पर्धेत राजू पहिला
आल्याने त्याच्या चेहऱ्यावरून आनंद उतू चालला होता.
( आ ) धुडकावून लावणे.
उत्तर: राजूचा शाळा बुडवण्याचा
बेत आईने धूडकावून लावला.
( इ ) मन लालचावणे
उत्तर: समोर असलेली मिठाई पाहून राजूचे मन लालचावले.
(ई) मनावर ताबा मिळवणे.
उत्तर: कोरोना महामारी लवकर दूर व्हावी यासाठी
सर्वांनी आपल्या मनावर ताबा मिळवला होता.
प्र.५. हमीदच्या घरी ईद साजरी
केली जाते. तुमच्या घरी कोणते सण साजरे करतात? त्यांतील कोणता सण तुम्हांला जास्त आवडतो?
तो कसा साजरा करतात ते आठ ते दहा ओळींत लिहा.
उत्तर: या प्रश्नाचे उत्तर
पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. आणि त्याठिकाणी असलेली माहिती या
प्रश्नाच्या उत्तरात लिहा.
येथे क्लिक करा.
✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂
हे सुद्धा पहा:
इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके
इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे
✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂
हे सुद्धा पहा:
इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके | |
इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे |