६. मायेची पाखर स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी | Mayechi pakhar 4th swadhyay prshn uttare marathi

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय इयत्ता चौथी मायेची पाखर स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा मायेची पाखर 4th standard Marathi mayechi pakh
Admin

६. मायेची पाखर स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय / इयत्ता चौथी मायेची पाखर  स्वाध्याय प्रश्न उत्तरे / चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा मायेची पाखर   / मायेची पाखर स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय

 

यत्ता चौथी मराठी स्वाध्याय इयत्ता चौथी मायेची पाखर  स्वाध्याय प्रश्न उत्तरे Mayechi pakhar 4th class question answers Mayechi pakhar 4th standard Marathi questions answers Iyatta chouthi prashn uttare

प्र . १. एका वाक्यात उत्तरे लिहा .

 

( अ ) पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले ?

उत्तर: वसतिगृहातील हे जेवण तेथे राहणाऱ्या मुलांनी केले अआसेल ते चांगले नसेल; म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले.

 

( आ ) वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती ?

उत्तर: वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया आईवडिलांप्रमाणे होती.

 

( इ ) अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले ?

 उत्तर: अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले.

 

( ई ) कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या ?

उत्तर: कर्मवीर भौरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरु केल्या.

 

 प्र .२ . गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा .

 

( अ ) संस्थेच्या आवारात एक मोठे ..................... झाड होते.

उत्तर:संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते.

 

( आ ) स्वतःची .............................त्याच्या अंगावर घातली .

उत्तर: स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली

 

( इ ) त्या मुलांपैकी कितीतरी जणांना ............................नव्हती .

उत्तर: त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती

 

( ई ) " अण्णा , आपण खरेखुरे या मुलांचे ..................... आहात.

उत्तर: " अण्णा , आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात.

 

प्र .३ . कोण , कोणाला म्हणाले ?


( अ ) " आता इथंच मुक्काम करा । "

उत्तर: असे कर्मवीर भाऊराव लेखकांना म्हणाले

 

( आ ) " जा रे , स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू ।"

उत्तर: असे कर्मवीर भाऊराव वसतीगृहातील एका मुलाला म्हणाले.

 

( इ ) " आपणांस उदंड आयुष्य मिळो । "

उत्तर: असे लेखक कर्मवीर भाऊरावांना म्हणाले.

 4th standard Marathi Mayechi pakhar questions answers / 4th standard Marathi mayechi pakhar answers / Mayechi pakhar 4th class question answers / Mayechi pakhar 4th standard Marathi questions answers / Iyatta chouthi prashn uttare

प्र .४ . थोडक्यात उत्तरे लिहा .

 

( अ ) लेखक उपाशी आहेत , हे समजल्यावर अण्णांनी काय केले ?

उत्तर: लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला आज्ञा केली आणि स्वयंपाक घरात काही शिल्लक आहे का ते बघून घेऊन यायला सांगितले. मुलगा धावत धावत स्वयंपाक घरात गेला आणि पिठले, भाकरी, कांदा, तेल एका ताटात घेऊन आला.

 

( आ ) मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला ?

उत्तर: रात्रीं कडाक्याची थंडी पडली होती. मध्यरात्र उलटून गेली होती. तेव्हा अण्णा उठले त्यांनी हातात कंदील घेतला आणि प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही . तो झोपाला की नाही त्याच्या अंगावर पांघरून आहे की नाही ते अण्णा पहिले. यावेळी अण्णांना एक मुलगा थंडीने कुडकुडताना दिसला त्यांनी त्याला दोन्ही हातांनी अलगद उचलून आपल्या बिछान्यावर आणून झोपवले. स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. आणी त्याला आपल्या पोटाशी धरले. तो मुलगा त्यांच्या उबेत गाढ झोपी गेला. हा प्रसंग मध्यरात्रीनंतर घडला.

 

 ( इ ) सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले ?

उत्तर: थंडीने कुडकुडणाऱ्या मुलाला अण्णांनी स्वतःची कांबळी दिली आणि आपल्या बिछान्यावर त्याला झोपवले हे लेखानांनी पहिले होते. सकाळी उठताच लेखक अण्णांना कडकडून भेटले . आणि ते अण्णांना म्हणाले. अण्णा , आपण खरे खुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे, तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणांस उदंड आयुष्य मिलो !

 

प्र.५. वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा .

 

‘अ’ गट

' ' गट (उत्तरे)

( १ ) टाळाटाळ करणे .

( इ ) एखादी गोष्ट करायचे टाळणे .

( २ ) पोटात कावळे ओरडणे .

( ई ) खूप भूक लागणे.

( ३ ) डोळा लागणे .

( अ ) झोप लागणे .

( ४ ) झटत राहणे ,

( आ ) सतत प्रयत्न करणे .

 

प्र ६. लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते , म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती . आता खालील वाक्यांतील रंगीत शब्दांचा अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

 

( अ ) भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते .

उत्तर: नाना अजगरासारखे पडून होते म्हणजे याचा अर्थ असा होते की ज्याप्रमाणे अजगर खाल्ल्यावर सुस्त पडून राहतो त्याप्रमाणे नाना पडून होते.

 

( आ ) दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही ; म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात ,

उत्तर: याचा अर्थ असा होती की मांजर चालताना तिच्या मऊ तळव्यांमुळे तिच्या पावलांचा आवाज येत नाही त्याचप्रमाणे बंड्या अलगद पाय टाकत हळू हळू चालतो व त्यामुळे त्यांच्या पायांचा आवाज होत नाही.


प्र ७. लिहा.

लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे . तसा तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तींबद्दल पाच ते सात ओळीत लिहा .

 उत्तर: 




प्र.८. सुरुवातीला एक वाक्य दिले आहे . तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा .

( अ ) सकाळची वेळ होती .

उत्तर:

डोंगराआडून सूर्य सोनेरी रथात बसून येत होता.

पाखरे मधून गाणे गात होती.

सर्वत्र वातावरणात प्रसन्नता होती.

 

( आ ) बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली .

उत्तर:

ती झाडाच्या हिरव्या पानावर होती.

अळीचा रंग देखील हिरवा होता.

तिला खूप पाय होते.

 

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


हे सुद्धा पहा:

इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके

येथे क्लिक करा.

इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

यत्ता चौथी मराठी स्वाध्याय
इयत्ता चौथी मायेची पाखर  स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Mayechi pakhar 4th class question answers
Mayechi pakhar 4th standard Marathi questions answers
Iyatta chouthi prashn uttare

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.