16.स्वच्छतेचा प्रकाश स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वच्छतेचा प्रकाश 5वी मराठी पाठ १६ स्वाध्याय प्रश्न उत्तरे / स्वच्छतेचा प्रकाश इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / इयत्ता पाचवी विषय मराठी स्वच्छतेचा प्रकाश स्वाध्याय / स्वच्छतेचा प्रकाश प्रश्न उत्तरे
स्वाध्याय
प्र.१. थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ)
सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना
स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले ?
उत्तर: “जगामध्ये
कोणतेही काम हे हलक्या दर्जाचे नसते. आपल्या देशाची स्वच्छता करणे ही देखील एक देशसेवाच
आहे. असे सेनापती बापट यांचे मत होते म्हणून सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना
स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले.
(आ) ' भारत माझा देश आहे ' या वाक्यात ' माझा ' हा शब्द का वापरला आहे?
उत्तर: जेव्हा एखादी वस्तू
आपण माझी असे म्हणतो तेव्हा आपण त्या वस्तूची खूप काळजी घेतो पण जेव्हा तीच वस्तू
आपली म्हटल्यावर आपण त्या वस्तूची तितकीशी चांगली काळजी घेत नाही म्हणून भारत माझा
देश आहे या वाक्यात माझा हा शब्द वापरला आहे.
(इ) तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला ?
उत्तर: गावातील गावकरी सफाईच्या
कामाला हलके काम समजत होते. सेनापती वापट यांनी सफाईच्या कामाची सुरुवात
स्वतःपासून केली. आणि हे काम आयुष्यभर चालवले. तात्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या
वृत्तीत बदल होऊन लोक सफाई मोहिमेत सामील झाले.
(अ) थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात?
उत्तर: थोर व याक्ती स्वतःहून
देशसेवेचे व्रत घेतात. त्याप्रमाणे स्वतः कृती करतात. त्यांच्या या कृतीतून ते
समाजाला शिकवण देतात.
प्र.२. तुमच्या शब्दांत
उत्तरे लिहा.
(अ)
तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा
केव्हा राबवता ?
उत्तर: महात्मा गांधी जयंती,
स्वातंत्र्यदिन , प्रजासत्ताक दिन, शिक्षक दिन, शाळेचा पहिला दिवस तसेच शाळेत साजऱ्या
होणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्वच्छता मोहीम राबवली जाते.
(आ)
जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम
राबवता ,
तेव्हा कशाकशाची सफाई करता ? का?
उत्तर: शाळेत स्वच्छता मोहीम
राबवली जाते तेव्हा, शाळेतील वर्गखोल्यांची, शाळेतील व्हरांड्याची, क्रीडांगणाची,
बागेची, प्रयोगशाळेची सफाई केली जाते. सफाई केल्याने सर्व परिसर प्रसन्न होतो. मन
प्रसन्न होऊन जाते.
(इ) तुमच्या मित्राला
स्वच्छता करायला आवडत नाही. तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून दयाल? ते आठ - दहा ओळींत लिहा.
उत्तर: ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी
आरोग्य आणि सुख समृद्धी असते. जर स्वच्छता ठेवली नाही तर त्या ठिकाणी रोगराईचा
प्रसार होऊन आरोग्याला धोका निर्माण होतो.
विविध प्रकराचे प्रदूषण होऊन. पर्यावरणाचा समतोल बिघडतो परिणामी त्याचा परिणाम
आपल्या जीवनावर तसेच पर्यावरणावर होतो. अस्वच्छतेमुळे मलेरिया, डेंगू यांसारखे
आजार पसरतात. आपल्याला जर निरोगी आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी स्वच्छता करणे हे
गरजेचे आहे.