१५.आपल्या समस्या – आपले उपाय स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयता पाचवी मराठी | Aaplya samasya aaple upay swadhyay prashn uttare 5vi marathi

आपल्या समस्या – आपले उपाय इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता पाचवी विषय मराठी आपल्या समस्या – आपले उपाय स्वाध्यायAaplya samasya aaple upay
Admin

१५.आपल्या समस्या – आपले उपाय स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

१५.आपल्या समस्या – आपले उपाय स्वाध्याय प्रश्न उत्तरे / 5वी मराठी पाठ १5 स्वाध्याय प्रश्न उत्तरे / आपल्या समस्या – आपले / उपाय इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / इयत्ता पाचवी विषय मराठी आपल्या समस्या – आपले उपाय स्वाध्याय / आपल्या समस्या – आपले उपाय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय

तुमच्या शब्दांत उत्तरे सांगा .

(अ)  तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का?

उत्तर: हो आम्ही गर्दी असणाऱ्या रस्त्यवर गेलो आहोत.

 

(आ) रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते?

उत्तर: रस्त्यावर संध्याकाळच्या आणि सकाळच्या वेळेला जास्त गर्दी असते.

 

(इ)   नेमक्या त्या वेळेलाच जास्त गर्दी का होते असे तुम्हांला वाटते?

उत्तर: सकाळच्या वेळेला सर्व लोक कामाला जाण्यासाठी घराबाहेर पडतात. आणि संध्याकाळच्या वेळेला लोक कामावरून घरी येतात तर काही जन बाजारात खरेदी करायला जातात.

 

(ई)  वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात ?

उत्तर: वाहतूक कोंडीमुळे एकाच ठिकाणी वाहने थांबून राहिल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणवर वायू प्रदूषण होते. गाड्यांचे हॉर्न चालू असल्याने ध्वनी प्रदूषण देखील होते. पादचारी माणसांना रस्त्यावरून जाण्यास अडथळा निर्माण होतो.

 

(ई)    वाहतूक कोंडी होऊ नये , म्हणून काय काय केले पाहिजे असे तुम्हांला वाटते?

उत्तर: वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून पुढील उपाय करता येतील.

१)   शक्यतो खाजगी वाहनाचा वापर टाळा.

२)   रस्त्यावरील सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन करा.

३)   रस्त्यावर अस्थाव्यस्त वाहने उभी करू नका.

४)   कामाला जाताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा . जेणेकरून इंधन बचतीबरोबर वाहतूक कोंडीला आळा बसेल.

 

( ऊ) वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते?

उत्तर: वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण या प्रकारचे प्रदूषण होते.

 

 (ए) हे प्रदूषण कमी व्हावे , म्हणून काय काय करता येईल?

आईवडिलांशी , मित्रांशी , शिक्षकांशी चर्चा करा व सांगा .

उत्तर: वायू प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना.

१)   सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा.

२) गर्दीत विनाकारण गाडी चालू ठेऊ नका.

ध्वनी प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना.

१)               गर्दीत विनाकारण हॉर्न वाजवू नये.

 

१५.आपल्या समस्या – आपले उपाय स्वाध्याय प्रश्न उत्तरे / 5वी मराठी पाठ १5 स्वाध्याय प्रश्न उत्तरे / आपल्या समस्या – आपले / उपाय इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / इयत्ता पाचवी विषय मराठी आपल्या समस्या – आपले उपाय स्वाध्याय / आपल्या समस्या – आपले उपाय प्रश्न उत्तरे५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे आपल्या समस्या – आपले उपाय स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास. / Aaplya samasya aaple upay swadhyay prashna uttare / Aaplya samasya aaple upay question answer / Aaplya samasya aaple upay prashn uttar  / 5th standard Marathi question answers

• चौकाचौकांत वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस उभे असतात . प्रदूषणाचा त्यांना किती त्रास होत असेल , याचा विचार करा. चौकाचौकांतील ध्वनिप्रदूषण , वायुप्रदूषण कमी करण्यासाठी उपाय सुचवा.

उत्तर: वायू प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना.

१)  सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा.

२)  चौकात थांबून उगाचच गाडी चालू ठेऊ नका.

ध्वनी प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना.

१)  चौकांत  विनाकारण हॉर्न वाजवू नये.

 

• खालील वाक्ये वाचा . तुम्हांला योग्य वाटत असेल , तर ✔अशी खूण करा आणि अयोग्य वाटत असेल , तर ✖ अशी खूण करा .

१.     एखादया गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे . तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे.

उत्तर: 

 

२.   ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास , भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारणे.

उत्तर: 


३.      दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे.

उत्तर: ✔

 

४.     गर्दीमधून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे.

उत्तर: 

 

५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे आपल्या समस्या – आपले उपाय स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास. / Aaplya samasya aaple upay swadhyay prashna uttare / Aaplya samasya aaple upay question answer / Aaplya samasya aaple upay prashn uttar  / 5th standard Marathi question answers

चित्र पाहा. संवाद वाचा.

• तुमच्या मनाने उत्तरे सांगा.

(अ)   आपण कचरा कशाला म्हणतो?

उत्तर:  ज्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होत नाही, ज्या वस्तू टाकावू असतात त्यांना आपण कचरा म्हणतो.

 

(आ)  घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात?

उत्तर: घरातील कचऱ्यात धूळ, भाज्यांचे देठ, फळाच्या साली, कागदाचे कपटे, विविध वस्तूंच्या पिशव्या, पेन, प्लास्टिक पिशव्या, टाकावू अन्न, रिकामे खोके इ.

 

(इ)    तुमच्या घरातील ओला व सुका कचरा कोणता ते सांगा.

उत्तर

ओला कचरा.

फळांच्या साली.

भाज्यांचे देठ

शिळे अन्न

खरकटे

खराब झालेल्या भाज्या

सुका कचरा.

कागद

प्लास्टिक पिशव्या

पुठ्ठ्याचे खोके

बाटल्या

 

(ई) तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा.

उत्तर: घरात तयार होणाऱ्या कचऱ्याची ओला कचरा व सुका कचरा अशी वेगवेगळ्या डब्यांत विभागणी केली जाते. ओला कचरा घराच्या मागे असलेल्या  खड्ड्यात टाकून त्यापासून खत तयार केले जाते. सुका कचरा हा कचरा गाडीत देण्यात येतो.

 

( उ ) कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात ?

उत्तर: 

१) कागदावर प्रक्रिया करून त्यापासून पुन्हा एक उपयोगी कागद निर्माण करता येतो.

२)   काच आणी प्लास्टिक वस्तू वितळवून त्यापासून नव्या गोष्टी तयार करता येतात.

३)   ओल्या कचऱ्यापासून उपयुक्त खत निर्माण करता येते.

 

(उ)   तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात?

उत्तर: वर्गातील कचऱ्यात कागद, खराब पेन, खोडरबर चे तुकडे, पेन्सिल ते तुकडे , खाऊचे कागद , मोडलेल्या पट्ट्या इत्यादी वस्तू असतात.


 (ए) वर्गात कचरा होऊ नये , म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल.

उत्तर: वर्गात कचरा होऊ नये म्हणून  पुढील काळजी घेता येईल

कागदाचे कपटे वर्गातील कचऱ्याच्या डब्यात टाकणे

खाऊचे कागद इतरत्र न टाकता कचराकुंडीत टाकणे.


(ऐ) कचराकुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही, तर आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा . आईवडिलांशी , मित्रांशी चर्चा करून सांगा.

उत्तर: कचराकुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही, तर आपल्याला पुढील  समस्यांना तोंड द्यावे लागेल :

  • कचराकुंडीच्या ठिकाणी दुर्गंधी पसरेल
  • रोगराई चा धोका वाढेल.
  • माश्या, डास यांची पैदास होईल.
  • साथीचे आजार पसरतील.

 

रस्त्यावरील कुत्र्यांना पाहून पडणारे प्रश्न

उत्तर:

१)   रस्त्यावर कुत्री का भटकत असतील ?

२)   रस्त्यावर सोडलेल्या कुत्र्यांचे मालक कोण असतील?

३)   रस्त्यावर सोडलेली कुत्री काय खात असतील?

४)   भटकी कुत्री अंगावर धावून का येतात?

५)   भटकी कुत्री चावल्यास काय परिणाम होतील?

६)   भटक्या कुत्र्यांची संख्या कश्या प्रकारे कमी करता येईल.

 

 

१५.आपल्या समस्या – आपले उपाय स्वाध्याय प्रश्न उत्तरे
5वी मराठी पाठ १5 स्वाध्याय प्रश्न उत्तरे
आपल्या समस्या – आपले उपाय इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Aaplya samasya aaple upay prashn uttar 
5th standard Marathi question answers

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.