२२.अति तिथं माती स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता पाचवी मराठी | Ati titha mati swadhyay question answers 5vi marathi.

Ati tith mati swadhyay prashna uttare Ati tith mati question answer Ati tith mati prashn uttar 5th standard Marathi question answersअति तिथं माती
Admin

२२.अति तिथं माती स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

प्रश्न विचार पुनःपुन्हा  5वी मराठी पाठ १८ स्वाध्याय प्रश्न उत्तरे - अति तिथं माती  इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - इयत्ता पाचवी विषय मराठी अति तिथं माती  स्वाध्याय - अति तिथं माती  प्रश्न उत्तरे

स्वाध्याय


प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ)        संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली?

उत्तर: सांगितला उत्तेजन देण्यासाठी राजाने आत्ताच्या आत्ता राज्यात दवंडी पिटवून आजपासून राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं. अशी आज्ञा केली.


(आ)     जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही?

उत्तर: जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन सांगू शकला नाही कारण राजाने सगळ गाण्यात सांगायचं म्हणून आज्ञा केली होती.


(इ)            ही नाटिका तुम्हांला वर्गात सादर करायची आहे. त्यासाठी किती मुले लागतील ?

उत्तर: ही नाटिका वर्गात सदर करायची असल्यास त्यासाठी नातीकेतील मुख्य दहा पात्रे आणि राज्याची प्रजा आणि इतर दरबारी प्रजाजन मिळून वर्गातील सर्वच मुले लागतील.

 

प्रश्न विचार पुनःपुन्हा  5वी मराठी पाठ १८ स्वाध्याय प्रश्न उत्तरे अति तिथं माती  इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता पाचवी विषय मराठी अति तिथं माती  स्वाध्याय अति तिथं माती  प्रश्न उत्तरे ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे अति तिथं माती स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास. Ati tith mati  swadhyay prashna uttare Ati tith mati  question answer Ati tith mati  prashn uttar  5th standard Marathi question answers Ati tith mati  prashn uttar  5th standard Marathi question answers


प्र.२.दोन तीन वाक्यांत उत्तरे लिहा.


(अ)        चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते, हे पाठातील कोणकोणत्या वाक्यांवरून कळते?

उत्तर:     चक्रमादित्य महाराज्यांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते, हे पाठातील प्रधानजींच्या पुढील वाक्यांवरून कळते.

१)गोरगरीब खूप कष्ट करत आहेत.२)फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत ३)चान्र दोन साथीचे रोग आले. त्यांत शे-पाचशे माणस गेली. इ.


(आ)     या पाठातील कोणती वाक्ये वाचून तुम्हांला हसू येते?

उत्तर:     गवईबुवा, तुम्हांला काय येत? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर अस करा, पेटीवर तबला वाजवा. हे वाक्य वाचून मला हसू येते.


(इ)            चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते, हे कोणत्या वाक्यांवरून कळते?

उत्तर:   गवईबुवा, तुम्हांला काय येत? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर अस करा, पेटीवर तबला वाजवा. हे वाक्य वाचून मला हसू येते. या वाक्यावरून चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते  हे कळते.


(ई)      महाराजांची कोणती आज्ञा अमलात आणणे शक्य नाही, असे तुम्हांला वाटते? असे का वाटते?

उत्तर:    राज्यातील सगळ्या लोकांनी गाण्यातच बोलायचे ही आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही. कारण, काही अतिमहत्वाच्या गोष्टी गाण्याच्या माध्यमातून सांगताना खूप उशीर होतो. तसेच व्यावहारिक जीवनात गाण्याचा वापर केल्यास बोलताना घोळ होतो.

 

(उ)   या पाठाला ' अति तिथं माती' हे नाव का दिले असावे?

उत्तर:   या नाटिकेतील राजा चक्रमादित्य यांनी कोणताही विचार न करता राज्यात सर्वांनी गाण्यातच बोलण्याची दवंडी पिटवून आज्ञा दिली. तयमुले प्रत्येक जण बोलताना गाण्यातच बोलू लागला. इतकेच नाही तर ज्या वेळी राजवाड्याला आग लागली, ही बातमी सुद्धा सेवक राजाला गाण्याच्या माध्यमातून सांगू लागला. त्यामुळे बातमी सांगण्यास उशीर झाला आणि तोपर्यंत राजवाडा जळून खाक झाला होता. अशा प्रकारे राजाने सर्वाना गाण्यातच बोलण्यास सांगून गोष्टीचा अतिरेक केला आणि त्यामुळे त्याचा राजवाडा जळून खाक झाला. म्हणून या पाठाला ‘अति तिथे माती’ असे नाव दिले असावे.

 

प्र.४ वाक्यात उपयोग करा.


(अ)      साखरेसारखा गोड.

उत्तर: सार्थक चा स्वभाव साखरेसारखा गोड आहे.


(आ)   उत्तेजन देणे.

उत्तर: स्पर्धेत भाग घेण्यासाठी राजूची बहिण त्याला उत्तेजन देते.


(इ)          हसून हसून पोट दुखणे

उत्तर: राजूने वर्गात सांगितलेला विनोद ऐकून सगळ्याने हसून हसून पोट दुखले.

 

Ati tith mati  swadhyay prashna uttare / Ati tith mati  question answer / Ati tith mati  prashn uttar  / 5th standard Marathi question answers

प्र.५. खालील प्रसंग तुम्ही गाण्यातून कसे सादर कराल ते लिहा .


(अ)        तुम्हांला करमत नाही, हे तुम्ही तुमच्या मित्राला सांगत आहात.

उत्तर: काय करावं , किती करावं सुचत नाही मजला

अरे माझ्यामित्रा , करमत नाही मजला.


(आ)     शिक्षक शिकवलेल्या पाठावर मुलांना गृहपाठ करायला सांगत आहेत.

उत्तर: संपला शिकवूनी आज पाठ हो...

आत्ता करा गृहपाठ हो....


(इ)            रस्त्यावर फिरून माल विकणारी व्यक्ती मालाची जाहिरात करत आहे.

उत्तर: अहो दादा ताई माई ...

घरी जाण्याची तुम्हांला फार  घाई....

घरी जाताना घेऊन जा तुम्ही एक चटई ....


प्र.६.वांग्यांसाठी , कांदयांसाठी कोणकोणती विशेषणे या पाठात आलेली आहेत? वांगी , कांदे यांसाठी तुम्ही आणखी कोणती विशेषणे वापराल?

उत्तर:

वांगी:

पाठातील विशेषणे: छान, सुरेख, शेर-दोन शेर

आणखी विशेषणे: चवदार, ताजी, उत्कृष्ट.

कांदे:

पाठातील विशेषणे: पांढरे फेक, स्वच्छ , सुरेख.

आणखी विशेषणे: मोठे, गोल.


प्र.७.तुमच्या आवडीच्या कोणत्याही पाच वस्तूंची नावे घेऊन त्यांच्यासाठी विशेषणे लिहा.

उत्तर:

१)   भाजी: ताजी, हिरवीगार, स्वस्त.

२)   सायकल: वेगवान, मजबूत, आकर्षक.

३)   दप्तर: मजबूत, सुंदर, मोठे.

४)   कपडे: सुंदर, सुरेख, छान.

५)   गुलाब: छान, सुंदर, सुवासिक, गुलाबी.

 

प्र.८.चोरीमारी , गोरगरीब यांसारखे पाठातील व इतर जोडशब्द शोधा. लिहा.

उत्तर: रोगराई , सटासट, नवराबायको , आरडाओरड.

 

प्र.९.खालील शब्द असेच लिहा.

उत्कृष्ट, उत्तम, कार्यक्रम, स्वतःला, उत्तेजन, पुन्हा, प्रिय.

उत्तर: उत्कृष्ट, उत्तम, कार्यक्रम, स्वतःला, उत्तेजन, पुन्हा, प्रिय.

 

प्र.१०.अ आणि ब या चौकटींत परस्परांचे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. त्यांच्या जोड्या जुळवून लिहा.

प्रत्येक जोडीसाठी एक - एक वाक्य लिहा.

उदा., जवळ X दूर.

शाळा माझ्या घरापासून जवळ आहे आणि दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे.

'' गट रुंद, गोरगरीब, रोख, सुंदर, हजर, मान, भरभर, उद्योगी.

'' गट अरुंद, श्रीमंत, उधार, कुरूप, गैरहजर, अपमान, सावकाश, आळशी.

उत्तर: 

१)   रुंद X अरुंद

शाळेजवळ असणारा पूल रुंद आहे आणि आमच्य घराजवळील पूल अरुंद आहे.

 

२)   गोरगरीब X श्रीमंत

गोरगरीब लोक खूप कष्ट करतात, श्रीमंत लोक कमी कष्ट करतात.

 

३)   रोख X उधार

कोणत्याही वस्तूचे रोख पैसे देणे कधीही चांगले कोणाचे उधार ठेऊ नये.

 

४)   सुंदर X कुरूप

मोर किती सुंदर दिसतो आणि कावळा किती कुरूप दिसतो.

 

५)   हजर X गैरहजर

आज वर्गात राजू गैर हजर होता राजू सोडून बाकीचे विद्यार्थी हजार होते.

 

६)   मान X अपमान

सर्वांना मान राखावा, कधीही कोणाचा अपमान करू नये

 

७)   भरभर X सावकाश

ससा भरभर चालतो, तर कासव अगदी सावकाश चालतो.

 

८)   उद्योगी X आळशी

शामराव उद्योगी माणूस आहे म्हणून तो चांगले जीवन जगतो, तर पोपटराव आळशी माणूस आहे म्हणून तो कसे बसे घर चालवतो.

 

हे सुद्धा पहा: 

इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके डाउनलोड करा .

येथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी सर्व विषयांचे प्रश्न उत्तरे पहा.

येथे क्लिक करा.

इयत्ता पहिली ते दहावी सर्व विषयांची पुस्तके पहा.

येथे क्लिक करा.


स्वाध्याय आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा ......

प्रश्न विचार पुनःपुन्हा  5वी मराठी पाठ १८ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
अति तिथं माती  इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
इयत्ता पाचवी विषय मराठी अति तिथं माती  स्वाध्याय

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.