२५. ढोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे पाचवी मराठी
इयत्ता पाचवी विषय मराठी ढोल स्वाध्याय / ढोल प्रश्न उत्तरे / ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे ढोल / स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास.
स्वाध्याय
प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) आदिवासींच्या होळीला किती वर्षांचा इतिहास आहे?
उत्तर: आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे.
(आ) अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता?
उत्तर: आमश्या डोहल्या अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात प्रसिद्ध होता?
(इ) 'आमश्या डोहल्या' ने कोणती शपथ घेतली होती?
उत्तर: ‘यंदाच्या होळीत खूप ढोल वाजवू. अख्खा सातपुडा
दणाणून सोडू’, अशी शपथ 'आमश्या डोहल्या' ने
घेतली होती.
प्र.२. तीन चार वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा.
उत्तर: सातपुड्याच्या परिसरात कंदमुळे, फळे आणि पानाफुलांनी बहरलेले घनदाट जंगल आहे. त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे. निसर्गाच्या सानिद्ध्यात राहून, निसर्गाचे नियम पळून आदिवासी आपले जीवन जगात होते.
(आ) आमश्याच्या ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते?
उत्तर: आमश्या डोहल्या अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात प्रसिद्ध होता. आमश्या डोहाल्या ढोल वाजवू लागला की गावातील स्त्री-पुरुष, पोरे बाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागायची. आमश्या मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत असे.
(इ) ढोल कसा तयार करतात?
उत्तर: ढोलाचा सांगाडा हा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो. त्यावर कातडी चढवतात. कुणी ढोलाची पाने बसवतात. काही जर दोऱ्या आवळतात. अशा प्रकारे ढोल तयार करतात.
(ई) ' ढोलाच्या रूपाने आमश्या आपल्यातच राहील, ' हे पटवून देण्यासाठी भगताने काय सांगितले?
उत्तर: आमश्याला उद्या सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडले जाईल. त्याचा देह मातीचा, त्याची मातीच होईल. तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल. त्याच झाड होईल – मोठ सागाचं झाड. त्याचा कुणीतरी ढोल बनवेल. तो ढोल पुन्हा वाजू लागेल त्या ढोलाच्या रुपात आमश्या आपल्यातच राहील.
Dhol swadhyay prashna uttare / Dhol question answer / Dhol prashn uttar / 5th standard Marathi question answers
प्र.३. वाक्यात उपयोग करा.
आसमंतात घुमणे
वाक्य: गणपतीच्या मिरवणुकीत ढोलाचा नाद आसमंतात घुमला.
पटाईत असणे
वाक्य: राजू तबला वादन करण्यात पटाईत आहे.
दणाणून सोडणे
वाक्य: गणपतीबाप्पा मोरया च्या जयघोषाने सारा परिसर दणाणून सोडला.
शपथ घेणे
वाक्य: राजूने खूप अभ्यास करण्याची जणू शपथच घेतली.
रिंगण धरणे
उत्तर: गावात आलेल्या जादुगाराचे खेळ पाहण्यासाठी लहान मुलांनी जादुगाराभोवती रिंगण धरले.
ढोल प्रश्न उत्तरे / ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे ढोल / Dhol question answer
प्र.४. तुम्ही 'होळी' हा सण कसा साजरा करता, त्याचे वर्णन करा.
उत्तर: फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दिवशी सर्वजण मिळून लाकडे , गवत, पालापाचोळा जावतात. होळीच्या रात्री . ठरलेल्या ठिकाणी मध्ये एक लाकूड उभे करून बाकीची लाकडे त्याला तिरपी टेकवून ठेवली जातात आणि त्यावर गवत रचले जाते. होळीला आग लावल्यानंतर घरातील सर्वजण एक एक करून होळीची पूजा करतात. शेवटी होळीसमोर एक नारळ फोडला जातो. सर्वजण होळीला नमस्कार करतात. त्या दिवशी होळीसाठी घरात गोडाधोडाचा नैवैद्य तयार केला जातो. त्यामध्ये पुरणपोळीचा बेत हा दरवर्षी ठरलेला असतो. अशा प्रकारे होळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो.