२४.कापणी कविता स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता पाचवी मराठी | Kapani kavita iyatta 5vi marathi swadhyay prashn uttare

इयत्ता पाचवी विषय मराठी कापणी स्वाध्याय कापणी प्रश्न उत्तरेKapani question answer Kapani kavita prashn uttar 5th standard Marathi question answers
Admin

२४.कापणी कविता स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

इयत्ता पाचवी विषय मराठी कापणी स्वाध्याय / कापणी प्रश्न उत्तरे / ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे कापणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास.

स्वाध्याय

प्र.१.एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ)   कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते?

उत्तर: कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरु होते.

 

(आ)      पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते?

उत्तर: पिके कापायला आल्यावर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे दाण्यांची मोजणी उभी राहते.

 

(इ)    पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते?

उत्तर: पिके कापणीच्या वेळी शेत पिवळे धम्मक दिसते.

 

(ई)    कवयित्रीने ' हिंमत धरा' असे का म्हटले आहे?

उत्तर: कापणी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते म्हणून कवयित्रीने ' हिंमत धरा' असे म्हटले आहे.

 

(उ)   कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे?

उत्तर: कापणीच्या वेळी पिकाचे धाटे पटकन कापता यावेत म्हणून कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला सांगितले आहे.

 

इयत्ता पाचवी विषय मराठी कापणी स्वाध्याय कापणी प्रश्न उत्तरे ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे कापणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास.   Kapani swadhyay prashna uttare Kapani  question answer Kapani kavita  prashn uttar  5th standard Marathi question answers

प्र.२. खालील अर्थ असलेल्या कवितेतील ओळी शोधा व लिहा.


(अ)   आता कापणीला तयार व्हा व विळ्यांना धार लावून ठेवा.

उत्तर: शेत पिवये धम्मक,

आली कापनी कापनी.

आता धारा ते हिंमत,

इय्ये ठेवा पाजवुनी.


(आ)     हातातली गोफण खाली ठेवा व हातात विळे घ्या.

उत्तर: हातामधी धरा इय्ये,

खाले ठेवा रे गोफणी.


(इ)    कापलेल्या पिकाची रास लागलेली आहे.

उत्तर: थाप लागली पिकाची


(ई)    कापणी झाल्यावर रगडणी येते.

उत्तर: आली पुढे रगडनी.


प्र.३. पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत कोणकोणती कामे करावी लागतात, ते क्रमाने लिहा. इयत्ता दुसरीमधील ' भाकरीची गोष्ट ' हा पाठ वाचा.

उत्तर:

पिके कापायला आल्यावर पुढील कामे करावी लागतात.

१)पिकाची कापणी केलीज जाते.

२) कापलेल्या पिकाची एका ठिकाणी थाप लावतात.

३)पिकाची मळणी केली जाते.

४)मळणी झाल्यानंतर उफणणी करण्यात येते.

५) उफणणी करून मिळालेले दाणे पोत्यात भरून ठेवले जातात.

 

 Kapani swadhyay prashna uttare / Kapani  question answer . Kapani kavita  prashn uttar  / 5th standard Marathi question answers

प्र.४. तंत्रज्ञानात बदल होत असल्यामुळे शेतीच्या कामांमध्ये कसे कसे बदल होत गेले, याची माहिती मिळवा व खालीलप्रमाणे रकाने बनवून वहीत लिहा.

कामे

पूर्वीची स्थिती

सध्याची स्थिती

शेताला पाणी देणे.

बैलांच्या साह्याने विहिरीतील पाणी मोटेने उपसणे, काढणे. शेताला पाटाने पाणी देणे.

बोअरला मोटर लावून पाणी उपसणे, तुषार सिंचन, ठिबक सिंचन करणे.

धान्य कापणी

विळ्याच्या सहाय्याने कापणी केली जात असे.

यंत्राच्या सहाय्याने पिकाची कापणी केली जाते.

नांगरणी

बैलांच्या सहाय्याने नांगरणी केली जात असे.

मशीन च्या सहाय्याने शेत जमीन नांगरली जाते.

 

 

प्र.५. ' डाव्या डोळ्याची पापणी खालीवर होते' असा उल्लेख या कवितेत आलेला आहे. काहीतरी शुभ घडणार असेल, तर असे म्हणतात. अशा अनेक समजुती समाजात रूढ आहेत. तुमचे आजी - आजोबा , आई - वडील, शेजारी, आसपासचे लोक यांच्याकडून अशा समजुतींची माहिती घ्या. त्यांची कारणे शिक्षकांकडून समजून घ्या. त्या मागील वैज्ञानिक कारणे शोधा.

उत्तर:  तडा गेलेल्या आरश्यात पाहू नये अशुभ असते.

वैज्ञानिक कारण: तडा गेलेल्या आरशात पाहत असताना जर चुकून आपला हात तडा गेलेल्या काचेला लागला तर तो कापण्याची शक्यता असते म्हणून तडा गेलेल्या आरश्यात पाहू नये असे म्हटले जाते.

 

प्र.६. ही कविता तुम्हांला आवडली का? या कवितेतील तुम्हांला आवडलेल्या ओळी लिहा.

उत्तर: हो ही कविता मला आवडली.

मला आवडलेल्या ओळी.

शेत पिवये धम्मक,

आली कापनी कापनी.

आता धारा ते हिंमत,

इय्ये ठेवा पाजवुनी.

 

प्र.७. इया म्हणजे विळा, बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत ' ' ऐवजी ' ' आणि ' ' ऐवजी ' ' चा उपयोग करतात. कवितेत आलेले असे शब्द लिहा.

उत्तर: डोयाची, डोयापुढे, पिवये, इय्ये, डोयाले या ठिकाणी  ळ ऐवजी य चा वापर

 

प्र.८. खालील वाक्ये वाचा. त्यांतील समानार्थी शब्द शोधा व लिहा.

उदा. , शाळेचा संघ जिंकलेला पाहून संतोषचा आनंद गगनात मावेन .


(१)    पंकज आणि सरोजला कमळाचे फूल खूप आवडते.

उत्तर: पंकज, कमळाचे फूल.


(२)   सौदामिनीने आकाशात वीज कडाडताना पाहिली.

उत्तर: सौदामिनी , वीज


(३)    रजनी, यामिनी या निशाच्या घरी रात्री गेल्या .

उत्तर: रजनी, यामिनी, निशा, रात्री.


(४)    संग्राम आणि समर पानिपतच्या युद्धाची कथा वाचत होते.

उत्तर: संग्राम , समर, युद्ध


(५)    सुमन , कुमुद आणि कुसुम यांनी शाळेतील कार्यक्रमासाठी फुले गोळा केली.

उत्तर: सुमन , कुमुद, कुसुम, फुले


(६)   रवी, भास्कर, आदित्य, सविता व भानू हे सर्व मित्र दररोज सकाळी सूर्याला नमस्कार करतात.

उत्तर: रवी , भास्कर, आदित्य, भानू, सूर्य.

 

प्र. ९. वाचा. लक्षात ठेवा.

कवितेत आलेले खालील शब्द, त्या शब्दापुढे दाखवल्याप्रमाणे नेहमी लिहितात.

कापनी - कापणी, पापनी-पापणी, मापनी- मापणी, गोफनी -गोफणी, झापनी -झापणी, रगडनी- रगडणी, चोपनी -चोपणी.

 

५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे कापणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास. /   Kapani swadhyay prashna uttare / Kapani  question answer

 

• कंसांत काही क्रियापदे दिली आहेत. त्यांची योग्य रूपे तयार करून खालील वाक्यांतील रिकाम्या जागी लिहा.

उदा.’ • राधाने टाळ्या राधाने टाळ्या वाजवल्या (वाजवणे)

१. शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन केले (करणे)

२. चंदूने झाडांना पाणी घातले  (घालणे)

३. आईने नीताला प्रश्न विचारला. (विचारणे)

४. मंदा गाणी छान म्हणते. (म्हणणे)

 

कंसातील सूचनेनुसार वाक्ये बदलून पुन्हा लिहा.


१.     आकाशात ढग येताच मोर नाचू लागला.

('मोर' ऐवजी 'मुले' हा शब्द घ्या.)

उत्तर: आकशात ढग येताच मुले नाचू लागली.


२.     साप दिसताच तो घाबरला.

(' तो ' ऐवजी ' त्या' हा शब्द घ्या.)

उत्तर: साप दिसताच त्या घाबरल्या.


३.     अभयने दप्तर जागेवर ठेवले.

('अभय' ऐवजी 'शारदा' हा शब्द घ्या.)

उत्तर: शारदा ने दप्तर जागेवर ठेवले.

हे सुद्धा पहा: 👇

इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके डाउनलोड करा.

येथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी सर्व विषयांचे प्रश्न उत्तरे पहा.

येथे क्लिक करा.

इयत्ता पहिली ते दहावी सर्व विषयांची पुस्तके.

येथे क्लिक करा.

स्वाध्याय आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा ......




Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.