१८.कारागिरी स्वाध्याय प्रश्न उत्तरे पाचवी मराठी | karagiri swadhyay prashn uttare 5vi marathi

कारागिरी 5वी मराठी पाठ १८ स्वाध्याय प्रश्न उत्तरे कारागिरी इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरेKaragiri swadhyay prashna uttare Karagiri question ans
Admin

१८.कारागिरी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

कारागिरी 5वी मराठी पाठ १८ स्वाध्याय प्रश्न उत्तरे - कारागिरी इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - इयत्ता पाचवी विषय मराठी - कारागिरी स्वाध्याय - कारागिरी प्रश्न उत्तरे

स्वाध्याय


प्र.१. दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ)      लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची?

उत्तर: लहानपणी जेव्हा लेखिका कुंभारवाड्यात जायची. तेव्हा फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेऊन कुंभार अगदी चपळाईने लहान-मोठी मातीची भांडी बनवत असे. त्याची  लेखिकेला लहानपणी गंमत वाटायची.

कारागिरी 5वी मराठी पाठ १८ स्वाध्याय प्रश्न उत्तरे कारागिरी इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे Karagiri question answer Karagiri  prashn uttar


(आ)   लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची?

उत्तर: मोगा, घट, गाडगी, टिंगाणी तसेच शेगड्या आणि चुली इत्यादी मातीची भांडी लेखिकेच्या घरी असायची.


(इ)        लेखिकेचे आजी - आजोबा मातीपासून काय काय बनवायचे?

उत्तर: मातीपासून लेखिकेचे आजी – आजोबा नागपंचमीला मातीचा नाग आणि बेंदराला बैल तयार करत असत.


(ई)        लेखिकेला तासन्तास काय बघत राहावेसे वाटायचे?

उत्तर: लाकडी चौकोनातला काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरणे आणि लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्रमाला लेखिकेला तासंतास बघत राहाव्याश्या वाटायच्या.


(उ)        जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे?

उत्तर: जिनगरांचा मामा पाळण्यावर लावायच्या खेळण्यांतील राघू मैना अगदी खऱ्या खुऱ्या बनवायचा की पाहणाऱ्याला त्या जणू काही खऱ्याच वाटायच्या. खेळण्यावर असलेल्या चमचमणाऱ्या चांदण्यांची शोभा भुलवत असे ,  म्हणून जिनगरांच्या मामला लेखिकेने कसबी माणूस म्हटले आहे.


(ऊ)       कांबट्यांपासून काय काय बनवता येते?

उत्तर: रवळ्या, करंड्या, सुपं, टोपल्या, चालण्या, परड्या , चटया, पेट्या, खुर्च्या, पाळणे, टेबल इत्यादी गोष्टी कांबट्यांपासून बनवता येतात.

 

 (ए) चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे?

उत्तर: चिमाच्या घरी गोफण, शिंकी, कासरे, मुस्की, दोर, पिशव्या , ताक घुसळण्यासाठी वापरत असलेल्या रवीची लहान दोरी, इत्यादी गोष्टी बनवलेल्या असायच्या.

 

(ऐ) शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी काय काय शिवायची ?

उत्तर: शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी बाहुल्या, अंगडी, टोपडी, पायघोळ, परकर, नउ खानची चोळी, मुलांसाठी पांघरूण, मोठ्यांसाठी वाकळ , लहानग्यांसाठी दुपटी शिवायची.

 

(ओ) माहेरवाशिणीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा?

उत्तर: लेखिकेच्या आजीने शिऊन दिलेली कुंची माहेरवाशीण घालून सासरी गेली की  त्या कुंचीचे खूप कौतुक व्हायचे आणि त्यामुळे माहेरवाशिणीचा रुबाब सासरी वाढायचा.

 

 प्र.२. कोणाला व का म्हटले आहे ते लिहा .

(१)      निर्मितीचा धनी

उत्तर: निर्मितीचा धनी कुंभाराला म्हटले आहे.

कारण, पिढ्यानपिढ्यांपासून कुंभाराची कलाकुसर कायम उपयोगात येते. तसेच धार्मिक कार्यामध्ये त्याच्या कलाकुसारेला फार महत्व असते, तो एका मातीच्या गोळ्यापासून नवनिर्मिती करतो म्हणून  निर्मितीचा धनी कुंभाराला म्हटले आहे.

 

(२)      भुईफुले

 उत्तर: अंगणात काढलेल्या रांगोळीला भूईफुले म्हटले आहे.

कारण, ती फुले इतकी सुंदर रेखाटली जायची की त्या फुलांना पाहून गावला हेवा वाटायचा. ती फुले अगदी खरी खुरी  असल्यासारखी भासायची.

 

५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे कारागिरी स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास. / Karagiri  swadhyay prashna uttare / Karagiri question answer / Karagiri  prashn uttar  / 5th standard Marathi question answers

प्र.३. खालील शब्दसमूहांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा .


(अ)     तहानभूक हरपणे .

उत्तर: 

अर्थ: तल्लीन होणे.

वाक्य : राजू परीक्षेचाच्या अभ्यासात इतका गुंतला होता की जणू तो तहानभूकच विसराला.


(आ)  वाहवा मांडणे .

उत्तर:

अर्थ: स्तुती करणे.

वाक्य: शाळेतील स्पर्धांमध्ये प्रथम परितोषिक मिळवल्याने गुरुजींनी वर्गात निखिलची वाहवा केली.


(इ)         ऐटी मिरवणे .

उत्तर: 

अर्थ: रुबाब करणे.

वाक्य: वाढदिवसाच्या दिवशी नवीन कपडे घालून सार्थक ऐटीत मिरवत होता.


(ई)         हेवा करणे .

उत्तर: 

अर्थ: मत्सर वाटणे

वाक्य: सखूच्या श्रीमंतीचा  मालतीबाईंना हेवा वाटला.


(अ)     तोंडावर हसू फुटणे .

 उत्तर: 

अर्थ: खूप हसणे.

वाक्य : सार्थक ने वर्गात सर्वांना जोग सांगताच सर्वांच्या तोडावर हसू फुटले.


(उ)        तोंडात बोट घालणे .

 उत्तर: 

अर्थ: नवल वाटणे.

वाक्य: तिसरीतील राणीचे सामान्य ज्ञान पाहून इतर स्पर्धकांनी  तोंडात बोटे घातली.

 

प्र.४. दोरखंड तयार केले जातात , त्या ठिकाणी जाऊन निरीक्षण करा. दोरखंड तयार करण्याची कृती लिहा.

 उत्तर:

 

• खालील अवयवांशी संबंधित शब्दसमूह वा वाक्प्रचार संग्रहित करा .

१. कान

उत्तर:

१)   कान पिळणे – समज देणे.

२)   कान देणे – लक्षपूर्वक ऐकणे.

३)   कान भरणे – एखाद्या विषयी चुकीच्या गोष्टी सांगणे.

४)   कानावर येणे – सहज ऐकू येणे .

५)   कानाला खडा लावणे – एखादी गोष्ट कधीही न करणे.


२. डोळे

उत्तर:

१)   डोळ्यांत तेल घालून राहणे – सावध राहणे

२)   डोळ्यांत धारा लागणे – अश्रू वाहणे , रडणे.

३)   डोळ्याला डोळा न भिडवणे -  घाबरून नजर न  देणे.

४)   डोळे फिरणे – खूप घाबरणे.

५)   नजर वाकडी करणे – वाईट हेतू बाळगणे.

 

3.नाक

उत्तर:

१)               नाक फिरवणे – एखाद्या गोष्टीला नापसंती दर्शवणे.

२)   नाक खुपसणे- मधे मधे करणे.

३)   नाकी नउ येणे- खूप अवघड जाणे.

४)   नाक दाबणे – बोलू न देणे.

५)   नाकाचा शेंडा लाल होणे – खूप राग येणे.

 

4.डोके

 उत्तर:

१)डोक्यात वीज चमकणे – पटकन समजणे.

२) डोक्यात येणे- लक्षात येणे.

३) डोक्यावर घेणे- खूप कौतुक करणे.

४) डोके फिरणे- राग येणे

५) डोके घालणे – लक्ष देणे.

 

  स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा 

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

कारागिरी 5वी मराठी पाठ १८ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
कारागिरी इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Karagiri question answer
Karagiri  prashn uttar 

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.